माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 20 April 2024

स्पर्धा परीक्षा प्रश्नावली ( गणित )


(1) 17 बदक, 17 मासे, 17 मिनिटात खातात तर 1 बदक, 1 मासा किती मिनिटात खाईल ?

उत्तर --- 17 मिनिटात
----------------------------------
(2) 6 मजूर एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 3 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

उत्तर --- 24 दिवस
----------------------------------
(3) 12 गायी 12 पेंढ्या, 3 मिनीटात खातात तर 3 गायी, 6 पेंढ्या किती मिनिटांत खातील ?

उत्तर --- 6 मिनिटात 
----------------------------------
(4) एक पाण्याचा हौद नळाने 12 तासात भरतो जर नळ 3 तास चालला तर हौदचा किती टक्के भाग भरेल ?

उत्तर ---  25 %
----------------------------------
(5) 3 तासात एक बस 120 किलोमीटर अंतर जाते, तर ती बस  60 मिनिटात किती किलोमीटर अंतर जाईल ?

उत्तर ---  40 किलोमीटर 
----------------------------------
(6) 9 मीटर लांबीची दोरी 9 ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

उत्तर ---   90 सेंटीमीटर 
----------------------------------
(7) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत,  अशा 24  पेटयातील
एकूण आंबे किती होतील ?

उत्तर --- 576 आंबे 
----------------------------------
(8) 5 बगळे , 5 मासे, 5 मिनिटात खातात. तर 1 बगळा, 1 मासा किती मिनिटांत खाईल ?

उत्तर --- 5 मिनिट
----------------------------------
(9)  एक दोरी 9 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतील  ?

उत्तर --- 10 तुकडे
----------------------------------
(10)  एका शाळेत 75 % विद्यार्थी हजर आहेत आणि 50  विद्यार्थी गैरहजर आहेत, तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती ?

उत्तर --- 200  विद्यार्थी 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  /  7721941496

Friday, 19 April 2024

गणितीय प्रश्नावली ( शेकडावारी ) -- Percentage


(1) एका संख्येचे 25 %  म्हणजे 75 तर ती संख्या शोधा.

उत्तर --- 300
------------------------
(2) एका संख्येचे 50 % म्हणजे 40 तर ती संख्या शोधा.

उत्तर --- 80
----------------------------------
(3) एका संख्येच्या 50 % मधून 50 वजा केले असता, 50 उरतात. तर ती संख्या कोणती ?

उत्तर --- 200
----------------------------------
(4) फळबागेतील 160 झाडांपैकी 25 % झाडे आंब्यांची आहेत. तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत ?

उत्तर ---  120
----------------------------------
(5) एक संख्या 50 % नी वाढवली तेव्हा तीची किंमत 100 होते तर ती संख्या कोणती ?

उत्तर --- 50
----------------------------------
(6) एका शाळेतील मुलांची संख्या यावर्षी शेकडा 20 % ने कमी झाली. तर यावर्षी शाळेत 80 मुले असतील तर गेल्यावर्षी किती मुले होती ?

उत्तर --- 100
----------------------------------
(7)  A चा पगार हा B च्या पगारापेक्षा 50 % नी जास्त आहे.
 तर B चा पगार 4000 हजार आहे. तर A चा पगार किती ?

उत्तर --- 8000
----------------------------------
(8) जर एका संख्येतून त्या संख्येचे 75 % वजा केले तर उत्तर 50 मिळते. तर ती संख्या कोणती ?

उत्तर --- 200
----------------------------------
(9) सुप्रिया चौरे एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होती. तिची वर्षातील उपस्थिती 90 % असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ?

उत्तर --- 220
----------------------------------
(10)  2000 चे 25 % किती ?

उत्तर ---  500
----------------------------------
(11) 20 लीटर दुधामध्ये 25 % पाणी आहे, तर त्यामध्ये दुधाचे प्रमाण किती ?

उत्तर ---  15 लीटर दूध 
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  /  7721941496

Thursday, 18 April 2024

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१)भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय आहे ?
उत्तर --- संसद

(२) भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे ?
उत्तर --- राष्ट्रपती

(३) भारताच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात ?
उत्तर --- राष्ट्रपती 

(४) भारताच्या राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
उत्तर -- भारताचे सरन्यायाधीश 

(५) भारत देशाला कधी स्वातंत्र्य मिळाले ?
उत्तर --- १५ आॅगस्ट १९४७ 

(६) राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
उत्तर -- राष्ट्रपती

(७) राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ?
उत्तर -- उपराष्ट्रपती 

(८)  भारताने कोणत्या शासनपध्दतीचा स्विकार केला आहे ?
उत्तर -- लोकशाही 

(९) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू

(१०) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर --- डॉ. राजेंद्र प्रसाद 

(११) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
उत्तर -- यशवंतराव चव्हाण 

(१२) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

(१३) डॉ. आंबेडकरांचे पूर्ण नाव सांगा.
उत्तर -- भिमराव रामजी आंबेडकर 

(१४) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा

(१५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर -- हाॅकी

(१६) मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
उत्तर -- दर्पण

(१७) प्रधानमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
उत्तर --- राष्ट्रपती

(१८) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर --- दिल्ली

(१९) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर --- मुंबई

(२०) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती  ?
उत्तर --- गंगा

(२१) ५० रूपयांच्या नोटेवर कोणाची सही असते ?
उत्तर --- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

(२२) भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?
उत्तर --- महात्मा गांधी

(२३) भारतातील पहिल्या आधार कार्ड धारक महिलेचे नाव सांगा ?
उत्तर --- रंजना सोनवणे

(२४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
उत्तर --- रविंद्रनाथ टागोर

(२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
उत्तर --- तोरणा

(२६) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर --- कल्पना चावला

(२७) दरवर्षी ख्रिसमस (नाताळ)सण किती तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर --- २५ डिसेंबर.

(२८) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर --- शेकरू

(२९) गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतो ‌?
उत्तर --- राज्य शासन

(३०) शीख धर्माचे संस्थापक कोण आहे ?
उत्तर --- गुरु नानक

(३१) भारताचा पहिला उपग्रह कोणता ?
उत्तर --- आर्यभट्ट

(३२) कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर --- १ मे 

(३३) मानवी शरीरात किती हाडे असतात ?
उत्तर ---- २०६

(३४) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
उत्तर --- अहमदनगर

(३५) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
उत्तर --- १ मे १९६०

(३६) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?
उत्तर --- ७२० किलोमीटर

(३७) भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे ?
उत्तर --- केरळ

(३८) ख्रिश्चन धर्मग्रंथाचे नाव काय आहे ?
उत्तर --- बायबल

(३९) राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान कोठे आहे ?
उत्तर --- सिंदखेडराजा,जि.बुलढाणा (महाराष्ट्र)

(४०) राष्ट्रपती भवन कोठे आहे ?
उत्तर --- दिल्ली

(४१) महाराष्ट्रामध्ये पोलीस अकॅडमी कोठे आहे ?
उत्तर --- नाशिक

(४२) महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?
उत्तर --- पोलीस महासंचालक

(४३) बीबी का मकबरा कोठे आहे ?
उत्तर --- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

(४४) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध शहर कोणते ?
उत्तर --- पुणे

(४५) इस्लाम धर्म ग्रंथाचे नाव काय आहे ?
उत्तर --- कुराण

(४६) महाराष्ट्रात कुस्ती केंद्र कोठे आहे ?
उत्तर --- कोल्हापूर

(४७) सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे ?
उत्तर --- आफ्रिका खंड

(४८) सुखकर्ता-दुखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिली ?
उत्तर --- रामदास स्वामी

(४९) भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?
उत्तर --- मुंबई

(५०) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर --- नाईल

(५१) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
उत्तर --- पॅसिफिक महासागर.

(५२) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे ?
उत्तर ---  हमिंग बर्ड

(५३) काळे खंड कोणत्या खंडास म्हटले जाते ?
उत्तर --- आफ्रिका

(५४) छत्रपती शाहू महाराजांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
उत्तर --- राजर्षी

(५५) "ग्रामगीता" या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
उत्तर --- राष्ट्रसंत तुकडोडी महाराज

(५६) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?
उत्तर --- सत्यमेव जयते

(५७) भारताचा पहिला अवकाश वीर कोण आहे ?
उत्तर --- राकेश शर्मा

(५८) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर --- सहारा.(आफ्रिका)

(५९) जगातील सर्वात लांब भिंत कोणती?
उत्तर --- चीनची भिंत

(६०) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?
उत्तर --- चार्ल्स बॅबेज

(६१) प्रसिद्ध दिक्षाभूमी कोणत्या शहरात आहे ?
उत्तर --- नागपूर

(६२) जगातील सर्वात मोठा देश कोणता?
उत्तर --- रशिया

(६३) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते?
उत्तर --- महाभारत

(६४) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर --- शहामृग

(६५) जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे ?
उत्तर --- व्हॅटिकन सिटी

(६६) उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
उत्तर --- जपान

(६७) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर --- त्र्यंबकेश्वर,नाशिक

(६८) चादरीकरिता प्रसिद्ध महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे ?
उत्तर --- सोलापूर

(६९) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?
उत्तर --- नेवासे

(७०) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे ?
उत्तर --- परमवीर चक्र

(७१) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?
उत्तर --- आरती शहा

(७२) "मिसाईल मॅन" या नावाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर --  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.

(७३) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर --- ज्ञानपीठ.

(७४) "शिक्षक दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर --- ५ सप्टेंबर

(७५) "अग्निपंख" या मूळ पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर --- डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

(७६) रयत शिक्षण संस्था ची स्थापना कोणी केली ?
उत्तर --- कर्मवीर भाऊराव पाटील

(७७) भारत देश कोणत्या खंडात आहे ?
उत्तर --- आशिया खंड

(७८) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?
उत्तर --- शांततेचा

(७९) राष्ट्रध्वजातील केसरी रंग कशाचे प्रतीक आहे ?
उत्तर -- त्याग व शौर्य

(८०) तांबे व जस्त यापासून कोणते संमीश्रण बनवतात?
उत्तर --- पितळ 

(८१) स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते ?
उत्तर --- मौलाना अबुल कलाम आझाद

(८२) परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते ?
उत्तर -- राष्ट्रपती

(८३) भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर --- अजिंठा

(८४) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?
उत्तर --- नेपाळ

(८५) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर --- दादासाहेब फाळके

(८६) भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षी प्राप्त होतो ?
उत्तर --- १८ वर्ष पूर्ण

(८७) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती  ?
उत्तर --- गंगा

(८८) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर --- पोरबंदर (गुजरात)

(८९) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर --- राष्ट्रपती

(९०) महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते ?
उत्तर --- गोपाळ हरी देशमुख

(९१) 'धन्वंतरी' पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर --- वैद्यकीय क्षेत्र

(९२)भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर ---  मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

(९३) ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
उत्तर --- बीड

(९४) चंदन वृक्षाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
उत्तर --- कर्नाटक 

(९५) भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर --- श्रीमती प्रतिभाताई पाटील.

(९६) भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर --- श्रीमती इंदिरा गांधी

(९७) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ? 
उत्तर --- ब्रेल लुईस

(९८) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते आहे ?
उत्तर --- ताजमहल (मुंबई)

(९९) संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
उत्तर --- ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.

(१००) महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर --- अमरावती

(१०१) वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण आहे ?
उत्तर --- जगदीशचंद्र बोस

(१०२) आपल्या भारताचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्यास अंदाज़े किती वेळ लागतो ?
उत्तर --- ५२ सेकंद

(१०३) नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
उत्तर --- कोलकाता

(१०४) सुप्रसिद्ध सालारजंग म्युझिअम कोठे आहे ?
उत्तर --- हैद्राबाद

(१०५) रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
उत्तर --- गुरूदेव
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌ शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६