माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3275626

Monday, 17 September 2018

वन्य प्राण्यांविषयी चर्चा करूया.

(१) वाघाची गणती कशावरून केली जाते ?

--- वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची
    गणती केली जाते.

(२) ' वाघाचे क्षेत्र ' कशावरून ओळखता येते  ?

--- आपल्या पावलांचा आवाज होऊ नये, म्हणून
    वाघ पालापाचोळ्यांतून चालत नाही. तो
   पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पात्रातून
   वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा
   नदीनाल्यातील ओली वाळू तपासावी त्या
   मातीत वाघाचे पाऊलठसे आढळतात.
   त्यावरून  'वाघाचे क्षेत्र ' ओळखता येते.

(३) वाघ - वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक
    असतो  ?

--- वाघ -वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात.
    पण त्यांच्या मागच्या पंजांत फरक असतो.
  वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात,वाघिणीचे
  मागचे पंजे आयताकृती असतात .

(४) वाघाचे अन्न कोणते  ?

--- वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. तो शिकार
   करून आपली भूक भागवतो. छोट्या -मोठ्या
   प्राण्यांचे मांस हे वाघाचे अन्न आहे.

(५) वाघाची चाहूल भक्ष्यास लागत नाही.

--- वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते,
   तो भक्ष्यच्या दिशेने दबकत चालतो. त्यामुळे
   त्याची चाहूल लागत नाही.
  

  (६) वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट
       होत आहे.

--- मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक अन्नसाखळ्या
    नष्ट होत आहेत. जमिनी मोकळ्या करण्यासाठी
    जंगलतोड होत आहे. वन्यप्राण्यांचे निवारे
    यामुळे नाहीसे झाले. प्रदूषण आणि हवामान
   बदलामुळे निसर्गाची चक्रे असंतुलित झाली
   आहेत. वन्यप्राण्यांच्या शिकारी देखील खूप
   वर्षे होत राहिल्या. या सर्व कारणांनी
   वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत
  आहे

संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (पिंपळनेर) धुळे
               ¤ ९४२२७३६७७५ ¤

No comments:

Post a Comment