माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 25 March 2018

कारणे सांगा ?( असे का ?)


(१) सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी मिळता -
     जुळता असतो.

-- सैनिकांचे कपडे परिसराशी मिळते - जुळते 
  असल्यावर ते शत्रुला चटकन दिसून येत नाही. 
  शत्रूच्या नजरेतून निसटण्यासाठी हे फायद्याचे 
  ठरते. सैनिकांच्या कपड्याचा रंग परिसराशी 
  मिळता - जुळता असणे. संरक्षणाच्या दृष्टीने 
  फायद्याचे ठरते. म्हणून सैनिकांच्या कपड्याचा 
  रंग परिसराशी मिळता - जुळता असतो. 
------------------------------------------------------
(२)उन्हाळ्यात नेहमी सुती वस्त्रे वापरावीत ?

-- उन्हाळ्यात घामाचा खूप त्रास होतो. सुती 
 कपडे घाम शोषून घेऊ शकतात. घाम शोषला 
 गेला नाही तर घामोळे व इतर त्वचारोग होऊ 
 शकतात. सुती वस्त्रांमुळे शरीराभोवती हवा 
 खेळती राहून शरीराला गारवा वाटतो. म्हणून 
 उन्हाळ्यात नेहमी सुती वस्त्रे वापरावीत. 
-----------------------------------------------------
(३)रेनकोट रबरापासून किंवा प्लास्टिकपासून बनवलेला     
    असतो. का ?

-- रेनकोट रबरापासून किंवा प्लास्टिकपासून 
 बनवलेला असतो. हे रबराचे किंवा प्लॅस्टिकचे 
 कापड जलरोधक असते. रेनकोट आपण 
 पावसाळ्यात वापरतो. पावसाळ्यात पाऊस-
 पाण्यापासून रेनकोटचे हे जलरोधक कापड 
 आपले संरक्षण करू शकते. 
------------------------------------------------------
(४)लोकरीचे कपडे हिवाळ्यात वापरतात.

-- प्राण्यांच्या शरीरावरील दाट केसांपासून 
 लोकर बनवतात. हिवाळ्यात थंडी असते. 
 लोकरीचे कपडे उबदार असतात. म्हणून 
 लोकरीचे कपडे हिवाळ्यात वापरतात. 
-------------------------------------------------------
 संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              धुळे (पिंपळनेर)
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment