माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 31 January 2022

जोडाक्षरी शब्दांचा मेळ, यमांचा खेळ



नष्ट  = कष्ट
घट्ट  = हट्ट
मस्त = अस्त
रास्त = जास्त
गुप्त = लुप्त
हास्य = दास्य
दृष्टी = वृष्टी
हट्टी  = पट्टी
तृष्णा = कृष्णा
केव्हा = तेव्हा
शुद्ध = युद्ध
किल्ला = बिल्ला
हल्ला = सल्ला
गल्ला = पल्ला
दिल्ली = किल्ली
सळ्या  = नळ्या
गब्बर = जब्बर
पन्हाळा = उन्हाळा
अक्कल = नक्कल
टक्कल = बक्कल
अक्का  = पक्का
सत्तर = उत्तर
को-या  = पो-या
चो-या = गो-या
पु-या = सु-या
खिन्न = भिन्न
मठ्ठ = लठ्ठ
पान्हा  = तान्हा
हत्ती  = बत्ती
रद्दी = हद्दी
थोड्या = जोड्या
वड्या = गड्या
पत्ता = सत्ता
तत्व  = सत्व
तथ्य  = पथ्य
खाद्य = वाद्य
गद्य = पद्य
चक्र  = वक्र
रात्र = मात्र
यंत्र = तंत्र
पुत्र = सुत्र
मंत्री = संत्री
यात्री = कात्री
हर्ष  = वर्ष
सर्प  = दर्प
गर्व  = पर्व
मर्द = गर्द
कर्ज  = अर्ज
तर्क = अर्क
गर्क = वर्क
खर्च = चर्च
धर्म  = कर्म
कार्य  = आर्य
सर्दी  = गर्दी
वर्तन = कर्तन
सार्थ = पार्थ
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता.साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 30 January 2022

माहात्म्य - थोरवी ( समानार्थी शब्द )



थोरवी महिमा माहात्म्य
धन संपत्ती द्रव्य

महा मोठा महान
पुत्र तनय नंदन

प्रणाम अभिवादन नमन
आठवण स्मृती स्मरण

पूजा  सेवा अर्चन
पद पाय चरण

पुष्प फूल सुमन
नमस्कार प्राणिपात वंदन

नेता पुढारी नायक
प्रजा रयत लोक

अन्याय जुलूम अत्याचार
काळजी आस्था फिकिर

कारागृह कैदखाना तुरुंग
समशेर तलवार खड्ग

ध्वज झेंडा निशाण
 खटाटोप धडपड प्रयत्न

राग क्रोध संताप
रोष त्वेष कोप

वैरी शत्रू दुश्मन
वध हत्या खून

रक्त शोणित रूधिर
ईश्वर प्रभू अमर
==========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक ‌)
       जिल्हा परिषद प्राथमिक - जामनेपाडा
      केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
     ९४२२७३६७७५

Saturday, 29 January 2022

महात्मा गांधी



    महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे नाव मोहनदास गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ला गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. लहानपणी मोहनदास अभ्यासात साधारण होते, पण त्यांच्या मनात आई वडिल व गुरूजनांविषयी अतोनात आदर होता. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू लागले.

     इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात आले. काही दिवस वकिली म्हणून काम केल्यावर एका खटल्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिका येथे जावे लागले. तेथे अनेक भारतीय व्यापारी आणि मजूर रहात होते. त्यांच्यावर फारच अन्याय होत असत. भारतीयांच्या हक्कासाठी अहिंसक लढा दिला. शेवटी त्याचा जय झाला.

    गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा येथे सुध्दा जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली. भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून बाहेर करण्यासाठी सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करण्याचा निर्धार केला. देशासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. गांधींचे संपूर्ण जीवन त्यागाचे होते. म्हणून त्यांना लोक 'बापू' म्हणत. तसेच त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.

    इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अहिंसा, असहकार, स्वदेशीचा वापर या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. 'चले जाव चळवळ, दांडी यात्रा अशा विधायक मार्गाचा वापर करून भारताला १५ आगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.

    देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी झाली. एका देशाचे दोन देश निर्माण झाले. • काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली. ते काळाच्या पडद्याआड गेले.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
   केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
   ९४२२७३६७७५