माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 15 September 2018

भौगोलिक ज्ञान खजिना ( कालगणना )

(१) दिवस :--

  ▪ पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास
    लागणारा काळ म्हणजे १ दिवस.

  ▪  १ दिवस २४ तासांचा असतो.
--------------------------------------------------
(२) वर्ष :--

  ▪ पृथ्वीचा सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण
     करण्यास लागणारा काळ म्हणजे ' एक
      वर्ष ' होय.

  ▪ वर्ष  ३६५ दिवसांचे असते.
--------------------------------------------------
(३) महिना :--

  ▪ एका अमावस्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंत
  चंद्राचा पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा
  काळ म्हणजे  '१ महिना ' होय.

  ▪ महिना चंद्राच्या गतीशी संबंधीत आहे.
--------------------------------------------------
(४) पंधरवडा  :--

  ▪ १५ दिवसांच्या कालावधी म्हणजे ' पंधरवडा'
    होय.

  ▪ अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या १५ दिवसात
    चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो; तर
    पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत १५ दिवस
    चंद्राचा प्रकाशित भाग कमी होत जातो.
--------------------------------------------------
(५) आठवडा  :--

  ▪ सात दिवसांचा एक आठवडा असतो.
     आठव्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो.
-----------------------------------------------------
(६) चंद्र  :--

 ▪ चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.  चंद्र स्वतःभोवती
   व पृथ्वीभोवती फिरतो.

  ▪ चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते.
    चंद्राची विरूद्ध बाजू पृथ्वीवरून कधीही
    दिसत नाही.
--------------------------------------------------
(७) चांद्रकालगणना :--

  ▪ फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग करून केली
    जाणारी कालगणना.

  ▪ इस्लाम दिनदर्शिकेत या चांद्रकालगणनेचा
    वापर केला जातो.

  ▪ या पध्दतीत १२ चांद्रमासाचे वर्ष असते
   आणि वर्षात ३६५ दिवस असतात.
-----------------------------------------------------
(८) सौरकालगणना  :--

  ▪ पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग करून
    केली जाणारी कालगणना.

  ▪ ग्रेगरियन दिनदर्शिकेत या सौरकाल गणनेचा
     वापर केला जातो. (इंग्रजी वर्षे )

  ▪ या दिनदर्शिकेतील वर्षात ३६५ दिवस असतात
   आणि वर्षात १२ महिने असतात.
-------------------------------------------------------
(९) चांद्रसौरकालगणना  :--

  ▪ वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीची वार्षिक गती आणि
    महिना मोजण्यासाठी चंद्राची गती एकत्र करून
    केली जाणारी कालगणना.

   ▪ हिंदू दिनदर्शिकेत या कालगणेचा उपयोग
      केला जातो.
--------------------------------------------------------

(१०) लीप वर्ष  :--

  ▪ पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणेस ३६५ दिवस
     व ६ तास लागतात. दरवर्षीच्या कालगणनेतील
     ६ तासांचा फरक दर चार वर्षांनी भरून काढतात
     आणि त्या वर्षीचे ३६६ दिवस मानतात.  हे
     लीप वर्ष होय.

  ▪ लीप वर्षांत फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा असतो.

  ▪ लीप वर्ष  ३६६ दिवसांचे असते.

  ▪ लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.
=================================

संकलक :- शंकर सिताराम चौरे (पिंपळनेर) धुळे
               ¤ ९४२२७३६७७५ ¤

   

No comments:

Post a Comment