माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 8 September 2018

असे का होते  ? ( कारणे सांगा )

(१) निरभ्र काळोख्या रात्री आपणांस आकाशात
     चमचमणा-या चांदण्या दिसतात.

--  काही चांदण्यांना स्वतःचा प्रकाश असतो.
     त्यांचा प्रकाश कमी - जास्त होताना
      दिसतो. म्हणून निरभ्र काळोख्या रात्री
     आपणांस आकाशात चमचमणा-या
     चांदण्या दिसतात.
--------------------------------------------------

(२) पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ असते.

-- पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे ओहोळ
   डोंगरावरून उताराकडे वाहू लागतात.
    पावसाचे पाणी जमिनीवरून वाहू लागते.
   या पाण्याबरोबर जमिनीवरील मातीही
   वाहून येते. त्यामुळे पाण्याला मातकट लालसर
    रंग येतो. हे पाणी ओढे व नद्या यांमध्ये
    मिसळले जाते. म्हणून पावसाळ्यात नदीचे
   पाणी गढूळ असते.
--------------------------------------------------

(३) प्रकाशझोत डोळ्यांवर पडला, की डोळे
     पटकन मिटतात.

--- सर्व सजीवांमध्ये चेतनाक्षमता असते.
    प्रकाशझोत डोळ्यांवर पडला की, तो
    सहन होत नाही. आपण प्रकाशाला स्वयंप्रेरणेने
    प्रतिसाद देतो. प्रकाशाचा झोत डोळ्यात
    शिरू नये म्हणून डोळे मिटून घेतो.
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (पिंपळनेर) 
            धुळे    /  ¤ ९४२२७३६७७५ ¤

No comments:

Post a Comment