माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 20 June 2018

योग व योगाभ्यासविषयी माहिती.


● योग म्हणजे काय  ?
    दैनंदिन जीवनात कोणतीही कृती करताना
त्या कृतीशी आपण जोडले जातो. त्या विशिष्ट
कृतीशी जोडले गेल्याशिवाय आपण ती कृती
करूच शकत नाही. उदा. , (१)आपल्याला
भूक लागली आहे. याची जाणीव होणे म्हणजे
भूकेशी जोडले जाणे. त्यासाठी अन्नग्रहण
करताना अन्नग्रहणाच्या क्रियेशी जोडले जाणे.
उदा., (२)लेखन करण्यासाठी पेन हातात धरणे
म्हणजे पेनशी जोडले जाणे इत्यादी. अशा
प्रकारे दैनंदिन जीवनात आपण अनेक घटना,
क्रिया, विचार यांच्याशी जोडले जातो. हे
जोडले जाणे म्हणजे योग.
  जोडले जाणे, संयोग पावणे. हा संयोग
कशाचा ? तर आपण स्वतः स्वतःशी जोडले
जाणे, म्हणजे स्वतःची ओळख करुन घेणे.
याचाच अर्थ शरीर व मन यांचा संयोग होणे.
  आपल्या व्यक्तीमत्वाचे शारीरिक, मानसिक,
भावनिक, अध्यात्मिक व सामाजिक असे
विविध पैलू असतात. या सर्व पैलूंमध्ये
संतुलन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त पद्धती
म्हणजे ' योगाभ्यास '.
  ● योगाची अंगे :-
   १. यम :-  आचरण /वर्तनविषयक
   २. नियम :- आत्मशुध्दी.
   ३. आसन :- शारीरिक व मानसिक स्थिती.
   ४.प्राणायाम  :- श्वास.
   ५. धारणा  :- चिंतन.

■ योगाभ्यासाचे फायदे  :-
 १. शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता
    वाढते.
 २. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 ३ रक्त शुध्द व प्रवाही राहते.
 ४.पाठीचा कणा लवचिक राहातो.
 ५. शरीर लवचीक बनते.
 ६.काम करण्याचा उत्साह वाढतो.
 ७.मनःशांती मिळते.
 ८.एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित होण्यास
   मदत मिळते.

संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
              जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
              केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment