माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 28 February 2022

ज्ञानेंद्रिये ( सामान्यज्ञान )



(१) डोळे 
--- आपण डोळ्यांनी पाहतो. त्यामुळे चालताना आपल्याला उंच-सखलपणा, वळणे, अडथळे समजतात. आपण वाचू शकतो. टी. व्ही. बघू शकतो. दिसले नाही तर कितीतरी गोष्टींची माहिती आपल्याला होऊ शकणार नाही.

(२) कान
--- आपण कानांनी ऐकतो. आवाज कोठून आला त्यावरून आपल्याला दिशा कळते. बोललेले समजते. आपल्याला प्रश्न विचारल्यास ऐकू आल्यामुळे आपण उत्तर देऊ शकतो.

(३)नाक 
--- नाकाने आपण वास घेतो. काही पदार्थांना विशिष्ट वास असतो. वासावरून आपल्याला पदार्थ ओळखता येतात.

(४(जीभ 
 --- जिभेने आपण चव घेतो. जिभेच्या वेगवेगळ्या भागांमुळे गोड, आंबट, कडू, खारट व तुरट अशी चव समजते. तिखट ही चव नाही. जिभेच्या त्वचेची आग झाली तर पदार्थ तिखट आहे असे आपण म्हणतो.

(५) त्वचा/चामडी/कातडी 
---- त्वचेमुळे आपल्याला थंड, गरम, मऊ, खडबडीत, खरखरीत, धारदार, बोथट असे स्पर्शज्ञान होते.

डोळे, नाक, कान जीभ व त्वचा आपल्याला आजूबाजूची माहिती म्हणजेच ज्ञान देतात. म्हणूनच त्यांना ज्ञानेंद्रिये असे म्हणतात.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
      केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे

Sunday, 27 February 2022

स्वागतगीत (चौरे परिवार स्वागतगीत)



चौरे कुळाचे भाऊबद हे 
आले या नगरा
स्वागतम् सू स्वागतम्
हा मानाचा मुजरा

दहा दिशांनी भाऊबंद आले 
सभामंडपी स्वागत झाले
चौरे कुळात अपूर्व घडले 
चौरे कुळात अपूर्व घडले 
सावरल्या नजरा

स्वागतम् सू स्वागतम् 
हा मानाचा मुजरा

चौरे कुळाचे आम्ही उपासक 
कुणी भगत, कुणी साधक
भाऊबंद हो सारे कल्पक 
भाऊबद हो सारे कल्पक
वाडवडिलांना नमन करा

स्वागतम् सू स्वागतम 
हा मानाचा मुजरा

चौरे कुळाचे भाऊबंद हे
आले या नगरा
स्वागतम् सु स्वागतम
हा मानाचा मुजरा

कवी / लेखक :- शंकर ‌चौरे, सर 
काकरपाडा ता. साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
मार्गदर्शक :- श्री. महारू चौरे सर (पिंपळनेर)

Thursday, 24 February 2022

हवामान बदल ( सामान्यज्ञान )



१) उन्हाळ्यात जमीन जास्त तापते.

---- उन्हाळ्यात सूर्याचे किरण प्रखर असतात. दिवस मोठा असतो आणि ऊनही कडक असते. प्रखर सूर्यप्रकाश जास्त वेळ असल्यामुळे उन्हाळ्यात जमीन जास्त तापते.
-----------------------------
(२) हिवाळ्यात हवामान थंड असते. 

---- हिवाळ्यात ऊन कडक नसते. दिवस लहान असतात. प्रखर सूर्यप्रकाश आणि कडक ऊन नसल्यामुळे जमीन फारशी तापत नाही. त्यामुळे जमिनीलगतची हवाही फार तापत नाही. त्यामुळे हिवाळ्यात हवामान थंड असते.
-----------------------------------------------------------
(३)थंडीच्या दिवसात पहाटे धुके पडते. 

---- थंडीच्या दिवसात हवामानातील बदलांमुळे हवेतील पाण्याची वाफ एकदम थंड होते. अशामुळे वाफेचे पाणी होण्याऐवजी तिचे सूक्ष्म कण बनतात. हे कण हवेमध्ये तरंगत राहतात. अशा कणांनी वातावरण भरून गेल्यास धुके पडले असे म्हणतात. थंडीच्या दिवसात म्हणून पहाटेच्या थंड वेळी धुके पडते.
--------------------------------------------------------------
(४) हिमवर्षाव कसा होतो?

---- हवेमध्ये वाफेचे प्रमाण असते. उंचावरची वाफ एकदम थंड झाली की या वाफेपासून बर्फाचे लहान कण तयार होतात. या कणांचे पुंजके म्हणजेच हिमकण होय. हे पुंजके हळूहळू खाली येतात व यालाच हिमवर्षाव असे म्हणतात.
===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
        जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
        केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५