माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 26 May 2026

भाषिक कोडे ( ओळखा पाहू मी कोण ? )

(१) डोक्यावर तुरा छान 
    राष्ट्रीय पक्षांचा मला मान !
   ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- मोर 
-------------------------------------
(२) मी उमलते दलदल चिखलात,
      राष्ट्रीय फुलाचा मिळे मान भारतात.
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --  कमळ 
---------------------------------------
(३) उंचच उंच माझी मान,
 झाडाच्या शेंड्यांची मी पाने खातो छान !
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- जिराफ 
-------------------------------------
(४) बत्तीस जणांना ठेवते गुपचूप ,
     स्वतः बोलते खूपच खूप !
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- जीभ 
-------------------------------------
(५) सर्वात मोठे माझे पान,
     पंगतीमध्ये मजला मान !
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- केळीचे पान 
------------------------------------
(६) चिव चिव करिते गुजगोष्टी ,
      खट्याळ आहे ही मोठी  !
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --  चिमणी 
---------------------------------------
(७) म्हणतात मला फळांचा राजा,
      खाल्ल्यावर वाटते मज्जाच मजा !
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- आंबा 
--------------------------------------
(८) वाघाची ही मावशी ,
      चोरून पिते दूध कशी  !
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- मांजर 
-------------------------------------
(९) चाक फिरवतो गरागरा ,
     मडकी करतो भराभरा  !
    ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --  कुंभार 
------------------------------------
(१०)  पत्ता शोधतो, पत्र वाटतो,
         सकाळ असो की संध्याकाळ .
         ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- पोस्टमन 
-------------------------------------
(११) लाकूड कापतो, लाकूड तासतो
        औत,  गाडी करून देतो
        ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- सुतार
----------------------------------
(१२) एका पासूनी बारा इतकी असते याची धाव
       भिंतीवरती, हाती शोभे आठवते का नाव?
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- घड्याळ
----------------------------------
(१३) सोने घेतो, चांदी घेतो,
       दागदागिने करून देतो
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- सोनार
------------------------------------
(१४) म्हणतात मला फळांचा राजा
       खाल्ल्यावर वाटते मज्जाच मजा
        ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- आंबा
-------------------------------------
(१५) सुपासारखे माझे कान
        शेपूट आहे फार लहान
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- हत्ती
-------------------------------------
(१६) इटुकलं पिटुकलं दाराला लटकलं
    चावी शिरता पोटात, पटकन उघडलं
        ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- कुलूप
--------------------------------------
(१७) मी आहे जंगलाचा राजा,
       चाल तर ऐटबाज,
       आयाळ माझी शान, 
        चटकन तू जाण !
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --  सिंह 
------------------------------------------
(१८) दरवर्षी बदलतो पाने, 
        पारंब्यांवर मुले खेळती, 
         पक्षांना देतो आधार, 
        धरतो तुम्हावर छाया.
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- वडाचे झाड 
------------------------------------------
(१९) शेताची, घराची करतो राखण, 
        प्रामाणिक म्हणून माझी शान, 
        वास, आवाजावरून ओळखतो,
        मिश्राहार घेतो
        ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- कुत्रा 
------------------------------------------
(२०) नाही दिसत डोळ्यांना, 
         नाही लागत हाताला !
         आहे आजूबाजूला सर्वत्र, 
         ओळखा पाहू मला.

उत्तर -- हवा 
------------------------------------------
(२१) नाहीत पाय, नाहीत हात,
        तरी पळतो वेगाने 
        पाहून मजला भितात लोक, 
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- साप 
~~~~~~~~~~~~~~~~~~
(२२) जमिनीवर असतो, 
         पाण्यातही राहतो,
        डराव डराव ओरडतो, 
        ओळखा पाहू मी कोण ? 

उत्तर : बेडूक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
(२३) रंग माझा काळा
        गोड माझा गळा
       कुहूकुहू गाणे माझे 
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- कोकिळ
~~~~~~~~~~~~~~
(२४) सुपासारखे माझे कान, 
      शेपूट आहे फार लहान
     पाने, ऊस माझे जेवण, 
     ओळखा पाहू मी कोण ? 

उत्तर : हत्ती.
~~~~~~~~~~~~~~
(२५) उंचाडी मान, फत्ताडे पाय
        वाकडी पाठ, डुगडुग जाय 
       तुडवीत जातो वाळवंट
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : उंट.
~~~~~~~~~~~~~~~
(२६) हिरवे हिरवे अंग माझे
        लाल लाल चोच माझी
        विठू विठू बोल माझे 
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- पोपट
~~~~~~~~~~~~~~~
(२७) मला म्हणतात मनीमाऊ 
         शरीर माझे मऊ मऊ
         मी करते म्यँव म्यँव 
         ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --  मांजर
~~~~~~~~~~~~~~~
(२८) कात नाही, चुना नाही,
        तोंड कसे रंगले ? 
        पाऊस नाही, पाणी नाही,
        रान कसे हिरवे?
       ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : पोपट.
~~~~~~~~~~~~~~~
(२९) लांब चोच, लांब मान.
       पांढरा रंग , लावतो ध्यान
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर : बगळा.
~~~~~~~~~~~~~~~
(३०) समुद्रकिनारी राहतो,
उंच उंच वाढतो,
शुभकार्यात माझ्या फळाला
फारच मान मिळतो.
मी कोण ?

उत्तर -- नारळाचे झाड
~~~~~~~~~~~~~~~
(३१)झाडावर राहतो,
वसंतात गातो,
काळा जरी मी
आनंद पसरवतो.
मी कोण ?

उत्तर -- कोकीळ
~~~~~~~~~~~~~~~~
(३२) डोंगरावरून येते,
सदैव धावते,
शेते आणि माणसांना
उपयोगी पडते.
मी कोण ?

उत्तर -- नदी
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३३)माझ्या पानांचे तोरण करतात,
फुलांना 'मोहोर' म्हणतात,
सुमधुर फळांची सर्वच
वाहव्वा करतात.
मी कोण ?

उत्तर -- आंब्याचे झाड
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३४) झाडांना मी आधार देतो. 
क्षार व पाणी शोषून घेतो. 
त्यांना खोडाकडे मी पाठवतो. 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- मूळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३५) वनस्पतींना देतो आकार 
पानाफुलांना देतो आधार 
सर्वांना पोहचवितो पाणी व क्षार 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- खोड 
~~~~~~~~~~~~~~~~~
(३६) रंग माझा हिरवा हिरवा 
माझ्यात आहेत हिरवे कण 
करतो तयार वनस्पतींचे अन्न 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- पान 
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३७) त-हेत-हेचे रंग मजेचे 
वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे 
म्हणून देवालाही आवडतो आम्ही 
फळांना जन्म देतो आम्ही 
ओळखा पाहू आम्ही कोण ?

उत्तर -- फूल 
~~~~~~~~~~~~~~~~~~
(३८) मी काळा, पिवळा कीटक आहे. 
मी मध गोळा करते. तुम्ही मला त्रास दिलात, 
तर मी तुम्हांला दंश करीन.
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- मधमाशी 
~~~~~~~~~~~~~~~~~
(३९) आहोत आम्ही शेजारी, 
भेट नाही संसारी . 
रंग विविधता दाखवतो, 
निसर्ग तुम्हा दावितो.
ओळखा पाहू कोण ?

उत्तर --- डोळे 
~~~~~~~~~~~~~~~~~
(४०) सुगंध येता मन बहरते, 
दुर्गंधीने मी होतो नाराज. 
फळ - फुलांची आवड मजला, 
वासाची मी करतो पारख.
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- नाक 
~~~~~~~~~~~~~~~~~
(४१) इवली इवली छान सोनुली, 
कडू, आंबट, गोड, तिखट, सांगे तुम्हां 
ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- जीभ 
----------------------------------------
(४२) तुरुतुरू पळते
     शेंगा मी खाते 
     राहते मी झाडावर 
     तीन पट्टे पाठीवर
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- खार 
----------------------
(४३) जोरात पळतो 
     पाने मी खातो 
    पोटात माझ्या कस्तुरी 
    पांढरे ठिपके अंगावरी
    ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- हरीण 
-------------------------
(४४) उंच माझी भरारी 
     रुबाब माझा भारी 
    पक्ष्यांचा मी राजा 
    नागाला देतो मी सजा
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- गरूड
------------------------------
(४५) मी करतो हुपहूप 
     शेपटीला माझ्या शेरभर तूप 
    झाडावरून उड्या मारतो 
    पेरू आणि केळी खातो
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- माकड 
------------------------------------
(४६) माझा नुसता चिवचिवाट 
     पिले माझी पहातात वाट 
    धान्य माझ्या आवडीचे 
    चोचीने टिपून खायचे
    ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- चिमणी 
---------------------------------
(४७) मी जंगलाचा राजा 
     माझ्याबरोबर करू नका मजा 
     ऐकता माझी डरकाळी 
     सुरू होते पळापळी
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- सिंह 
------------------------------------
(४८) कावऽ कावऽ करीतो 
    पाहुण्यांची चाहूल देतो 
    चिऊताई म्हणे मला चोर 
    रंग माझा काळाभोर
    ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- कावळा 
------------------------------------
(४९) मला म्हणतात मनीमाऊ 
     शरीर माझे मऊ मऊ 
     मी करते दूध फस्त 
     म्यँव म्यँव करते मस्त
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- मांजर
------------------------------------
(५०) रंग माझा काळा
      गोड माझा गळा 
     कुहुकुहू गाणे माझे 
     स्वर नांदे चहूकडे
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- कोकीळ 
------------------------------------
(५१) मी आहे इमानदार 
      ‌ मला म्हणतात राखणदार 
      भूऽ भूऽ भुंकतो 
     ‌‌ मालकावर जीव लावतो
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- कुत्रा 
------------------------------------
(५२) लाल लाल माझा तुरा 
       पळतो नुसतो भराभरा 
       रंगीबेरंगी रंग माझा 
      कुकुचकू कुकूचकू ओरडणारा
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- कोंबडा 
------------------------------------
(५३) चालण्याचा रुबाब फार 
       पाठीवर माझ्या मदार 
       मी आहे उंच खूप 
      वाळवंटासाठी अनुरूप
     ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- उंट 
------------------------------------
(५४) विठू विठू बोल माझे 
        मिरची पेरू आवडीचे 
       हिरवे हिरवे अंग माझे 
      लाल चुटूक चोचीचे
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- पोपट 
------------------------------------
(५५) कापसासारखे अंग अन् 
       लाल डोळ्यातून बघतो 
      गवत, गाजर खातो अन् 
      तुरूतुरू गवतावर धावतो
     ‌ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- ससा 
------------------------------------
(५६) पाऊस मला खूप आवडतो 
        पिसारा फुलवून मी नाचतो 
       मी नाचतो आंब्याच्या वनात 
       रंगून जाल मला पहात
      ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर --- मोर 
==========================
संकलक :- 
शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
    ९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Friday, 22 May 2026

गणित सामान्यज्ञान ( शंकर चौरे सर)

✓ गणितीय सामान्यज्ञान 

(1) सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे.
(2) सर्वांत मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही.
(3) लहानात लहान पूर्ण संख्या ' 0 ' आहे.
(4) मोठ्यात मोठी पर्ण संख्या सांगता येत नाही.
(5) लहानात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
(6) मोठ्यात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही.
(7) मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या  - 1 आहे.
(8) लहानात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे.
(9)  0 ही संख्या धनही नाही व ऋणही नाही.
(10) सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
(11) दोन क्रमागत सम संख्यामध्ये दोनचा फरक असतो.
(12) दोन क्रमागत विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो.
(13) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 55 आहे.
(14) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज 30 आहे.
(15) 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज 25 आहे.
(16) 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत.
(17) सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
(18) सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे.
(19) 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत.
(20) 1 ही संख्या संयुक्तही नाही व मूळही नाही.
(21) सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे.
(22)  सम असणारी एकमेव मूळ संख्या 2 आहे.
(23) सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.
(24) सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.
(25) सर्वात लहान संयुक्त विषम संख्या 9 आहे.
(26) एक अंकी लहानात लहान संख्या 1 आहे.
(27) दोन अंकी लहानात लहान संख्या 10 आहे.
(28) तीन अंकी लहानात लहान 100 आहे.
(29) चार अंकी लहानात लहान संख्या 1,000 आहे.
(30) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे.
(31) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे.
(32) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या 999 आहे.
(33) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 999 आहे.
(34) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक एकूण 11 वेळा येतो.
(35) 1 ते 100 पर्यंत  1 हा अंक एकूण 21 वेळा येतो.
(36) मीटर हे लांबी मोजण्याचे मुख्य परिमाण आहे. 
(37) लीटर हे धारकता / पातळ पदार्थ मोजण्याचे मुख्य परिमाण आहे.
(38) ग्रॅम हे वजन मोजण्याचे मुख्य परिमाण आहे.
(39) काल मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना, वर्ष इत्यादी एकके वापरतात.
============================

✓ सामान्यज्ञान ( मापन / परिमाणे )

१ मिनिट = ६० सेकंद 
१ तास = ६० मिनिटे 
१ तास = ३६०० सेकंद 
१ दिवस = २४ तास 
१ दिवस = १४४० मिनिटे 
१ दिवस = ८६,४०० सेकंद 
१ आठवडा = ७ दिवस 
३० / ३१ दिवस = १ महिना 
१२ महिने = १ वर्ष 
३६० दिवस = १ मराठी वर्षे
३६५ दिवस = १ इंग्रजी वर्ष 
३६६ दिवस = १ लीप वर्ष 
१ डझन = १२ वस्तू 
१ ग्रोस = १२ डझन 
१ ग्रोस = ४४ वस्तू 
१ दस्ता = २४ कागद 
१ रीम = ४८० कागद 
१ रीम = २० दस्ते 
१ क्वायर = २४ कागद 
१ फूट = १२ इंच 
१ इच = २ . ५४ सेंटिमीटर 
१ मीटर = १०० सेंटिमीटर 
१ किलोमीटर = १००० मीटर 
१ किलोमीटर = १,००,००० सेंटिमीटर 
१ लीटर = १००० मिलिलीटर 
१ किलोग्रॅम = १००० ग्रॅम 
१ क्विंटल = १०० किलोग्रॅम 
१ टन = १० क्विंटल 
१ टन = १००० किलोग्रॅम 
१ आर. = १०० चौ. मीटर 
१ चौ. मी. = १००० चौ. सें. मी.
१  गुठ्ठा = १०८९ चौफूट 
१ हेक्टर = १०० आर 
१ हेक्टर = १०,००० चौ. मीटर 
१ एकर = ४० गुठ्ठे 
१ फॅदम = ६ फूट 
=========================

✓ दुप्पट, तिप्पट, चौपट, अर्धी, पाव संख्या 

२ ची दुप्पट संख्या = ४
३ ची दुप्पट संख्या = ६
४ ची दुप्पट संख्या = ८
५ ची दुप्पट संख्या = १०
६ ची दुप्पट संख्या = १२
७ ची दुप्पट संख्या = १४
८ ची दुप्पट संख्या = १६
९ ची दुप्पट संख्या = १८
१० ची दुप्पट संख्या = २०
२० ची दुप्पट संख्या = ४०
३० ची दुप्पट संख्या = ६०
४० ची दुप्पट संख्या = ८०
५० ची दुप्पट संख्या = १००
६० ची दुप्पट संख्या = १२०
७० ची दुप्पट संख्या = १४०
८० ची दुप्पट संख्या = १६०
९० ची दुप्पट संख्या = १८०
१०० ची दुप्पट संख्या = २००
२०० ची दुप्पट संख्या = ४००
३०० ची दुप्पट संख्या = ६००
४०० ची दुप्पट संख्या = ८००
५०० ची दुप्पट संख्या = १०००
===================
२ ची तिप्पट संख्या = ६
३ ची तिप्पट संख्या = ९
४ ची तिप्पट संख्या = १२
५ ची तिप्पट संख्या = १५
६ ची तिप्पट संख्या = १८
७ ची तिप्पट संख्या = २१
८ ची तिप्पट संख्या = २४
९ ची तिप्पट संख्या = २७
१० ची तिप्पट संख्या = ३०
२० ची तिप्पट संख्या = ६०
३० ची तिप्पट संख्या = ९०
४० ची तिप्पट संख्या = १२०
५० ची तिप्पट संख्या = १५०
६० ची तिप्पट संख्या = १८०
७० ची तिप्पट संख्या = २१०
८० ची तिप्पट संख्या = २४०
९० ची तिप्पट संख्या = २७०
१०० ची तिप्पट संख्या = ३००
२०० ची तिप्पट संख्या = ६००
३०० ची तिप्पट संख्या = ९००
४०० ची तिप्पट संख्या = १२००
५०० ची तिप्पट संख्या = १५००
====================
२ ची चौपट संख्या = ८
३ ची चौपट संख्या = १२
४ ची चौपट संख्या = १६
५ ची चौपट संख्या = २०
६ ची चौपट संख्या = २४
७ ची चौपट संख्या = २८
८ ची चौपट संख्या = ३२
९ ची चौपट संख्या = ३६
१० ची चौपट संख्या = ४०
२० ची चौपट संख्या = ८०
३० ची चौपट संख्या = १२०
४० ची चौपट संख्या = १६०
५० ची चौपट संख्या = २००
६० ची चौपट संख्या = २४०
७० ची चौपट संख्या = २८०
८० ची चौपट संख्या = ३२०
९० ची चौपट संख्या = ३६०
१०० ची चौपट संख्या = ४००
२०० ची चौपट संख्या = ८००
३०० ची चौपट संख्या = १२००
४०० ची चौपट संख्या = १६००
५०० ची चौपट संख्या = २०००
====================
२ ची अर्धी / निम्मे  संख्या = १
४ ची अर्धी / निम्मे संख्या = २
६ ची अर्धी / निम्मे  संख्या = ३
८ ची अर्धी / निम्मे संख्या = ४
१० ची अर्धी / निम्मे  संख्या = ५
१२ ची अर्धी / निम्मे संख्या = ६
१४ ची अर्धी / निम्मे संख्या = ७
१६ ची अर्धी / निम्मे संख्या = ८
१८ ची अर्धी / निम्मे संख्या = ९
२० ची अर्धी / निम्मे संख्या =१०
३० ची अर्धी / निम्मे संख्या = १५
४० ची अर्धी / निम्मे संख्या = २०
६० ची अर्धी / निम्मे संख्या = ३०
८० ची अर्धी / निम्मे  संख्या = ४०
१०० ची अर्धी / निम्मे संख्या = ५०
२०० ची अर्धी / निम्मे संख्या =१००
३०० ची अर्धी / निम्मे संख्या = १५०
४०० ची अर्धी / निम्मे संख्या = २००
५०० ची अर्धी / निम्मे संख्या = २५०
=======================
४ ची पाव संख्या = १
८ ची पाव संख्या = २
१२ ची पाव संख्या = ३
१६ ची पाव संख्या = ४
२० ची पाव संख्या = ५
२४ ची पाव संख्या = ६
३२ ची पाव संख्या = ८
४० ची पाव संख्या = १०
८० ची पाव संख्या = २०
१०० ची पाव संख्या = २५
२०० ची पाव संख्या = ५०
४०० ची पाव संख्या = १००
१००० ची पाव संख्या = २५०
======================

✓ कालमापन  ( तास -- मिनिटे रुपांतर )

१ तास = ६० मिनिटे
२ तास = १२० मिनिटे
३ तास = १८० मिनिटे
४ तास = २४० मिनिटे
५ तास = ३०० मिनिटे
६ तास = ३६० मिनिटे
७ तास = ४२० मिनिटे
८ तास = ४८० मिनिटे
९ तास = ५४० मिनिटे
१० तास = ६०० मिनिटे
११ तास = ६६० मिनिटे
१२ तास = ७२० मिनिटे
------------------------------------------
✓  मिनिटांचे तास व मिनिटे रूपांतर

९० मिनिटे = १ तास  ३० मिनिटे
७५ मिनिटे = १ तास १५ मिनिटे
१०० मिनिटे = १ तास ४० मिनिटे
६५ मिनिटे  = १ तास  ५ मिनिटे
२०० मिनिटे = ३ तास २० मिनिटे
२५५ मिनिटे = ४ तास १५ मिनिटे
८० मिनिटे  =  १ तास २० मिनिटे
२१५ मिनिटे = ३ तास ३५ मिनिटे
========================

✓ भूमिती माहिती ( भौमितिक सामान्यज्ञान )

(1) त्रिकोणाला बाजू  ---- तीन

(2) त्रिकोणाला शिरोबिंदू  ---- तीन

(3) त्रिकोणाला कोन  ---- तीन

(4) आयताला बाजू ---- चार

(5) आयताला शिरोबिंदू  ---- चार

(6) आयताच्या समोरासमोरील बाजू --- समान लांबीच्या

(7) आयताचे चारही कोन  --- काटकोन

(8) चौरसाला बाजू  ---- चार

(9) चौरसाला शिरोबिंदू  ---- चार

(10) चौरसाला कोन  ---- चार

(11)  चौरसाच्या चारही बाजूंची लांबी --- समान

(12) चौरसाचे चारही कोन  ---- काटकोन

(13)   90 अंशापेक्षा कमी मापाचा कोन -- लघुकोन

(14) 90 अंशाच्या मापाचा कोन --- काटकोन

(15)  90 अंशापेक्षा जास्त माप असणारा कोन -- विशालकोन
===========================

✓ गणितीय सामान्यज्ञान 

(1) त्रिकोणाच्या बाजूंची संख्या = 3
(2) त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या = 3
(3) चौरसाच्या बाजूंची संख्या = 4
(4) चौरसाच्या शिरोबिंदूंची संख्या = 4
(5) आयताच्या बाजूंची संख्या = 4
(6) आयताच्या शिरोबिंदूंची संख्या = 4
====================
(7) मुख्य दिशा = 4
(8) उपदिशा = 4
(9) आठवड्याचे वार = 7
(10) एका वर्षात महिने = 12
(11) एका दिवसाचे तास = 24
(12) एका वर्षाचे दिवस = 365
(13) एका लीप वर्षाचे दिवस = 366
(14) एका वर्षात आठवडे = 52
(15) लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे दिवस= 29
(16) एका तासाचे मिनिटे = 60
=============================
गणित प्रश्नावली - 252 

(1) एक अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 1
----------------------------
(2) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 9
---------------------------
(3) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 10
---------------------------------
(4) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 99
---------------------------------
(5) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 100
------------------------------
(6) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 999
------------------------------
(7) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 1000
-----------------------------
(8) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 9999
----------------------------
(9) पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- 10, 000
--------------------------
(10) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- 99, 999
----------------------------
(11) 1 पासून 9 पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 9
----------------------------
(12) 1 पासून 99 पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 90
----------------------------
(13) 100 पासून 999 पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 900
----------------------------
(14) 1000 पासून 9999 पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 9000
----------------------------
(15) 10, 000 पासून 99, 999 पर्यंतच्या पाच अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 90, 000
---------------------------
(16) 1 ते 10 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 55
-----------------------------
(17) 11 ते 20 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --- 155
------------------------------
(18) 21 ते 30 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 255
--------------------------
(19) 31 ते 40 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 355
------------------------------
(20) 41 ते 50 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 455
-----------------------------
(21) 51 ते 60 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 555
---------------------------
(22) 61 ते 70 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 655
---------------------------
(23) 71 ते 80 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 755
--------------------------
(24) 81 ते 90 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 855
------------------------
(25) 91 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 955
------------------------
(26) 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 5050
--------------------------
(27) 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत.
उत्तर -- 25
--------------------------
(28) 1 ते 10 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 2,  3,  5,  7
--------------------------
(29) 11 ते 20 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 11, 13, 17, 19
--------------------------------
(30) 21 ते 30 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 23,  29
---------------------------------
(31) 31 ते 40 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 31,  37
-------------------------------
(32) 41 ते 50 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 41,  43,  47
------------------------------
(33) 51 ते 60 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 53,  59
------------------------------
(34) 61 ते 70 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 61,  67
--------------------------
(35) 71 ते 80 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 71,  73,  79
--------------------------
(36) 81 ते 90 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 83,  89
----------------------------
(37) 91 ते 100 पर्यंत येणा-या मूळ संख्या सांगा.
उत्तर -- 97
-----------------------------
(38) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 11 वेळ
------------------------------
(39) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक एककस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर- 10 वेळ
--------------------------
(40) 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर- 1 वेळा
-------------------------
(41) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 21 वेळा
----------------------------
(42) 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
----------------------------
(43) 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
-----------------------------
(44) 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
-----------------------------
(45) 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
-----------------------------
(46) 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
----------------------------
(47) 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
----------------------------
(48) 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर- 20 वेळा
---------------------------
(49) 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक एककस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
--------------------------
(50) 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20
--------------------------
(51) 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
-------------------
(52) 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
--------------------------
(53 ) 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
-------------------------
(54) 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
-------------------------
(55) 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
---------------------
(56) 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
--------------------------
(57) 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर -- 20 वेळा
---------------------------
(58) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
(59) 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
------------------------
(60) 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
------------------------
(61) 1 ते 100 पर्यंत 4 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
------------------------
(62) 1 ते 100 पर्यंत 5 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
(63) 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
--------------------------
(64) 1 ते 100 पर्यंत 7 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
---------------------------
(65) 1 ते 100 पर्यंत 8 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
(66) 1 ते 100 पर्यंत 9 हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 10 वेळा
-------------------------
(67) 1 ते 100 पर्यंत 1 हा अंक शतकस्थानी किती वेळा येतो ?
उत्तर -- 1 वेळा
------------------------
(68) दोन अंकी किती संख्या आहेत ?
उत्तर -- ९०
--------------------
(69) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- सांगता येत नाही.
---------------------------
(70) मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती ?
उत्तर -- सांगता येत नाही.
------------------------
(71) लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती ?
उत्तर -- 1
-------------------------
(72) सर्वात लहान मूळ संख्या कोणती ?
उत्तर -- 2
----------------------
(73) सर्वात लहान विषम संख्या कोणती ?
उत्तर -- 3
----------------------
(74) पहिल्या 10 सम संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 110
----------------------
(75) पहिल्या 15 विषम संख्यांची बेरीज किती ?
उत्तर -- 255
----------------------
(76) सम असणारी एकमेव मूळ संख्या कोणती ?
उत्तर -- 2
----------------------
(77) 1 मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 60 सेकंद
----------------------
(78) 1 तास म्हणजे किती मिनिट ?
उत्तर -- 60 मिनिटे
---------------------
(79) 1 दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- 24 तास
-----------------------
(80) 1 आठवडा म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- 7 दिवस
----------------------
(81) 1 वर्ष म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- 365  /  366 दिवस
----------------------
(82) 1 वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- 12 महिने 
-----------------------
(83) 1 तास म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 3, 600 सेकंद
-----------------------
(84) 1 दिवस म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- 86, 400 सेकंद
-------------------------
(85) 1 लीटर म्हणजे किती मिलीलीटर ?
उत्तर -- 1000 मिलीलीटर
-----------------------
(86) 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- 1000 ग्रॅम 
----------------------
(87) 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- 100 सेंटीमीटर
-------------------------
(88) 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- 1000 मीटर
---------------------------
(89) 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- 100 किलोग्रॅम
--------------------------
(90) 1 टन म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- 1000 किलोग्रॅम
-------------------------
(91) 1 तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- 10 ग्रॅम
------------------
(92) 1 डझन म्हणजे किती वस्तू / नग ?
उत्तर -- 12 वस्तू
---------------------
(93) 1 ग्रोस म्हणजे किती डझन ?
उत्तर -- 12 डझन
----------------------
(94) 1 दस्ता कागद म्हणजे किती कागद ?
उत्तर -- 24 कागद
------------------------
(95) 1 रीम कागद म्हणजे किती दस्ते कागद ?
उत्तर -- 20 दस्ते
----------------------
(96) 1 रीम कागद म्हणजे किती कागद ?
उत्तर -- 480 कागद
----------------------
(97) 1 फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर -- 12 इंच
-----------------
(98) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
---------------
(99) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन
------------------
(100) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
---------------
(101) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
-----------------
(102) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
-----------------
(103) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
---------------------
(104) इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- आठ
--------------------
(105) आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे
काय ?
उत्तर -- आयताची परिमिती
------------------------
(106) चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- चौरसाची परिमिती
------------------------
(107) त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय ?
उत्तर -- त्रिकोणाची परिमिती
-------------------------
(108) 12 तास = किती मिनिटे ?
उत्तर -- 720
----------------------------
(109) 12 मिनिटे = किती सेकंद ?
उत्तर -- 720 सेकंद
-----------------------------
(110) 12 तास = किती सेकंद ?
उत्तर -- 43, 200
---------------------------
(111) 12 दिवस = किती मिनिटे ?
उत्तर -- 17, 280
-------------------------
(112) 12 दिवस = किती सेकंद ?
उत्तर -- 10, 36, 800 सेकंद 
----------------------------
(113) 5 डझन कागद  = कागद ?
उत्तर --  60 कागद 
-----------------------------------
(114) 5 आठवडे = किती दिवस ?
उत्तर -- 35 दिवस 
-----------------------------------
(115) 5 मिनिटे = किती सेकंद ?
उत्तर --  300 सेकंद 
-----------------------------------
(116) 5 तास = किती मिनिटे ?
उत्तर -- 300 मिनिटे 
-----------------------------------
(117) 5  दिवस = किती तास ?
उत्तर -- 120 तास 
-----------------------------------
(118)  5  मीटर = किती सेंटिमीटर ?
उत्तर -- 500 सेंटिमीटर 
-----------------------------------
(119)  5 किलोमीटर = किती मीटर ?
उत्तर -- 5000 मीटर 
-----------------------------------
(120)  5 किलोग्रॅम = किती ग्रॅम ?
उत्तर -- 5000 ग्रॅम 
-----------------------------------
(121) 5 लीटर = किती मिलिलीटर ?
उत्तर -- 5000 मिलिमीटर 
-----------------------------------
(122) 5 वर्षे = किती महिने ?
उत्तर --  60 महिने 
-----------------------------------
(123) 5 क्विंटल =  किती किलोग्रॅम ?
उत्तर --  500 किलोग्रॅम 
-----------------------------------
(124) 5 फूट = किती इंच ?
उत्तर --  60 इंच 
----------------------------
(125) 10 एकक = किती दशक ?
उत्तर --- 1 दशक 
-------------------------------------
(126) 10 दशक = किती शतक ?
उत्तर --- 1 शतक 
-------------------------------------
(127) 10 शतक = किती हजार ?
उत्तर --- 1 हजार 
-------------------------------------
(128)  ' एक हजार अकरा ' ही संख्या अंकांत कशी लिहाल ?
उत्तर --- 1011
-------------------------------------
(129) 321 या संख्येतील 1,  3 व  2 या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती ?
उत्तर --- 321
-------------------------------------
(130) 6719 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
उत्तर --- 700
-------------------------------------
(131) 36214  या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
उत्तर --- 30,000
-------------------------------------
(132) 990 + 9  = किती ?
उत्तर --- 999
-------------------------------------
(133)  89999 + 1 = किती ?
उत्तर --- 90,000
-------------------------------------
(134) 1111 - 11 = किती ?
उत्तर --- 1100
-------------------------------------
(135) 1000 - 1 = किती ?
उत्तर --- 999
-------------------------------------
(136) 111 × 1 = किती ?
उत्तर --- 111
-------------------------------------
(137) 300 × 0 = किती ?
उत्तर --- 000
-------------------------------------
(138) गुण्य 50 आणि गुणक 20 असेल, तर गुणाकार किती ?
उत्तर --- 1000
-------------------------------------
(139) 100 × 10 हा गुणाकार किती येईल ?
उत्तर --- 1000
-------------------------------------
(140) 20 रूपयांस एक याप्रमाणे 30 रूमालांची किंमत किती रूपये ?
उत्तर --- 600 रूपये 
-------------------------------------
(141)  369  ÷ 3  = किती ?
उत्तर --- 123
-------------------------------------
(142) नऊशे नऊ या संख्येला नऊने भागले, तर भागाकार किती येईल ?
उत्तर --- 101
-------------------------------------
(143) एकच संख्या 9 वेळा घेऊन बेरीज केली तेव्हा ती 81 आली, तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 9
-------------------------------------
(144) पन्नास रूपयांच्या किती नोटा घेतल्यास दहा हजार रूपये होतील ?
उत्तर --- 200
-------------------------------------
(145) 120 आंबे म्हणजे किती डझन आंबे ?
उत्तर --- 10 डझन 
-------------------------------------
(146) वर्षाजवळ 100 रूपयांच्या दहा नोटा होत्या. त्यातील 200 रूपये खर्च केले, तर तिच्याजवळ किती रूपये शिल्लक राहिले ?
उत्तर --- 800 रूपये 
-------------------------------------
(147) 5  लीटर दुधाची किंमत 250 रूपये आहे. तर 10 लीटर दुधाची किंमत किती ?
उत्तर --- 500 रूपये 
-------------------------------------
(148) 7 × क = 35 , तर कची किंमत किती ?
उत्तर --  5
-------------------------------------
(149) एका आठवड्याचे किती तास होतात ?
उत्तर --- 168 तास 
-------------------------------------
(150) 2 मीटर 4 सेमी = किती सेमी ?
उत्तर --- 204 सेमी 
-------------------------------------
(151) 2000 ग्रॅम = किती किलोग्रॅम ?
उत्तर -- 2 किलोग्रॅम 
-------------------------------------
(152)  दीड किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर --- 1500 ग्रॅम 
-------------------------------------
(153) सव्वा तास = किती मिनिटे ?
उत्तर --- 75  मिनिटे 
-------------------------------------
(154) 70 दिवस म्हणजेच किती आठवडे ?
उत्तर --- 10 आठवडे 
-----------------------------------
(155) 10 डझन कागद  = किती कागद ?
उत्तर --- 120 डझन 
-------------------------------------
(156) 2 रीम कागद = किती कागद ?
उत्तर --- 960
-------------------------------------
(157) दीड मीटर म्हणजे किती सेमी ?
उत्तर --- 150 सेमी 
-------------------------------------
(158) 10 किलोग्रॅम = किती ग्रॅम ‌?
उत्तर --- 10,000 ग्रॅम 
-------------------------------------
(159) तीन किलोमीटर = किती मीटर ?
उत्तर --- 3000 मीटर 

(160) 1000 रूपयात दहा रुपयांच्या किती नोटा असतील ?
उत्तर ---  100
----------------------------
(161) 17 बदक, 17 मासे, 17 मिनिटात खातात तर 1 बदक, 1 मासा किती मिनिटात खाईल ?
उत्तर --- 17 मिनिटात
----------------------------------
(162) 9 मीटर लांबीची दोरी 9 ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?
उत्तर ---   90 सेंटीमीटर 
----------------------------------
(163) 5 बगळे , 5 मासे, 5 मिनिटात खातात. तर 1 बगळा, 1 मासा किती मिनिटांत खाईल ?
उत्तर --- 5 मिनिट
----------------------------------
(164)  एक दोरी 9 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील  ?
उत्तर --- 10 तुकडे
---------------------------------
(165) 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?
उत्तर --- 10,000
---------------------------------
(166) 800 चे 25 टक्के किती ?
उत्तर -- 200
----------------------------
(167) एका संख्येचे 25 %  म्हणजे 75 तर ती संख्या शोधा.
उत्तर --- 300
------------------------
(168) एका संख्येचे 50 % म्हणजे 40 तर ती संख्या शोधा.
उत्तर --- 80
----------------------------------
(169) एका संख्येच्या 50 % मधून 50 वजा केले असता, 50 उरतात. तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 200
----------------------------------
(170) एक संख्या 50 % नी वाढवली तेव्हा तीची किंमत 100 होते तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 50
----------------------------------
(171)  A चा पगार हा B च्या पगारापेक्षा 50 % नी जास्त आहे.
 तर B चा पगार 4000 हजार आहे. तर A चा पगार किती ?
उत्तर --- 8000
----------------------------------
(172) जर एका संख्येतून त्या संख्येचे 75 % वजा केले तर उत्तर 50 मिळते. तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 200
----------------------------------
(173)  2000 चे 25 % किती ?
उत्तर ---  500
----------------------------------
(174) 20 लीटर दुधामध्ये 25 % पाणी आहे, तर त्यामध्ये दुधाचे प्रमाण किती ?
उत्तर ---  15 लीटर दूध 

(175)एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती ?
उत्तर -- 33
----------------------------
(176) एक दोर सात ठिकाणी कापला तर त्याचे किती तुकडे होतील ?
उत्तर --  8 (आठ)
----------------------------
(177) एका रांगेत सुमितच्या पुढे सहा व मागे आठ मुले आहेत तर रांगेत एकूण मुले किती ?
उत्तर --  15
----------------------------
(178) 2 मीटर अंतर या प्रमाणे झाड लावल्यास 20 मीटर अंतरात किती झाडे लाववी लागतील ?
उत्तर --- 11
----------------------------
(179) एका पेटीत एक डझन आंबे आहेत, अशा 10 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील ?
उत्तर -- 120
-------------------------------------
(180) 200  चे 25 % म्हणजे किती ?
उत्तर -- 50
-------------------------------------
(181) 80  रुपयांना अडीच डझन चिकू, तर पाच डझन चिकूंची किंमत किती रुपये?
उत्तर ---  160
-------------------------------------
(182) 1 + 2 + 3+ 4 + 5  = किती ? (बेरीज करा)
उत्तर -- 15
-------------------------------------
(183) 45, 321  या संख्येतील  4 या अंकांची स्थानिक किंमत किती आहे ?
उत्तर --  40, 000
-------------------------------------
(184) 400  × 2  × 0  = ?
उत्तर -- 0
-------------------------------------
(185)  एक दोरी 7 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील ?
उत्तर -- 8
-------------------------------------
(186) 50 + 5 0 -- 50 = किती ?
उत्तर -- 50
-------------------------------------
(187) एका चौरसाच्या बाजूची लांबी 8 से.मी. आहे. तर त्याची परिणती किती ?
उत्तर --  32 से. मी.
----------------------------
(188) 10  भोव-यांची किंमत 100 रूपये आहे, तर तशाच 20 भोव-यांची किंमत किती ?
उत्तर --- 200
------------------------------
(189) सागाच्या 50 रोपांची किंमत 500 रूपये आहे, तर 150 रोपांची किंमत किती ?
उत्तर --- 1500 रूपये 
----------------------------------
(190) एक बस 3 तासांत 200 किलोमीटर जाते. त्याच वेगाने ती बस 6 तासांत किती अंतर जाईल ?
उत्तर ---  400 किलोमीटर 
----------------------------------
(191) 10 सेमी लांबीच्या लोखंडी गजाचे वजन 300 ग्रॅम आहे. तशाच 20 सेमी लांबीच्या लोखंडी गजाचे वजन किती ?
उत्तर --- 600 ग्रॅम 
----------------------------------
(192) एक गाडी 1 तासात 50 किलोमीटर अंतर जाते. त्याच वेगाने ती गाडी 30 मिनिटांत किती अंतर जाईल ?
उत्तर --- 25 किलोमीटर 
----------------------------------
(193) 12 सेमी बाजू असणा-या चौरसाची परिमिती काढा.
उत्तर --- 48 सेमी 
----------------------------------
(194) एका चौरसाची परिमिती 80 सेमी आहे, तर चौरसाची बाजू सांगा.
उत्तर --- 20 सेमी.
----------------------------------
(195) 6 सेमी, 9 सेमी व 5 सेमी बाजू असणा-या त्रिकोणाची परिमिती काढा.
उत्तर --- 20 सेमी 
----------------------------------
(196) 15 मीटरचा लांब, 10 मीटर रूंदीचा एक मंडप घातला आहे. त्याच्या कडेने झालर लावण्यासाठी ती किती मीटर लांबीची असावी लागेल ?
उत्तर --- 50 मीटर 
----------------------------------
(197) सुमित रोज सकाळी 100 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो, तर तो रोज सकाळी किती अंतर पायी चालतो ?
उत्तर --- 300 मीटर 
----------------------------------
(198) 5 मीटर लांब व 3 मीटर रूंद सतरंजीच्या काठांना चारही बाजूंनी गोठ लावण्यासाठी किती मीटर गोठ लागेल ?
उत्तर --- 16 मीटर 
----------------------------------
(199) एका परीक्षेत उषाला 1000 पैकी 700 गुण मिळाले, तर तिने किती टक्के गुण मिळवले ?
उत्तर --- 70 %
----------------------------------
(200) एका सायकलची किंमत 5000 हजार आहे, तर अशा 10 सायकलींची एकूण किंमत किती ?
उत्तर --- 50,000  रुपये (पन्नास हजार रुपये)
----------------------------------
(201) 4 रूमालांची किंमत 80 रूपये आहे, तर अशा 10 रुमालांची किंमत किती ?
उत्तर --- 200 रूपये 
----------------------------------
(202) 5 वह्यांची किंमत 50 रूपये आहे, तर 10 वहृयांची किंमत किती ?
उत्तर --- 100 रूपये 
----------------------------------
(203) 5 लीटर दुधाची किंमत 250 रूपये असल्यास 10 लीटर दुधाची किंमत किती ?
उत्तर --- 500 रूपये 
----------------------------------
(204)  7 चेंडूंची किंमत 70 रूपये असल्यास, अशा 10 चेंडूची किंमत किती ?
उत्तर --- 100 रूपये 
----------------------------------
(205) 10  मीटर कापडाची किंमत 1000 रुपये आहे, तर  100 मीटर कापडाची किंमत किती ?
उत्तर --- 10,000 रूपये 
----------------------------------
(206) 10 विद्यार्थ्यांची फी  1000 रूपये असेल, तर 200 विद्यार्थ्यांची फी किती ?
उत्तर --- 20,000 रूपये 
----------------------------------
(207) शंकररावांनी एक कपाट 3500 रुपयांस घेतले आणि 4000 रूपयांस विकले, तर त्यांना किती नफा झाला ?
उत्तर --- 500 रूपये 
----------------------------------
(208) मंगल सकाळी 10 : 00 वाजता कामाला जाते. संध्याकाळी 5 : 00 वाजता घरी येते, तर ती किती वेळ बाहेर असते ?
उत्तर --- 7 तास 
-----------------------------
(209) अर्धा वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- 6 महिने 
-----------------------------
(210) पाव वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- 3 महिने
-----------------------------
(211) दीड वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर -- 1 वाजून 30 मिनिटे 
-----------------------------
(212) अडीच वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर --  2 वाजून 30 मिनिटे
-----------------------------
(213)  एकशे म्हणजे किती ?
उत्तर -- 100
-----------------------------
(214)  अर्धाशे म्हणजे किती ?
उत्तर -- 50
-----------------------------
(215)  पावशे म्हणजे किती ?
उत्तर -- 25
-----------------------------
(216)  पाऊणशे म्हणजे किती ?
उत्तर -- 75
-----------------------------
(217)  सव्वाशे म्हणजे किती ?
उत्तर -- 125
-----------------------------
(218)  दीडशे म्हणजे किती ?
उत्तर -- 150
-----------------------------
(219) अडीचशे म्हणजे किती ?
उत्तर -- 250
-----------------------------
(220)  साडेतीनशे म्हणजे किती ?
उत्तर -- 350
-----------------------------
(221) 1  डझन केळी म्हणजे किती केळी  ?
उत्तर  -- 12 केळी 
-----------------------------
(222)  अर्धा डझन केळी म्हणजे किती केळी ?
उत्तर -- 6 केळी
-----------------------------
(223) पाव डझन केळी म्हणजे किती केळी ?
उत्तर  --  3 केळी
-----------------------------
(224)  पाऊण डझन केळी म्हणजे किती केळी ?
उत्तर -- 9 केळी
-------------------------------
(225) 50 ची दुप्पट संख्या किती ?
उत्तर -- 100
--------------------------------
(226) 30 ची तिप्पट संख्या किती ?
उत्तर -- 90
---------------------------------
(227) 77 नंतर क्रमाने येणारी 9 वी विषम संख्या कोणती ?
उत्तर --- 95
---------------------------------
(228) 1 ते 1000 मधील तीन अंकी एकूण संख्या किती ?
उत्तर -- 900
---------------------------------
(229) 19 नंतर 9 वी सम संख्या कोणती ?
उत्तर -- 36
---------------------------------
(230) 1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?
उत्तर --- 153
---------------------------------
(231) 1 ते 100 मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे ?
उत्तर --- 10
---------------------------------
(232) 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --- 19
---------------------------------
(233) 1 ते 50 पर्यतच्या संख्यात 4 हा अंक एकूण किती वेळा येतो ?
उत्तर --- 15
---------------------------------
(234) फक्त दोन अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो ?
उत्तर --- 19
---------------------------------
(235) नव्वदमधून नऊ किती वेळा वजा करता येतील ?
उत्तर --- 10
---------------------------------
(236) 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य ?
उत्तर -- 8
---------------------------------
(237) दहा कोटी ही संख्या अंकात लिहा.
उत्तर --- 100000000
---------------------------------
(238) रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत ?
उत्तर --- 7
---------------------------------
(239) 3 ने भाग जाणा-या एकूण दोन अंकी संख्या किती ?
उत्तर -- 30
---------------------------------
(240) 8 ने नि:शेष भाग जाणारी सर्वांत लहान तीन अंकी संख्या कोणती ?
उत्तर -- 104
---------------------------------
(241) एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता  8 आले तर खरे उत्तर काय आहे ?
उत्तर --- 2
---------------------------------
(242) एका पुस्तकातील 50 % पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती ?
उत्तर -- 200
---------------------------------
(243) रोमन संख्या  ' L ' म्हणजेच किती ?
उत्तर ---  50
---------------------------------
(244) एका व्यक्तीने 25 % रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 1500 रुपये शिल्लक राहतात, तर सुरूवातीला त्याच्याकडे किती रूपये होते ?
उत्तर --- 2000 रूपये 
---------------------------------
(245) 1000  चे  20% = किती ?
उत्तर --- 200
---------------------------------
(246)  500 चे 15% किती ?
उत्तर --- 75
---------------------------------
(247) एका संख्येच्या 50 टक्क्या मधून 50 वजा केले असता बाकी 50 उरले तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 200
---------------------------------
(248) 800 चे 25 % = किती ?
उत्तर --- 200
---------------------------------
(249) एका विद्यार्थ्याला परीक्षेत 400 पैकी 300  गुण मिळाल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले ?
उत्तर --- 75 %
---------------------------------
(250)  200 चे 25 % किती ?
उत्तर --- 50
---------------------------------
(251) एक संख्या 50 % ने वाढविल्यास 300 होते, तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 150
---------------------------------‌
(252) 400 रूपयांच्या टेबलाची किंमत 500 रूपये झाली, तर त्याच्या मूळ किंमतीत शेकडा किती टक्के वाढ झाली ?
उत्तर --- 25 %
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775  / 7721941496


Sunday, 17 May 2026

भूगोल - सामान्यज्ञान प्रश्नावली

(१) भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र
-----------------------------------
(२) भारताच्या पूर्वेस कोणता उपसागर आहे ?
उत्तर -- बंगालचा उपसागर
-----------------------------------
(३) भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे ?
उत्तर -- हिंदी महासागर
----------------------------------
(४) पृथ्वीवर किती खंड आहेत ?
उत्तर -- सात
----------------------------------
(५) जगातील सर्वांत मोठा खंड कोणता ?
उत्तर -- आशिया
----------------------------------
(६) कोणता खंड आकारमानाने सर्वांत लहान आहे ?
उत्तर -- ऑस्ट्रेलिया 
----------------------------------
(७) आकारमानाने भारत देशातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर -- राजस्थान
----------------------------------
(८) गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते ?
उत्तर -- जयपूर
----------------------------------
(९) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -- गंगा
----------------------------------
(१०) भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ?
उत्तर -- मौसिनराम
----------------------------------
(११) माऊंटअबु हे थंड ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान 
----------------------------------
(१२) भारतात सर्वात लांब पश्चिमवाहीनी नदी कोणती ?
उत्तर -- नर्मदा
----------------------------------
(१३) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात
----------------------------------
(१४) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- यमुना
----------------------------------
(१५) गरबानृत्य ही कोणत्या राज्यातील सांस्कृतिक कला आहे ?
उत्तर -- गुजरात
----------------------------------
(१६) सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- अमृतसर 
----------------------------------
(१७) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र
----------------------------------
(१८) महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात आहे ?
उत्तर -- पश्चिम
----------------------------------
(१९) महाराष्ट्र राज्याच्या राजधानीतचे नाव काय ?
उत्तर -- मुंबई
----------------------------------
(२०) कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर -- १ मे
----------------------------------
(२१) गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर -- दक्षिण दिशेला 
----------------------------------
(२२) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
----------------------------------
(२३) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
----------------------------------
(२४) कळसूबाई शिखराची उंची किती आहे ?
उत्तर -- १६४६ मीटर 
----------------------------------
(२५) कोकणातील नद्या कोणत्या समुद्रास मिळतात ?
उत्तर -- अरबी समुद्र 
----------------------------------
(२६) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर -- गंगापूर ( नाशिक )
----------------------------------
(२७) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे ?
उत्तर -- ७२० किलोमीटर
----------------------------------
(२८) तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे ?
उत्तर -- अणुऊर्जा
----------------------------------
(२९) पांढरे सोने कशास म्हटले जाते ?
उत्तर -- कापूस 
----------------------------------
(३०) मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- वाघ
----------------------------------
(३१) रंकाळा तलाव कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर
----------------------------------
(३२) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे ?
उत्तर -- कृष्णराव साबळे
----------------------------------
(३३) महाराष्ट्रातील सर्वांत पूर्वेकडील जिल्हा कोणता ?
उत्तर -- गडचिरोली
----------------------------------
(३४) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- लाकडी खेळणी
----------------------------------
(३५) पंढरपूर शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे ?
उत्तर -- चंद्रभागा ( भिमा )
----------------------------------
(३६) जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी
----------------------------------
(३७) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर -- राहाता 
----------------------------------
(३८) लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- पुणे
----------------------------------
(३९) पालघर जिल्ह्यात डहाणू - घोलवड भागात प्रसिद्ध फळ कोणते ?
उत्तर -- चिकू
----------------------------------
(४०) महाराष्ट्रात हळदीचे पीक कोणत्या जिल्ह्यात अधिक होते ?
उत्तर -- सांगली 
----------------------------------
(४१) सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होवू शकते ?
उत्तर -- अमावस्या 
----------------------------------
(४२) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
उत्तर -- ग्रिनलॅंड 
----------------------------------
(४३) दिशांचा वापर कशासाठी होतो ?
उत्तर -- स्थान निश्चिती करण्यासाठी
----------------------------------
(४४) पृथ्वीवर किती महासागर आहेत ?
उत्तर -- चार 
----------------------------------
(४५) जगातील सर्वात लहान महासागर कोणता ?
उत्तर -- आर्क्टिक महासागर
----------------------------------
(४६) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
उत्तर -- प्रशांत महासागर ( पॅसिफिक महासागर )
----------------------------------
(४७) समुद्र सपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत‌शिखराची उंची किती आहे ?
उत्तर -- ८८४८ मीटर
----------------------------------
(४८) हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहेत ?
उत्तर -- जपान
----------------------------------
(४९) पाकिस्तान देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- इस्लामाबाद
----------------------------------
(५०) पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग जमिनीने व्यापला आहे ?
उत्तर --  २९ %
----------------------------------
(५१) पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे
उत्तर -- ७१ %
----------------------------------
(५२) अंदमान निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे ?
उत्तर -- भारत
----------------------------------
(५३) जगातील उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या‌ देशात आहे ?
उत्तर -- दुबई 
-----------------------------------
(५४) भारताची भूसीमा शेजारील किती राष्ट्रांना भिडलेली आहे ?
उत्तर -- सात
------------------------------------
(५५) सरदार सरोवर धरण गुजरातमधील नवगामजवळील ..... येथे आहे.
उत्तर -- केवाडिया 
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि.धुळे
९४२२७३६७७५  /  ७७२१९४१४९६

भाषिक सामान्यज्ञान

✓✓ समूहदर्शक शब्द 

(१) आंब्यांच्या झाडांची ----- राई 

(२) पालेभाजीची ----- गड्डी / जुडी 

(३) गवताचा ---- भारा 

(४) द्राक्षांचा ----- घड, घोस 

(५) माणसांचा ----- जमाव

(६) मेंढ्यांचा ----- कळप 

(७) पक्ष्यांचा ----- थवा 

(८) पुस्तकांचा ----- गठ्ठा 

(९) वह्यांचा ------ गठ्ठा 

(१०) केळ्यांचा ----- लोंगर / घड 

(११) किल्ल्यांचा ----- जुडगा 

(१२) गुरांचा ---- कळप 

(१३) नारळांचा ---- ढीग

(१४) केसांची ---- बट , जट 

(१५) गवताची ---- गंजी, पेंढी 

(१६) भाकरीची ----- चवड 

(१७) हत्तींचा ----- कळप 

(१८) विमानांचा ----- ताफा 

(१९) विटांचा ----- ढीग 

(२०) लाकडांची ----- मोळी 
===========================

✓✓ थोर व्यक्तींची संबोधने 

(१) वल्लभभाई पटेल 
---- सरदार, लोहपुरुष

(२) बाळ गंगाधर टिळक 
----- लोकमान्य

(३) जवाहरलाल नेहरू
 ---- पंडित, चाचा

(४) दादाभाई नौरोजी
----- पितामह

(५) जोतीबा फुले 
----- महात्मा

(६) रवींद्रनाथ टागोर 
----- गुरुदेव

(७) सुभाषचंद्र बोस 
----- नेताजी 

(८) मोहनदास करमचंद गांधी 
----- महात्मा, राष्ट्रपिता 

(९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
----- भारतीय घटनेचे शिल्पकार 

(१०) विनायक दामोदर सावरकर 
----- स्वातंत्र्यवीर 
===========================

✓ लेखक -- कवी व ग्रंथ 

(१) महर्षी वाल्मीकी ----- रामायण 

(२) महर्षी व्यास ----- महाभारत, भगवदगीता

(३) संत ज्ञानेश्वर --- भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी )

(४) संत तुकाराम ----- अभंगगाथा 

(५) संत एकनाथ ---- भावार्थ रामायण 

(६) संत रामदास ---- दासबोध 

(७) आचार्य विनोबा भावे --- गीताई 

(८) साने गुरुजी ---- श्यामची आई 

(९) वि. स. खांडेकर ---- ययाति 

(१०) लोकमान्य टिळक --- गीतारहस्य 
===========================

✓ लेखक - कवी व त्यांची टोपणनावे :

(१) नारायण सूर्याजी ठोसर ---- संत रामदास

(२) कृष्णाजी केशव दामले ---- केशवसुत

(३) त्र्यंबक बापूजी ठोंबरे --- बालकवी

(४) मुरलीधर नारायण गुप्ते ---- बी

(५) राम गणेश गडकरी ----- गोविंदाग्रज

(६) प्रल्हाद केशव अत्रे ----- केशवकुमार

(७) विष्णू वामन शिरवाडकर ----- कुसुमाग्रज

(८) यशवंत दिनकर पेंढारकर --- यशवंत

(९) शंकर काशिनाथ गर्गे ---- दिवाकर

(१०) गोविंद विनायक करंदीकर ---- विंदा करंदीकर

(११) आत्माराम रावजी देशपांडे ----- अनिल

(१२) मुरलीधर देविदास आमटे ---- बाबा आमटे

(१३) डेबूजी झिंगराजी जानोरकर ----  संत गाडगेबाबा

(१४) गजानन दिगंबर माडगुळकर – गदिमा
================================

✓  थोर समाजसुधारक :

(१) महात्मा फुले ---- स्त्री-शिक्षणाचा पाया

(२) लोकमान्य टिळक --- भारतीय असंतोषाचे जनक

(३) महात्मा गांधी ---- अहिंसेचे पूजक

(४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर --- दलितोद्धार

(५) कर्मवीर भाऊराव पाटील -- रयत शिक्षण संस्था

(६) राजर्षी शाहू महाराज --- दलित वसतिगृह

(७) गोपाळ गणेश आगरकर --- 'सुधारक' नावाचे वृत्तपत्र

(८) आचार्य विनोबा भावे ---- भूदान चळवळ

(९) सरदार वल्लभभाई पटेल -- संस्थाने खालसा

(१०) डॉ. बाबा आमटे ---- कुष्ठरोग निर्मूलन / आनंदवन
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गरताड गावठाण 
केंद्र --- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Tuesday, 12 May 2026

श्री. शंकर चौरे, सौ. चंदना चौरे यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील बालमित्रांकरिता २३०सामान्यज्ञान प्रश्नावली.

(१ ) जानेवारी महिन्याचे दिवस किती असतात ?
उत्तर --- ३१ दिवस 
---------------------------------
(२) जून महिन्याचे दिवस किती असतात ?
उत्तर --- ३० दिवस 
---------------------------------
(३) एप्रिल नंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --- मे
---------------------------------
(४) जुलैच्या अगोदर कोणता महिना येतो ?
उत्तर --- जून 
---------------------------------
(५) डिसेंबर नंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --- जानेवारी
---------------------------------
(६) चैत्र महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --- वैशाख
---------------------------------
(७) आषाढ महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --- श्रावण 
---------------------------------
(८) माघ महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --- फाल्गुन 
---------------------------------
(९) वैशाख महिन्यापूर्वी कोणता महिना येतो ?
उत्तर --- चैत्र 
---------------------------------
(१०) फाल्गुन महिन्यानंतर कोणता महिना येतो ?
उत्तर --- चैत्र 
---------------------------------
(११) मार्च हा वर्षाचा कितवा महिना आहे ?
उत्तर ---  तिसरा 
---------------------------------
(१२) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- सात 
-----------------
(१३) आकाशाचा रंग कोणता ?
उत्तर -- निळा
-----------------
(१४) तीळगुळ कोणत्या सणाला वाटतात ?
उत्तर -- मकरसंक्रांत 
----------------------------
(१५) बैलांची पूजा कोणत्या सणाला करतात ?
उत्तर -- पोळा 
----------------------------
(१६) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड 
---------------------------
(१७) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा
-----------------------------
(१८) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर  -- कमळ
-----------------------------
(१९) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर  -- मोर
-----------------------------
(२०)भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
-----------------------------
(२१) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी
-----------------------------
(२२) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन
-----------------------------
(२३) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर -- वंदे मातरम् 
-----------------------------
(२४) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
-----------------------------
(२५) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा
-----------------------------
(२६) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
-----------------------------
(२७) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- शेंगदाणा
----------------------------------------------
(२८) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत ?
उत्तर -- ३६
-----------------------------
(२९) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
-----------------------------
(३०) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?
उत्तर -- आंबा
-----------------------------
(३१) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
-----------------------------
(३२) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
-----------------------------
(३३) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर --- कळसुबाई
--------------------------------
(३४) आपला राष्ट्रध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा
----------------------------------
(३५) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड
--------------------------------
(३६) आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
--- शहामृग
----------------------------------
(३७) एका दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- २४ तास 
-----------------------------------
(३८) नाताळचा सण कोणत्या महिन्यात असतो ?
उत्तर -- डिसेंबर 
----------------------------
(३९) पक्ष्यांना किती पाय असतात ?
उत्तर -- दोन 
----------------------------
(४०)कोणता पक्षी पिसारा फुलवून नाचतो ?
उत्तर -- मोर 
----------------------------
(४१) लांब मानेचा प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ 
----------------------------
(४२) सर्वांत मोठ्या कानांचा प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती 
----------------------------
(४३) वाळवंटात राहणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- उंट 
----------------------------
(४४) झाडावर तुरूतुरू चढणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- खार 
----------------------------
(४५) लांब पिसे असलेला प्राणी कोणता ?
उत्तर -- मोर 
----------------------------
(४६) गूळ कशापासून तयार होते ?
उत्तर -- ऊस 
----------------------------
(४७) साखर कशापासून तयार होते ?
उत्तर -- ऊस 
----------------------------
(४८) हरभ-याच्या पिठाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेसन 
----------------------------
(४९) पोपटाचा रंग कसा असतो ?
उत्तर -- हिरवा 
----------------------------
(५०) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे 
-----------------------------
(५१) कोंबडीच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे 
-----------------------------
(५२) चिमणीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे 
-----------------------------
(५३) सिंहाच्या निवा-यास काय म्हणतात ?
उत्तर -- गुहा 
-----------------------------
(५४) माणसाच्या निवा-यास  काय म्हणतात ?
उत्तर -- घर 
-----------------------------
(५५) वाघाच्या निवा-याला काय म्हणतात ?
उत्तर -- गुहा 
-----------------------------
(५६) गाई - गुरांना बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ?
उत्तर -- गोठा 
-----------------------------
(५७) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा 
-----------------------------
(५८) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ 
-----------------------------
(५९) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा 
-----------------------------
(६०) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- बेट 
-----------------------------
(६१) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर --  हंबरणे 
-----------------------------
(६२) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे 
-----------------------------
(६३) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू
-----------------------------
(६४) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु 
-----------------------------
(६५) वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- बच्चा , बछडा 
-----------------------------
(६६) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू 
-----------------------------
(६७) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पाडस,  शावक 
-----------------------------
(६८) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू 
-----------------------------
(६९) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पिल्लू 
-----------------------------
(७०) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- छावा 
-----------------------------
(७१) मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- कोकरू 
-----------------------------
(७२) गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरु 
----------------------------
(७३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते  ?
उत्तर -- आंबा 
-----------------------------
(७४) कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?
उत्तर -- काळा
------------------------------
(७५) सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे  .... होते ?
उत्तर --- बाष्पीभवन
-------------------------------
(७६) ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ?
उत्तर --- सूर्य
-------------------------------
(७७) विमानांचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- राईट बंधू 
-------------------------------
(७८) कोळी या किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
-----------------------------
(७९) ' खजूर ''  या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक
-----------------------------
(८०) फांद्या नसलेल्या एका वनस्पतीचे नाव सांगा ?
उत्तर -- नारळ
-----------------------------
(८१) घरटी न बांधणा-या एका पक्ष्याचे नाव सांगा ?
उत्तर --  कोंबडी
-----------------------------
(८२) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर --- कोळी
-----------------------------
(८३) सोंड असलेला प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती
-----------------------------
(८४) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- कुत्रा
-----------------------------
(८५) शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- बैल
-----------------------------
(८६) पाय नसणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- साप
-----------------------------
(८७) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वटवाघूळ
-----------------------------
(८८) सहा पाय असणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- झुरळ
-----------------------------
(८९) सजीवांचे दोन गट कोणते ?
उत्तर -- प्राणी व वनस्पती 
----------------------------
(९०) आकाशात चांदण्या केव्हा दिसतात ?
उत्तर -- रात्री 
---------------------------------
(९१) बैलाच्या मादीला काय म्हणतात ?
उत्तर -- गाय
---------------------------------
(९२) कोकिळेने केलेला आवाज कोणता ?
उत्तर --  कुहूकुहू
---------------------------------
(९३) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो ?
उत्तर -- पिवळा
---------------------------------
(९४) आवळ्याची चव कशी असते ?
उत्तर -- तुरट
---------------------------------
(९५)  लिंबाची चव कशी असते ?
उत्तर -- आंबाट
--------------------------------
(९६) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ
-------------------------------------
(९७) मिठाची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
-----------------------------------------
(९८) गुळाची चव कशी असते ?
उत्तर -- गोड
-----------------------------------------
(९९) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट
-----------------------------------------
(१००) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू
-----------------------------------------
(१०१) कावळ्याचा रंग कसा असतो ?
उत्तर -- काळा
-----------------------------------------
(१०२) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई
----------------------------------------
(१०३) भारत देशाची राजधानी कोणती ?
उत्तर -- दिल्ली
-------------------------------------
(१०४) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?
उत्तर -- सत्यमेव जयते.
------------------------------------
(१०५) आपण कोणत्या देशात राहतो ?
उत्तर -- भारत
------------------------------------
(१०६) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
------------------------------------
(१०७) भारताच्या शेजारी किती देश आहेत ?
उत्तर -- ७ ( सात )
-----------------------------------
(१०८) एक दिवस म्हणजे किती तास ?
उत्तर -- २४ तास
----------------------------------
(१०९) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- १२ (बारा )
------------------------------------
(११०) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ?
उत्तर -- राज्य
-----------------------------------
(१११) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
----------------------------------
(११२) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
--------------------------------
(११३) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर -- पूर्व
---------------------------------
(११४) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर -- पश्चिम
---------------------------------
(११५) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर -- पाच
---------------------------------
(११६) मुख्य दिशा किती ?
उत्तर -- चार
---------------------------------
(११७) उपदिशा किती ?
उत्तर -- चार
----------------------------------
(११८) आठवड्याचे वार किती ?
उत्तर -- सात
--------------------------------------
(११९) आकाशाचा रंग कोणता आहे ?
उत्तर -- निळा
--------------------------------------
(१२०) बी फळाच्या बाहेर असणारे कोणते फळ आहे ?
उत्तर -- काजू
-----------------------------------
(१२१) आईच्या आईला काय म्हणतात ?
उत्तर -- आजी
---------------------------------
(१२२) महाराष्ट्राचा राज्यफूल कोणता ?
उत्तर -- जारूळ
------------------------------
(१२३) महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
उत्तर -- अरबी
------------------------------------
(१२४) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात ?
उत्तर -- नारळ ( माड )
--------------------------------
(१२५) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?
उत्तर -- मराठी
-----------------------------
(१२६) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?
उत्तर -- हिरवा
--------------------------------
(१२७) महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी
-------------------------------
(१२८) भारताचे राष्ट्रीय वॄक्ष कोणते ?
उत्तर -- वड
---------------------------------
(१२९) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते ?
उत्तर -- रूपया
-----------------------------------
(१३०) पृथ्वीचा आकार कसा आहे ?
उत्तर -- गोल
---------------------------------
(१३१) ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- पौर्णिमेची रात्र
------------------------------
(१३२) भारतीय सौर वर्षाचे महिने किती ?
उत्तर -- बारा महिने
-------------------------------
(१३३) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी
------------------------------
(१३४) पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?
उत्तर -- सूर्यापासून
------------------------------
(१३५) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ?
उत्तर -- पृथ्वी
---------------------------------
(१३६) पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर -- पश्चिम
------------------------------
(१३७) दक्षिण दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?
उत्तर -- उत्तर
------------------------------
(१३८) सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- पूर्व
--------------------------------
(१३९) सूर्य ज्या दिशेला मावळतो ती दिशा कोणती ?
उत्तर -- पश्चिम
------------------------------------
(१४०) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिन
-----------------------------
(१४१) सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
उत्तर -- रात्र
----------------------------------
(१४२) दिन व रात्र मिळून एक पूर्ण काय होतो ?
उत्तर -- पूर्ण दिवस
---------------------------------
(१४३) मराठी वर्षांची सुरूवात कोणत्या महिन्याने होते ?
उत्तर -- चैत्र
--------------------------------
(१४४) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय
------------------------------
(१४५) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- आठळी
--------------------------------
(१४६) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- सरकी
----------------------------------
(१४७) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- चिंचोका
-------------------------------------
(१४८) कोणत्या फळापासून आमरस तयार होतो ?
उत्तर -- आंबा
------------------------------------
(१४९) पारंब्या कोणत्या झाडाला असतात ?
उत्तर -- वड
----------------------------------
(१५०) जिभेचा कोणता रंग चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे ?
उत्तर -- गुलाबी
-------------------------------
(१५१) श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात?
उत्तर --ऑक्सिजन वायू
----------------------------------
(१५२)समुद्राच्या पाण्याची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
-----------------------------------
(१५३) ' लाल किल्ला ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली
----------------------------------
(१५४) ' ताजमहल ' कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- आग्रा
----------------------------------
(१५५) सर्वात जास्त बुध्दिमान प्राणी कोणता ?
उत्तर -- मनुष्य
------------------------------------
(१५६) दगडावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात ?
उत्तर -- शिलालेख
-----------------------------------
(१५७) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-----------------------------------
(१५८) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
------------------------------------
(१५९) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- अमावास्येची रात्र
-------------------------------------
(१६०) एक डझनमध्ये किती वस्तू असतात ?
उत्तर -- १२

(१६१) आपण कोणत्या देशात राहतो ?
उत्तर -- भारत 
----------------------------
(१६२) आपण कोणत्या राज्यात राहतो ?
उत्तर -- महाराष्ट्र 
----------------------------
(१६३) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड 
----------------------------
(१६४) मुख्य ऋतू किती ?
उत्तर -- तीन 
----------------------------
(१६५) ' मुंगी ' या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
----------------------------
(१६६) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- बारा 
----------------------------
(१६७) एका वर्षात एकूण किती दिवस असतात ?
उत्तर -- ३६५
----------------------------
(१६८) एक दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- २४ तास 
----------------------------
(१६९) मानवी रक्ताची चव कशी असते ?
उत्तर -- खारट
----------------------------
(१७०) दर मिनिटाला मानवी हृदय किती वेळा धडधडते ?
उत्तर -- ७२ वेळा
----------------------------
(१७१) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?
उत्तर -- कानाचे हाड
----------------------------
(१७२) प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
उत्तर -- २०६
----------------------------
(१७३) मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
उत्तर --  मांडीचे हाड ( फिमर )
----------------------------
(१७४) मानवाच्या छातीच्या पिंजऱ्यात किती हाडे असतात ?
उत्तर -- २४
----------------------------
(१७५) मानवाला आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर --  ५२
--------------------------------
(१७६) चवीचे प्रकार किती ?
उत्तर -- चार 
----------------------------
(१७७) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
----------------------------
(१७८) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?
उत्तर -- पाच 
----------------------------
(१७९) नारळाच्या झाडाला काय म्हणतात ?
उत्तर -- माड
----------------------------
(१८०) समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
उत्तर -- मीठ
----------------------------
(१८१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय 
----------------------------
(१८२) पिकलेल्या केळ्याचा रंग कोणता ?
उत्तर -- पिवळा 
---------------------------------
(१८३) एका आठवड्यात किती दिवस असतात ?
उत्तर -- सात 
----------------------------     
(१८४) १  मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- ६० सेकंद
-----------------------------
(१८५)  १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे
-----------------------------
(१८६) सव्वा दोन वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर --- २ वाजून १५ मिनिटे 
---------------------------------
(१८७) दीड वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर --- १ वाजून ३० मिनिटे 
---------------------------------
(१८८) पावणेतीन वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर --- २ वाजून ४५ मिनिटे 
---------------------------------
(१८९ ) साडेपाच वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?
उत्तर --- ५ वाजून ३० मिनिटे 
---------------------------------
(१९०) पावशेर भाजी म्हणजे किती ग्रॅम भाजी ?
उत्तर --- २५० ग्रॅम 
---------------------------------
(१९१) १ महिना म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- ३० / ३१ दिवस 
-----------------------------
(१९२) डिसेंबर महिन्याचे किती दिवस असतात ?
उत्तर -- ३१ दिवस 
-----------------------------
(१९३) १  डझन केळी म्हणजे किती केळी  ?
उत्तर  -- १२ केळी 
-----------------------------
(१९४) एक अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १
------------------------------
(१९५) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- ९
-----------------------------------
(१९६) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
उत्तर -- १०
---------------------------------
(१९७) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- ९९
---------------------------
(१९८) १ तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- १०  ग्रॅम
----------------------
(१९९) १ रीम कागद म्हणजे किती कागद ?
उत्तर -- ४८० कागद
----------------------
(२००) १ फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर -- १२  इंच
----------------------
(२०१) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
----------------------
(२०२) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
--------------------------
(२०३) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
------------------------
(२०४) चौकोनाला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(२०५) आयताला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(२०६) चौरसाला बाजू किती असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(२०७) त्रिकोणाला बाजू किती असतात ?
उत्तर -- तीन
-----------------------------
(२०८) वर्तूळाचा आकार कसा असतो ?
उत्तर -- गोल
-----------------------------
(२०९)भुईमुगाच्या बियाणाला कोणत्या नावाने ओळखतात ?
उत्तर -- शेंगदाणा
-----------------------------
(२१०) सूर्य केव्हा उगवतो ?
उत्तर -- सकाळी
-----------------------------
(२११) सूर्य उगवण्याअगोदरची वेळ कोणती  ?
उत्तर -- पहाट
-----------------------------
(२१२) सूर्य आकाशात मध्यावर आल्याची वेळ कोणती ?
उत्तर -- दुपार
---------------------------------
(२१३) सूर्य मावळण्याची वेळ कोणती ?
उत्तर -- संध्याकाळ
-----------------------------
(२१४) उन्हाळ्यात हवा अशी असते ?
उत्तर --  गरम
-----------------------------
(२१५) हिवाळ्यात हवा कशी असते. ?
उत्तर. -- थंड
-----------------------------
(२१६) पावसाळ्यात हवा कशी असते. ?
उत्तर. --  दमट
------------------------------------------
(२१७) चवीचे प्रकार कोणते ?
उत्तर -- गोड, कडू, आंबट, खारट.
------------------------------------------
(२१८) ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?
उत्तर -- ज्ञान देणारे अवयव.
------------------------------------------
(२१९) आपल्याला किती ज्ञानेंद्रिये आहेत ?
उत्तर -- पाच
------------------------------------------
(२२०) ज्ञानेंद्रियांची नावे सांगा ?
उत्तर -- डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा.
------------------------------------------
(२२१) डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर -- पाहण्यासाठी.
------------------------------------------
(२२२) कानाचा उपयोग कशासाठी होतो ?
उत्तर -- ऐकण्यासाठी
------------------------------------------
(२२३) नाकाने आपल्याला कोणते ज्ञान होते ?
उत्तर -- वास घेणे.
------------------------------------------
(२२४) शरीरावरील कातडीला काय म्हणतात ?
उत्तर -- त्वचा
------------------------------------------
(२२५) त्वचेमुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे ज्ञान होते ?
उत्तर -- स्पर्शज्ञान
------------------------------------------
(२२६) दातांचा उपयोग कोणता ?
उत्तर -- अन्न चावून खाण्यासाठी.
---------------------------------
(२२७) श्वसन करताना सजीव कोणता वायू शरीरात घेतात ?
उत्तर -- ऑक्सिजन वायू 
---------------------------------
(२२८) कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ?
उत्तर -- अमावस्या 
---------------------------------
(२२९) आईच्या भावाला काय म्हणतात ‌?
उत्तर --- मामा 
---------------------------------
(२३०) काॅम्युटरचे मराठी नाव सांगा ?
उत्तर --- संगणक 
==========================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा गरताड (गावठाण), केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६