(१) आग्रा :--
आग्रा हे शहर यमुना नदीच्या तीरावर
वसले आहे. या शहराला प्राचीन परंपरा आहे.
आग्रा किल्ला आणि ताजमहाल यांसारखी
उत्कृष्ट वास्तू येथे बांधण्यात आल्या. हे शहर
पर्यटन केंद्र आहे.
---------------------------------------------------
(२) पुणे :--
पुणे हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक
केंद्र म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. येथील
राष्ट्रीय प्रबोधिनी, सैनिकी अभियांत्रिकी आणि
सैनिकी विद्यालय, महाविद्यालये विशेष प्रसिद्ध
आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या
संशोधन संस्था येथे आहेत.
----------------------------------------------------
(३) नवी दिल्ली :--
नवी दिल्ली हे भारताच्या राजधानीचे
शहर आहे. नवी दिल्ली येथून संपूर्ण भारताचा
प्रशासकीय कारभार चालवला जातो. येथे
राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय,
अनेक देशांच्या वकिलाती आहेत. तिन्ही संरक्षण
दलांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली हे
लोहमार्ग,राष्ट्रीय महामार्ग आणि वायुमार्गांचे
केंद्र आहे. येथे अनेक महत्त्वाच्या शास्त्रीय
आणि शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे संशोधन
संस्था आणि प्रयोगशाळा आहेत.
------------------------------------------------------
(४) मुंबई :--
मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे.
हे सर्वोत्तम नैसर्गिक बंदर आहे. व्यापार,
उद्योग या दृष्टीने हे शहर प्रसिद्ध आहे. मुंबई
शहराला देशाची 'आर्थिक राजधानी '
म्हणतात. भाभा अणुसंशोधन केंद्र, टाटा
सामाजिक विज्ञान संस्था, नेहरू विज्ञान केंद्र
व नक्षत्रालय ही मुंबईतील ठिकाणे प्रसिद्ध
आहेत.
----------------------------------------------------
(५) नागपूर :--
नागपूर या शहराची स्थापना नाग
नदीकाठी झाली म्हणून नागपूर हे नाव प्राप्त
झाले. मुंबई आणि कोलकाता यांना जोडणारा
लोहमार्ग नागपूर येथून गेला आहे. त्यामुळे
नागपूर हे शहर भरभराटीस आले. भारतातील
मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर हे शहर वाहतूक
मार्गांचे केंद्र बनले आहे.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. प.प्रा.शाळा - बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment