माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 7 July 2018

सांगा पाहू - असे का  ? (कारणे सांगा)

-----------------------------------------------

(१) हिमालयात सतत बर्फ का असते ?

--- हिमालयात नेहमीच तापमान अतिशय कमी
    असल्यामुळे हवेतील पाण्याची वाफ तसेच
    पाणी गोठते. त्याचा परिणाम म्हणून बर्फ
    तयार होतो.
   ------------------------------------------------

(२) उन्हाळ्यात जमीन जास्त तापते .

--- उन्हाळ्यात सूर्याची किरण प्रखर असतात.
    दिवस मोठा असतो आणि ऊनही कडक
    असते. प्रखर सूर्यप्रकाश जास्त वेळ
    असल्यामुळे उन्हाळ्यात जमीन जास्त
     तापते.
 -------------------------------------------------
(३) हिवाळ्यात हवामान थंड असते.

--- हिवाळ्यात ऊन कडक नसते. दिवस लहान
  असतात. प्रखर सूर्यप्रकाश आणि कडक ऊन
   नसल्यामुळे जमीन फारशी तापत नाही.
   त्यामुळे जमिनीलगतची हवाही फार तापत
   नाही. त्यामुळे हिवाळ्यात हवामान थंड असते.
--------------------------------------------------
(४) थंडीच्या दिवसात पहाटे धुळे पडते.

--- थंडीच्या दिवसात हवामानातील बदलांमुळे
   हवेतील पाण्याची वाफ एकदम थंड होते.
   अशामुळे वाफेचे पाणी होण्याऐवजी तिचे
   सूक्ष्म कण बनतात. हे कण हवेमध्ये तरंगत
   राहतात. अशा कणांनी वातावरण भरून
   गेल्यास धुळे पडले असे म्हणतात. थंडीच्या
   दिवसात म्हणून पहाटेच्या थंड वेळी धुळे पडते.  --------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment