माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 31 July 2018

मापन -- लांबी


● लांबी :-
     लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित
     एकक आहे.

● उंची, लांबी मोजण्यासाठी सेंटिमीटर किंवा
   मीटर हे प्रमाणित एकक वापरतात.
     ही एकके मोजपट्टीवर व टेपवर दर्शवलेली
     असतात.

● मोठी अंतरे मोजण्यासाठी किलोमीटर हे
   प्रमाणित एकक वापरतात.

     १ मीटर  =  १०० सेंटिमीटर
     २ मीटर  =  २०० सेंटिमीटर
     ३ मीटर   = ३०० सेंटिमीटर
     ४ मीटर   =  ४०० सेंटिमीटर
     ५ मीटर   = ५००   सेंटिमीटर
     ६ मीटर   = ६००  सेंटिमीटर
     ७ मीटर   =  ७०० सेंटिमीटर
     ८ मीटर   =  ८०० सेंटिमीटर
     ९ मीटर   = ९०० सेंटिमीटर
     १० मीटर  = १००० सेंटिमीटर
     १२मीटर   = १२०० सेंटिमीटर
   --------------------------------------
     अर्धा मीटर  =  ५० सेंटिमीटर
      पाव मीटर  =  २५ सेंटिमीटर
      पाऊण मीटर = ७५ सेंटिमीटर
     सव्वा मीटर  = १२५ सेंटिमीटर
     दीड मीटर  = १५० सेंटिमीटर
     अडीच मीटर = २५० सेंटिमीटर
     पावणे तीन मीटर = २७५ सेंटिमीटर
     साडे पाच मीटर  = ५५० सेंटिमीटर
=======================
   १  किलोमीटर = १००० मीटर
   २ किलोमीटर  = २००० मीटर
   ३ किलोमीटर  = ३००० मीटर
   ४ किलोमीटर  = ४००० मीटर
   ५ किलोमीटर  = ५००० मीटर
   ६ किलोमीटर  = ६००० मीटर
   ७ किलोमीटर  = ७००० मीटर
   ८ किलोमीटर  = ८००० मीटर
   ९ किलोमीटर  = ९००० मीटर
  १० किलोमीटर  = १०,००० मीटर
   ------------------------------------------
   अर्धा किलोमीटर = ५०० मीटर
   पाव किलोमीटर  = २५० मीटर
   पाऊण किलोमीटर = ७५० मीटर
  सव्वा किलोमीटर   = १२५० मीटर
  दीड किलोमीटर    = १५०० मीटर
   अडीच  किलोमीटर = २५०० मीटर
  पावणे तीन किलोमीटर = २७५० मीटर
  साडे पाच किलोमीटर  = ५५०० मीटर
=========================
 
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
               धुळे  ¤ ९४२२७३६७७५ ¤

=========================

Monday 30 July 2018

माझा आवडता पाळीव प्राणी - गाय

                      निबंध
                                     
       गाय हा पाळीव प्राणी आहे. गाईचा रंग
पांढरा, तांबूस किंवा काळा असतो. तिला
दोन शिंगे असतात. तिचे शेपूट गोंडेदार
असते. गाईचे डोळे काळेभोर व टपोरे
असतात.
   गाय गवत व कडबा खाते. तसेच पेंड,
आंबोणही खाते. गुराखी गाईंना चरायला
रानातही नेतात. घरी गाईंना गोठ्यात बांधून
ठेवतात. गाईच्या ओरडण्याला  'हंबरणे '
असे म्हणतात.
     गाय हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे.
गाईपासून आपल्याला दूध मिळते. आपण
दुधापासून दही, ताक, लोणी व तूप बनवतो.
गाईच्या शेणापासून खत तयार करतात.
तसेच शेणाच्या गोव-या करून त्यांचा
जळण म्हणून उपयोग करतात.
  गाय स्वभावाने गरीब असते. गाय खूप
खूप उपयुक्त प्राणी आहे.
===========================
लेखन  :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                धुळे ९४२२७३६७७५

Sunday 29 July 2018

(भाषिक -उपक्रम) वाक्ये ( पहा, वाचा व लिहा.)


(१)  अजय करवत धर.
(२)  रमण बदक धर.
(३)  शबनम घर बघ.
(४)  अक्षय सरळ चल.
(५)  अमर धरण बघ.
(६)  अभय भजन कर.
(७)  गणपत झटपट चल.
(८)  अकबर दगड जमव.
(९)  अमर भरभर चल.
(१०) कमल सरबत कर.
(११) भरत दगड ढकल.
(१२) रतन करवत पकड.
(१३) नयन वरण कर.
(१४) अजय वजन कर.
(१५) अजय जलद पळ.
(१६) मदन झरझर उतर.
(१७) अहमद लवकर परत चल.
(१८) कमल गवत पटपट उचल.
(१९) गणपत झटपट वजन कर.
(२०) करण पटकन वर चढ.
(२१) अक्षय चटकन बस पकड.
(२२) रतन बटण बदल.
(२३) वरद खडक बघ.
(२४) जगन जग उचल.
(२५) रजत ढग बघ.
(२६) शरद नळ उचल.
(२७) भवन मजजवळ बस.
(२८) धवल जलद पळ.
(२९) शरण हळद बघ.
(३०) छगन हरण बघ.   
-----------------------------------------------           
(३१) रेखा कचरा उचल.
(३२) नेहा पेन दे.
(३३) तेजल बागेत गेली.
(३४) मुले खेळ खेळतात.
(३५) शेतकरी शेतात काम करतात.
(३६) उमेश बागेत गेला आहे.
---------------------------------------
(३७) शैला गावाला गेली.
(३८) नैना गाणे गात आहे.
(३९) सैनिक देशाचे रक्षण करतात.
(४०) कैलास सैरावैरा पळाला.
(४१) पैठण शहरात पैठणी मिळतात.
(४२) हैदर नळ चालू कर.
-----------------------------------------
(४३) मोना रोज शाळेत जाते.
(४४) मोहन रोज कामाला जातो.
(४५) सोपान ढोल वाजवतो.
(४६) कोमल गोड गाणे गाते.
(४७) जोरदार पाऊस झाला.
(४८) भोवरा गरगर फिरतो.
-----------------------------------------
(४९) गौतम कागद आण.
(५०) गौरव सनई वाजवतो.
(५१) कौतिकचे घर कौलारू आहे.
(५२) चौधरी शाईची दौत आण.
(५३) दौलतचे घर डौलदार आहे.
(५४) मौलाना नौदल अधिकारी आहे.
------------------------------------------
(५५) चिंतामण चिंता करू नका.
(५६) अंगणात सुंदर बाग आहे.
(५७) मुले रंग खेळू लागली.
(५८) घंटा घणघण वाजली.
(५९) होळी आली, रंगपंचमी आली.
(६०) हिवाळा संपला , थंडी संपली.
=========================
संकलक - शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               धुळे📞९४२२७३६७७५

Saturday 28 July 2018

परिसर - ज्ञान( दोन - दोन नावे सांगा)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
(१) उसळी कशाच्या असतात  ?
---  मटकी ,  वाटाणे
(२) लोणचे कशाकशाचे घालतात  ?
--- कैरी (आंबा) , लिंबू
(३) पापड कशाचे बनवितात  ?
---  उडीद ,  नाचणी( नागली )
(४) कोणते पदार्थ तळून खातात  ?
---  पापड ,  कुरड्या
(५) कोणते पदार्थ उकडून खातात  ?
---  रताळे ,  बटाटे
(६) तेल कशापासून तयार होते  ?
---  शेंगदाणे, सोयाबीन
(७) कंदमुळांची नावे सांगा  ?
---  रताळे ,  गाजर.
(८) आंबट पदार्थ सांगा ?
---  दही ,  ताक
(९) कडू पदार्थ कोणते ?
---  कारले ,  मेथी
(१०) पातळ पदार्थांची नावे सांगा  ?
---  दूध ,  पाणी
(११) धागे मिळणाऱ्या वनस्पती सांगा  ?
---  कापूस ,  केळ
(१२) शेंगा येणाऱ्या वनस्पती सांगा  ?
---  गवार ,  गुलमोहर
(१३) कठीण कवचाची फळे सांगा  ?
---  नारळ ,  कवठ.
(१४) एक बी असलेली फळे सांगा  ?
---  खजूर , आंबा
(१५) रंगीत फुले येणाऱ्या वनस्पती सांगा  ?
---  गुलाब ,  जास्वंद
(१६)वनांतून मिळणारी नैसर्गिक संपत्ती कोणती ?
---  लाकूड ,  मध.
(१७) गहू पासून तयार होणारे पदार्थ सांगा  ?
---  पाव ,  बिस्किटे.
(१८) वेलींची नावे सांगा  ?
---  काकडी ,  भोपळा.
(१९) काटेरी वनस्पतींची नावे सांगा  ?
---  बाभूळ ,  बोर.
(२०) फुलांपासून काय बनवतात  ?
---  माळा ( हार ) ,  अत्तर.
-----------------------------------------------
संकलक --
        शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक) 
धुळे  ९४२२७३६७७५

-----------------------------------------------

Friday 27 July 2018

ओळखा पाहू मी कोण  ?

(१) डोळ्याच्या जवळ माझे स्थान
      माझ्यामुळे असते आवाजाचे भान
(२) चुरूचुरू बोलते
      आंबट, गोड सांगते
      तोंडाच्या खोलीत
      वळवळत बसते .
(३) खमंग शेवेचा वास आला
     कोण म्हणतंय घराकडे चला  ?
(४) पांढरा पांढरा ससा, मऊ मऊ लागतो.
     कोण सांगतं तुम्हांला स्पर्श कसा असतो  ?
(५) पांढऱ्या पांढऱ्या अंगणात
     निळा,  काळा गोल
    जग तुम्हांला मीच दाखवतो
    माझ्याशिवाय आहेच कोण  ?
--------------------------------------------------
उत्तरे :- (१) कान,  (२) जीभ, (३) नाक
          (४) त्वचा,  (५) डोळा
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                धुळे.  ¤ ९४२२७३६७७५ ¤

   

Thursday 26 July 2018

वाचा व लक्षात ठेवा (सामान्यज्ञान)

(१)झाडे खूप उपयोग पडतात.
     झाडांपासून लाकूड मिळते.
     झाडापासून सावली मिळते
     झाडांपासून फळे मिळतात.
     झाडा - झुडपांना वनस्पती म्हणतात.
     भाजी,  भात, भाकरी, डाळी
     वनस्पतींपासून मिळतात.
-----------------------------------------

(२)पाणी खूप उपयोगी असते.
     पाणी शेतीसाठी वापरतात.
     पाणी पिण्यासाठी वापरतात.
     पाणी कपडे, भांडी धुण्यास वापरतात.
     पाणी अन्न शिजवताना वापरतात.
     पाणी वाया घालवू नये.
-------------------------------------------

(३)हवा आहे पण दिसत नाही.
    हवेला रंग नाही.
    पण आपल्याला हवा जाणवते.
    हवेने फुगा फुगतो.
    हवेने कपडे सुकतात.
    हवेने पापड सुकतात.
    जोराच्या हवेने झाडे पडतात.
-------------------------------------------

(४)चमचाभर मीठ घेतले .
     मिठाचे लहान लहान कण होते.
     मीठ आता पाण्यात घातले ते ढवळले.
     काही वेळाने मीठ विरघळले.
     चव घेतली तर पाणी खारट लागले.
------------------------------------------

(५)एका बाटलीत पाणी घेतले.
     छोटा दगड टाकला,तो विरघळला नाही.
     मीठ टाकले,ते लगेच विरघळले.
     रबर टाकला, पण विरघळला नाही.
     साखर टाकली, ती विरघळली.
     तुरटी टाकली,तीही विरघळली.
     तेल टाकले, पण विरघळले नाही.

=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                धुळे.  ¤ ९४२२७३६७७५ ¤

Wednesday 25 July 2018

अॅ , आॅ  युक्त शब्द

  ========================
 बॅट                  बाॅल             आॅगस्ट  

बॅटरी                काॅल           आॅक्टोबर

कॅन                  जाॅन            ऑफिस

 फॅड                 हाॅल              टाॅवेल

कॅरम                शाॅट              डाॅक्टर

मॅच                  बाॅक्स            लाॅटरी

गॅस                आॅफ              काॅलर

गॅप                  हाॅर्न               आॅरेज

कॅमल             बाॅडी             हॉस्पिटल
   
कॅलेंडर           डाॅल                बाॅटल
     
टोमॅटो              फाॅल              काॅटन
    
 फॅट                लाॅक              बॉर्डर

पॅक                 पाॅलिश          काॅटन  

अ‍ॅक्टर              राॅकेल             हाॅकी

मॅग्नेट                राॅकेट              टाॅय
     
मॅच                  आॅइल            जाॅईंट

 बॅग                 काॅमेडी             काॅक

कॅन्सर              काॅलेज           काॅइन

कॅप्सुल              जाॅब               स्टाॅल

फॅक्टरी            काॅफी            आॅडिटर

टॅक्स                साॅक्स             ट्राॅय

बॅक                 फाॅरेस्ट              फ्राॅय

गॅरंटी                टाॅस               लाॅयर

बाॅटल                बाॅड              टाॅनिक

जॅक                 लाॅस              काॅलम

बॅनर                  लाॅरी              पाॅकेट

अ‍ॅक्टर               फाॅल              कॉर्नर

ब्लँकेट             बाॅक्सिग           गाॅगल

डॅम                  फॉर्म                डाॅन
  ========================
संकलक :--
          शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
          जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
          केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
        📞९४२२७३६७७५ 

Tuesday 24 July 2018

सांगा सांगा झटपट उत्तर सांगा.

      विषय - गणित  ( उपक्रम )
=============================

(१)  ९ ची पुढची संख्या कोणती  ?

(२) १५ च्या मागची संख्या कोणती  ?

(३) १७ आणि १९ च्या मधील संख्या कोणती  ?

(४) २१ आणि २९ पैकी लहान संख्या कोणती  ?

(५) ४१ आणि ३९ पैकी  मोठी संख्या कोणती  ?

(६) ३३ च्या पुढची तिसरी संख्या कोणती  ?

(७)  २० पेक्षा  ५ ने मोठी संख्या कोणती  ?

(८) ५१ मध्ये ९ मिळवून येणारी संख्या कोणती ?

(९) २२ च्या पुढे ६ मोजून मिळणारी संख्या कोणती ?

(१०)  ७२ नंतरची ७ वी संख्या कोणती  ?

(११) ८५ पेक्षा  १० ने मोठी संख्या कोणती  ?

(१२) ९३  नंतर ७ वी संख्या कोणती  ?

(१३)  २८ च्या मागची तिसरी संख्या कोणती  ?

(१४) ३४ मध्ये किती मिळवले म्हणजे ४० होतील  ?

(१५)  ६० आणि किती मिळून ८०  ?

(१६) ९२ कितीने वाढवले म्हणजे एकूण ९९ होतील  ?

(१७) किती आणि ५० मिळून १००  ?

(१८) कितीमध्ये १००  मिळवल्यास १५० होतील  ?

(१९) ६० मधून किती कमी केले म्हणजे ३०उरतील ?

(२०) ७० वजा  किती बरोबर  २०  ?

(२१) कितीमधून १ कमी केल्यास ९९ उरतील  ?

(२२) किती वजा  ४०० बरोबर  १०० ?

(२३) बाकी ५० राहण्यासाठी २०० मधून किती काढावे  लागतील  ?

(२४) ८० पेक्षा  ९ कमी म्हणजे किती  ?

