माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 27 November 2021

मराठी वाक्य वाचा आणि लिहा.



मी खेळतो.
मी खेळलो.
मी खेळणार.
मी खेळत आहे. 
मी खेळत होतो
मी खेळत असेल.
मी खेळलो आहे. 
मी खेळलो होतो.
मी खेळलो असेल.
मी खेळत आलेला आहे. 
मी खेळत आलेला होतो.
मी खेळत आलेला असेल.
मी खेळु शकतो.
मी खेळु शकलो.
मी खेळेन.
मी कदाचित खेळेन.
मी खेळेनच.
मी खेळायला पाहिजे.
मी खेळीन.
मी खेळायला पाहिजे. 
मी खेळु शकलो आहे.
मी खेळु शकलो असतो.
मी खेळलो असेल.
मी कदाचित खेळलो असेल.
मी खेळलो असेलच.
मी खेळायला पाहिजे होत.
मी खेळलो असतो.
मी खेळायला पाहिजे होत. 
मला खेळाव लागत.
मला खेळाव लागल. 
मला खेळाव लागेल.
मी खेळण्याच्या बेतात आहे.
मी खेळण्याच्या मार्गावर आहे. 
मी खेळण्याची शक्यता आहे.
मी खेळण्यास समर्थ आहे.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday, 26 November 2021

आपले संविधान ( भारतीय संविधान )



(१) भारतीय संविधान.

---- लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज होती. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेने स्वीकारलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली. भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात असून त्यात भारतीय नागरिकांचे हक्क स्पष्ट केलेले आहेत. तसेच नागरिकांची कर्तव्येही सांगितली आहेत. संविधानात 
दिलेल्या नियमांनुसार आपले प्रतिनिधी राज्यकारभार 
करतात.
-----------------------------------------------------
(२) संविधान सभा.

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी लिखित संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद हे या सभेचे अध्यक्ष होते. संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. या मसुदा समितीने संविधानाला अंतिम रूप दिल्यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले.
----------------------------------------------------
(३) भारतीय संविधान का निर्माण करण्यात आले?

----- आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी संविधान निर्माण करण्यात आले आहे. राज्यकारभार करताना लोकप्रतिनिधी संविधानातील नियमांचा आधार घेतात. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही. संविधानात नागरिकांचे हक्क व कर्तव्येही सांगितली असल्याने नागरिकांनाही संविधानाचा उपयोग होतो.
---------------------------------------------------
(४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 
----- संविधानातील नियमांचा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचे मोलाचे कार्य केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 25 November 2021

ट ' अक्षर मराठी भाषा शब्द संपत्ती (' ट ' अक्षर शब्द साखळी)



 टकटक . टकटका  टकटकी  टकणे  टकमक  टकमका
 टकल टकल्या टकळी टका टकारी टके टकोरा टक्कर 
टक्कल  टंगळमंगळ  टच  टचकन  टचका  टचटचणे
 टचटचीत  टंचाई  टणक   टणका  टणटण  टणत्कार 
टणाटण  टण  टप  टपकणे  टपकन  टपकळ  टपका 
 टपटप  टपाटप  टपणी  टपणे  टपला‌ टपली  टपाल
 टपोरा  टप्पल  टप्पा  टफ  टमक  टमका  टमटमीत 
 टर  टरकणे  टरकावणे  टरफल  टरबूज  टवकारणे
 टवटवी  टवटवीत  टवळी  टवाळ  टवाळखोर 
 टवाळकी  टवाळी  टवाळगिरी  टवाळे  टहाळी  
टळटळीत  टळण
----------------------------------------------------------
 टाइप  टांक  टाक  टाकणे  टांकसाळ  टाकळणे 
 टाकळा‌  टाकळी  टाका  टाकाऊ टाकाटाकी  टाकारी
 टाकी टांग‌ ‌टांगणे   टांगा  टाच  टांचण  टाचणी  टांचणे
 टांचा  टाटोळा  टाणाटोणा   टाप  टापटीप  टापरा  टापरी टापसा टापू   टामटूम  टारगट  टाहो  टाळ  टाळके  टाळणे टाळा  टाळाटाळ  टाळी  टाळू  टाळे
--------------------------------------------------------------
 टिकणे टिकला टिकली टिकविणे टिका टिकाऊ  टिकाव
 टिकी टिकु  टिकले  टिकोरा  टिक्का टिचकी टिचणे 
टिटवी टिपकणे टिपका टिपण  टिपणी टिपणे टिपणीस टिपरघाई टिपरी  टिपरु टिपू टिप्पण टिप्पणा टिंब
 टिपकणे टिबका टिमकी टिल्लू टिवल्या  टिळ टिळक
 टिळा टीक  टीका टीकाकार टीच टीप टुक टूकटूक
 टुपणे टुमटाम  टुमटूमीत  टुमदार  टूक  टूम
--------------------------------------------------------
 टेक  टेकडी  टेकण  टेकणे  टेका  टेकाडा  टेकडी
टेकावणे  टेकू  टेंगूळ  टेणपणे  टेणपा  टेणा  टेणे  
टेप  टेपण  टेपरणे  टेपरा  टेपरणे  टेंबरू  टेबल  टेंबा 
 टेंभा  टेंभेकरी  टेव   टेवा  टेहणी  टेहर  टेहलणे टेहळणे टेहळ्या  टोक  टोकण  टौकणे  टोकर  टोकळा टोका
  टोंग टोंगळ  टोच  टोचणी‌  टोचणे‌  टोचा   टोणका 
 टोणगा टोणगी.  टोणपा  टोणवा टोणी  टोप टोपकर
 टोपडे टोपण  टोपणे   टोपली   टोपा  टोपी . टोपीवाला टोमणा टोलणे टोलवाटोलव टोलविणे टोला टोलेजंग  
टोल्या टोळी  टौकारणे  ट्रक
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५