माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 7 July 2023

कालमापन सामान्यज्ञान (भौगोलिक माहिती )


(१) एका आठवड्याचे दिवस किती ?
उत्तर -- ७ ( सात)
---------------
(२) एका वर्षात किती महिने असतात ?
उत्तर -- १२ ( बारा)
----------------
(३) एका वर्षात साधारणतः किती दिवस असतात ?
उत्तर -- ३६५ दिवस 
----------------------------
(४) लीप वर्ष किती दिवसांचे असते ?
उत्तर -- ३६६ दिवस 
----------------------------
(५) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो ?
उत्तर -- २९ दिवस 
----------------------------
(६) कोणत्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ?
उत्तर -- अमावास्येची रात्र 
----------------------------
(७) पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे किती तास लागतात ?
उत्तर -- २४ ( चोवीस तास)
----------------------------
(८) पृथ्वीला स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात ?
उत्तर -- एक दिवस
----------------------------
(९) भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाची सुरुवात कोणत्या दिवशी होते ?
उत्तर -- २२ मार्च 
----------------------------
(१०) भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार लीप वर्षाची सुरुवात कोणत्या दिवशी होते ?
उत्तर -- २१ मार्च 
----------------------------
(११) भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?
उत्तर -- सौर कालगणनेवर आधारित 
----------------------------
(१२) कोणती दिनदर्शिका चांद्र कालगणनेवर आधारित आहे ?
उत्तर -- इस्लाम 
----------------------------
(१३) पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो, त्या रात्रीस कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर --  पौर्णिमेची रात्र 
----------------------------
(१४) पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती काळ लागतो ?
उत्तर -- एक वर्ष 
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Monday, 3 July 2023

गुरूजी तुमच्यामुळेच ........


गुरूजी तुमच्यामुळेच मी शाळेत जाते.
गुरूजी तुमच्यामुळेच मी वाचन करते.
गुरूजी तुमच्यामुळेच मी लेखन करते.
गुरूजी तुमच्यामुळेच मी भाषण करते. 
गुरूजी तुमच्यामुळेच मी नेतृत्व करते.
गुरूजी तुमच्यामुळेच मी नाविन्याचा शोध घेते.
गुरूजी तुमच्यामुळेच जागरूक झाली. 
गुरूजी तुमच्यामुळेच मी ज्ञानी झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच स्वावलंबी झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी जबाबदार झाली. 
गुरूजी तुमच्यामुळेच मी कष्टाळू झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी कार्यतत्पर झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी धीट झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी सुसंस्कृत झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी सुखी झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी कौतुकास पात्र झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी अभिमानी झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी प्रेरणादायी झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मी राष्ट्रपती झाली.
गुरूजी तुमच्यामुळेच मला दूरदृष्टी मिळाली.
गुरूजी तुमच्यामुळेच माझी प्रगती झाली. 
गुरूजी तुमच्यामुळेच माझ्या जीवनाला गती आली.

लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प.प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र- रोहोड 
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Sunday, 2 July 2023

जाणून घेऊया वैशिष्ट्यपूर्ण माहिती ( सोने, सूर्यफूल, कमळ, फणस, मधमाशी)


(१) सोने 

सोने हा मऊ, चमकदार व मौल्यवान धातू आहे.  सोनं कधीच गंजत नाही व वातावरणातील रसायनांचा त्यावर परिणाम होत नाही. म्हणून त्याचे दागिणे तयार केले जातात. सोने हे उत्तम विद्यूतवाहक आहे. अंतराळात सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरतात.
---------------------------------

(२) सूर्यफूल 

सूर्यफुल हे पिवळ्या व केशरी रंगाचे असते. त्याची फुले सूर्याच्या उगवत्या म्हणजेच पूर्वेला कललेली असतात. हे फुल आकाराने सूर्यासारखे दिसते. त्यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. या बिया पक्षांना खूप आवडतात. या बियांपासून तेल काढतात. 
---------------------------------

(३) कमळ

कमळाचे फूल हे दिसायला सुंदर व आकर्षक आहे. कमळ ह्या फुलाला आपल्या राष्ट्रीय फुलाचा मान देण्यात आला आहे. कमळाच्या दांड्या ह्या पोकळ असतात. त्यामध्ये हवा असल्याने त्या पाण्यावर अलगद तरंगतात. कमळाची पाने मोठमोठी असतात. त्या पानावर तेलकट आवरण असल्याने ती पाण्यात राहून देखील सडत नाही.
---------------------------------

(४) फणस 

फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाला बाहेरून काट्यासारखी अनेक टोके असतात. फणसाच्या आत गरे असतात. एका गऱ्यामध्ये एक बी असते. फणसाची भाजीसुद्धा करतात. फणस पिकल्यावर त्याचे गरे मधूर व गोड लागतात.
---------------------------------

(५) मधमाशी 

मधमाशी हा एक कीटक आहे. मधमाश्या बाराही महिने मेणाचे पोळे बनवतात. त्यात फुलांमधून शोषलेला रस मधाच्या स्वरूपात साठवून ठेवतात, हा मध म्हणजे मधमाशांचा अन्नसाठा होय. हा एकमेव कीटक आहे ज्याने साठविलेले अन्न मानव खातो. राणी माशी, कामकरी माशी व सैनिक माशी असे मधमाशीचे प्रकार आहेत. मध आरोग्यास उपयूक्त आहे.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा ( रोहोड)
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६