(२५ ) १७५ आणि २५ यांची बेरीज किती  ?
------------------------------------------------
उत्तरे :- (१) १०, (२) १४, (३) १८, (४) २१
(५) ४१, (६) ३६,(७) २५, (८) ६० (९) २८
(१०) ७९, (११) ९५, (१२) १००, (१३) २५
(१४) ६ , (१५) २० , (१६) ७ , (१७) ५०
(१८) ५०, (१९) ३०, (२०) ५०, (२१) १००,
(२२) ५००, (२३) १५०, (२४) ७१, (२५) २००
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
              केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

Monday 23 July 2018

शब्द ऐका व लिहा (श्रूतलेखन)

                   भाषिक -- उपक्रम     
■ इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गातील
    विद्यार्थ्यांना वाचन - लेखनाची गती
   वाढविण्यासाठी उपयुक्त शब्द.
■ खालील शब्द वाचा व वहीत लिहा.
●दोन अक्षरी शब्द --
कप  कण  कड  कळ  खण  खत  खळ  गर
गज   गट   घट   घड   घण   घळ  घर  चव 
चर   चल  छत   छळ  जय  जप  जन  झळ
झड   टर   ठग   ठक  डफ  ढग   तट   तप 
थर    दव  दळ   धन   धड   नळ   नथ  पट 
फळ  बस  बळ   भट  तण   यज्ञ  वड  गण 
वन   नऊ   मऊ  फड   यश  यम   क्षण  बघ
तन  पळ   भट  कर    मन   षट   पद  मत
-----------------------------------------------------
● तीन अक्षरी शब्द --
अभय  अक्षर  नयन  हसन  अजय  अमर
गरम    गवत   मगर   नगर   मदन   मदत  
नमन    रतन   भजन   मगन   तबक   रबर 
सरक   उखळ   कळप   कळस   कमळ
पळस   दळण   कडक   गजर   गजल खडक
जवळ  नजर   पकड  सहल  चरक  वळण
सरळ   दगड  वजन   अजय   सडक  रमण
बबन   नरम   इतर   उसळ   चपळ  नवल
रक्षण   उदय   एकक   धडक  लक्षण  अक्षय
सलग   भगत   चरस    भगत   सवत   उघड
इसम   नरक   नवस   चवड   भडक  सतत
फणस   मदत  मलम   चघळ   पदर  अजर
कनक    घटक   जगन तरल   तनय  भवन
मदन   मकर  रमल   रजत   वरद  सहज
---------------------------------------------------
● चार अक्षरी शब्द --
अकबर   अजगर   धनगर   करवत   दरवळ
पडवळ   जलचर   मनगट   गणपत   लवकर
गणपत   झरझर   थरथर   सरसर   वरचढ
कळकळ  बडबड  गडबड   पडवळ  पडझड
सरबत   अडगळ   अडसर   कसरत   गरकन
कणखर   उतरण   गटकन   मळकट  दणकन
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              ९४२२७३६७७५ (धुळे )

Sunday 22 July 2018

लोकमान्य टिळक


   लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ
गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म
२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील
चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव
केशव असे होते. पण  'बाळ ' हे टोपण नावच
कायम राहिले. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.
   लोकमान्य टिळक हे इंग्रज सरकारच्या
अन्यायी व पक्षपाती धोरणा विरूद्ध आवाज
उठविण्यात नेहमीच आघाडीवर होते. त्यासाठी
त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता.
    ' स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे '
हे त्याचे घोषवाक्य होते. .लोकांनी त्यांना
'लोकमान्य ' ही पदवी दिली. कारण त्यांनी
आपले सारे आयुष्य देशाच्या व देशबांधवांच्या
सेवेत घालविले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह
व चळवळी उभारली. त्यांनी 'केसरी ' व 'मराठा'
ही वर्तमानपत्रे सुरू केली. शिक्षणासाठी पुण्यात
' न्यू इंग्लिश स्कूल ' ही शाळा काढली.
लोकजागृतीसाठी  'सार्वजनिक' गणेशोत्सव'
व  'शिवजयंती' हे उत्सव सुरू केले.
   अनेक वेळा तुरुंगवास भोगूनही ते आपल्या
ध्येयापासून ढळले नाहीत.
   १ आॅगस्ट १९२० रोजी त्यांचे निधन झाले.
भारतातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             📞९४२२७३६७७५ (धुळे ) 

Saturday 21 July 2018

आम्ही जलचर

         (१)  मासा  🐟

  मासा हा एक जलचर प्राणी असून त्याच्या
वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. माश्याला
पापण्या नसल्याने तो डोळे उघडे ठेऊन
झोपतो. त्याला नाक नसते. तो कल्ल्याच्या
साहाय्याने पाण्यातला आॅक्सिजन ग्रहण
करतो. काही माश्यांच्या शरीरावर खवले
असतात. मासे पाण्यातील शेवाळ व इतर
वनस्पती खाऊन आपले पोट भरतात. तर
मोठमोठे मासे इतर जीवांना व लहान माश्यांना
खाऊन आपले पोट भरत असतात.

-------------------------------------------------

          (२) कासव  🐢

   कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या
पाठीवर जाड व टणक कवच असते.
धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला
कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर
अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो
चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो
वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे.
कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल
१०० वर्षापेक्षा जास्त आहे.

--------------------------------------------------

          (३)  बेडूक 🐸

   बेडूक हा पृष्ठवंशिय उभयचर व शीतरक्ताचा
प्राणी आहे. त्याची त्वचा पाणी ग्रहण करते.
म्हणून त्याला पाणी पिण्याची गरज भासत
नाही.  बेडूक हा त्वचेद्वारे श्वसन करतो.
अतिशय उष्ण हवामानात बेडूक स्वतःला
जमिनीत गाडून घेतात. व दीर्घ निद्रा घेतात.
बेडूक हा मांसाहारी असतो. नर बेडकाचा
आवाज घोगरा, खोल आणि मोठा असतो.
बेडकाच्या त्वचेमध्ये विषग्रंथी सुध्दा असतात.

--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             📞९४२२७३६७७५ (धुळे ) 

Friday 20 July 2018

भौमितिक आकृत्यांची माहिती

■ चौकोन :-
(१) चौकोनाला चार बाजू असतात.
(२) चौकोनाला चार कोन असतात.
(३) चौकोनाला चार शिरोबिंदू असतात.
    
  ■ आयत :-
(१) चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन
    असल्यास त्याला आयत म्हणतात.
(२)आयताला चार बाजू , चार कोन व चार
    शिरोबिंदू असतात.
(३) आयताच्या समोरासमोरील बाजू समान
       लांबीच्या असतात.

■ चौरस :-
  (१) चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन
   असून चारही बाजू सारख्याच लांबीच्या
  असतील तर तो चौरस असतो.

🔺 त्रिकोण :-
   (१) त्रिकोण ही एक तीन बाजू असलेली
        बंद आकृती आहे.
    (२) त्रिकोणाला तीन बाजू ,तीन कोन व
          तीन शिरोबिंदू असतात.

◾काटकोन :-
  (१)९०अंशाच्या मापाच्या कोनाला काटकोन
      म्हणतात.

◾लघुकोन :-
    (१) काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन
         म्हणतात.

◾विशालकोन :-
     काटकोनपेक्षा मोठ्या कोनाला विशालकोन
     म्हणतात.

■ समभूज त्रिकोण :-
    समभूज त्रिकोणाच्या तीनही बाजू समान
    लांबीच्या असतात.

■ समद्विभुज त्रिकोण :-
     समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान
     लांबीच्या असतात.

■ विषमभुज त्रिकोण :-
      विषमभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू भिन्न
      लांबीच्या असतात.

■ समभूज चौकोन :-
    एखाद्या चौकोनाच्या फक्त चारही बाजू
    सारख्या लांबीच्या असल्यास तो समभूज
   चौकोन होय.

   संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                     धुळे  - ९४२२७३६७७५

                          

Wednesday 18 July 2018

ऐका व सांगा / लिहा.

                    उपक्रम

● तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा सांगा./लिहा.

 संच -- १
  वारा वाहतो.
  आकाशात ढग येतात.
  मुसळधार पाऊस पडतो
  सगळीकडे पाणीच पाणी होते.
  सर्वांना आनंद होतो.
--------------------------------------------

संच -- २
  गावात घरे आहेत.
  गावाबाहेर शेती आहे.
  शेतात विहीर आहे.
  विहिरीत पाणी आहे.
  पाण्यात मासे आहेत.
-----------------------------------------

संच -- ३
  आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो.
  आम्ही पाण्याने अंघोळी करतो.
  आम्ही पाण्याने कपडे धुतो.
  आम्ही पाणी शेतीसाठी वापरतो.
  पाणी हे जीवन आहे.
----------------------------------------

संच -- ४
  ही पाहा माझी शाळा.
  शाळेभोवती बाग आहे.
  बागेत फुलांची झाडे आहेत.
  आम्ही झाडांना पाणी घालतो.
  आम्ही बागेतील गवत काढतो.
------------------------------------------

संच -- ५
  फळातील बिया खाली पडल्या.
  जमिनीत त्या रूजू लागल्या.
  पाऊस आला,  ऊन आलं.
  कोंबाचं मग झाड झालं.
-----------------------------------------
संकलक  :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
              📞९४२२७३६७७५(धुळे )

Tuesday 17 July 2018

लहानापासून मोठ्यापर्य॔त योग्य त्या क्रमाने लिहा/ सांगा.🎯

                 उपक्रम
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

(१)  आंबा, बोर,  चिकू,  फणस.

उत्तर :-  बोर,  चिकू,  आंबा,  फणस.
--------------------------------------------

(२) गाव,  शाळा,  वर्ग,  देश.

उत्तर :-  वर्ग,  शाळा,  गाव,  देश.
------------------------------------------
(३ ) ट्रक,  रिक्षा,  आगगाडी,  मोटार.

उत्तर :- रिक्षा,  मोटार,  ट्रक,  आगगाडी.
---------------------------------------------

(४ ) डबके,  विहीर, समुद्र,  तलाव.

उत्तर :- डबके,  विहीर,  तलाव,  समुद्र.
----------------------------------------------

(५) टाॅवेल,  हातरूमाल,  ओढणी,  साडी.

उत्तर :-  हातरूमाल,  टाॅवेल,  ओढणी, साडी.
---------------------------------------------------

(६ ) मोर,  चिमणी,  कावळा,  साळुंकी.

उत्तर :- चिमणी,  साळुंकी,  कावळा,  मोर.
------------------------------------------------

(७)  गाय ,  मांजर, कुत्रा, उंदीर.

उत्तर :- उंदीर, मांजर,  कुत्रा, गाय.
---------------------------------------------

(८)  कासव,  बेडूक,  मगर, कोळंबी

उत्तर :- झिंगा,  बेडूक, कासव,  मगर
------------------------------------------------

(९ ) काजवा,  ऊ ,  कोळी,  मुंगी.

उत्तर :-  ऊ,  मुंगी,  काजवा,  कोळी.
----------------------------------------------

(१०)बादलीभर, कपभर, तपेलीभर, पिंपभर

उत्तर - कपभर, तपेलीभर,  बादलीभर,पिंपभर.
--------------------------------------------------

संकलक  :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
              📞९४२२७३६७७५(धुळे )

Monday 16 July 2018

१  ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न


  ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬

(१ ) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या
      एकूण किती आहेत ?

---  ९

(२) १ ते १०० या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या
       एकूण किती आहेत ?

---  ९०

(३) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या
        एकूण किती आहेत  ?

--- १

(४) १  ते १०० या संख्यांमध्ये ११ वेळा येणारा
      अंक कोणता  ?

---  ०

(५)  १ ते १०० या संख्यांमध्ये २१ वेळा येणारा
      अंक कोणता  ?

---  १

(६)  १ ते १०० या संख्यांमध्ये ८ हा अंक किती
      वेळा येतो  ?

--- २०

(७) १ ते १०० या संख्यांमध्ये एककस्थानी ७
    हा अंक असलेल्या एकूण संख्या किती  ?

--- १०

(८) १ ते १०० या संख्यांमध्ये ० ते ९  हे अंक
    एकूण किती वेळा येतात  ?

--- १९२
--------------------------------------------------

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             📞९४२२७३६७७५(धुळे) 

Sunday 15 July 2018

एका शब्दात उत्तर सांगा   ( सामान्यज्ञान )

     
(१) नारळाच्या झाडाला काय म्हणतात  ?

--- माड

(२) कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात  ?

--- माड  (नारळ )

(३) माडाच्या फांदीला काय म्हणतात  ?

--- झावळी

(४)कोणत्या फळाची ' बी ' फळाच्या बाहेर असते ?
    
--- काजू

(५) ऊसापासून काय तयार करतात  ?

--- गूळ  / साखर

(६) कोणत्या गळिताच्या धान्याच्या शेंगा
    जमिनीत रोपाच्या मुळाशी येतात  ?

--- भुईमूग

(७) टोपल्या तयार करण्यासाठी कोणते झाड
      जास्त उपयोगाचे आहे  ?

--- बांबू

(८) कोकणात कोणते पीक जास्त पिकते  ?

--- तांदूळ

(९) कोणत्या झाडापासून खोबरे मिळते  ?

--- नारळ ( माड )

(१०) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे
       असलेले फळ कोणते  ?

---  फणस
--------------------------------------------------
संकलक :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक) धुळे
                ¤ ९४२२७३६७७५ ¤

Friday 13 July 2018

शब्दजोड्या वाचा व त्यातील विशेषण शोधा

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
● खालील शब्दजोड्या वाचा व त्यातील
  विशेषणे शोधा.

 ( नावाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या
  शब्दाला विशेष म्हणतात.
     उदा. :-निळे, दहा,गोड, कडू, उंच इ.)

(१) कडक ऊन        (३१) श्रीमंत राजा.
(२) निळे आकाश     (३२) गोरी मुलगी.
(३) पांढरा कागद      (३३) पुष्कळ वस्तू.
(४) गोड आंबा.        (३४) थोडी साखर.
(५) गरम पाणी.        (३५) काळा कुत्रा.
(६) मऊ कापूस.        (३६) हिरवे रान.
(७) शिळी भाकर.      (३७) पाच टोप्या.
(८) पाच बोटे.           (३८) खूप लोक.
(९) उंच इमारत.         (३९) आंबट बोरे
(१०)फुटका मणी.      (४०) पांढरा ससा.
(११) सोनेरी कळस.    (४१) दहा मुली.
(१२)मुसळधार पाऊस. (४२) अर्धा तास.
(१३) खूप गर्दी.           (४३) पहिला वर्ग.
(१४) छोटा भाऊ.        (४४) बोलकी बाहुली.
(१५) हसरी मुले.         (४५) वरचा मजला.
(१६) दाट झाडी.         (४६) हुशार मुलगा.
(१७) भित्रा ससा.        (४७) सुंदर अक्षर.
(१८) अर्धी भाकर.      (४८) उंच इमारत.
(१९) मऊ भात.          (४९) लांब काठी.
(२०) निळे पाणी.        (५०) आनंदी माणूस.
(२१) सुंदर फूल.         (५१) कडू कारले.
(२२) मोठे झाड.         (५२) पिवळी हळद.
(२३) बुटके झाड.        (५३) रानटी प्राणी.
(२४) ताजा आंबा.       (५४) शूर सैनिक.
(२५) कच्चा आंबा.      (५५) आखूड काठी.
(२६) सरळ वाट.         (५६) सोपी वाट.
(२७) वाकडी वाट.      (५७) लंगडा घोडा.
(२८) मोठी पिशवी.      (५८) छान गाणी
(२९) कोरी वही.          (५९) दहा आंबे
(३०) धीट मुलगी.        (६०) उदास चेहरा.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
               📞९४२२७३६७७५ ( धुळे )