● माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी - पक्षी, त्यांचे गुणधर्म,
काल्पनिक वस्तू , मनाची स्थिती यांना जी नावे ठेवली
आहेत, त्यांना नाम म्हणतात
उदा. सुप्रिया, पुस्तक, चिमणी, पेन
● नामाबद्दल विशेष माहिती सांगणा-या शब्दाला विशेषण म्हणतात.
उदा. हिरवी -- पाने / भित्रा -- ससा
■ दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण सांगा.
नाम -- विशेषण
(१) फूल -- सुवासिक
(२) नदी -- वाहती
(३) वृक्ष -- डेरेदार
(४) पाऊस -- मुसळधार
(५) रान -- हिरवेगार
(६) फळ -- मधूर
(७) आभाळ -- विशाल
(८) किरण -- कोवळे
(९) ऊन -- कडक
(१०) दगड -- भक्कम
(११) आई -- प्रेमळ
(१२) ससा -- चपळ
(१३) गाय -- गरीब
(१४ ) विद्यार्थी -- हुशार
(१५) मित्र -- समजूतदार
( १६) मूल -- गोजिरवाणे
( १७) बर्फ -- थंड
(१८) घर -- टुमदार
(१९) इमारत -- भव्य
(२०) वाट -- नागमोडी
(२१) झोप -- गाढ
(२२) लोक -- हौशी
(२३) समुद्र -- निळा
(२४) ओठ -- गुलाबी
(२५) झाड -- मोठे
(२६) बाहुली -- बोलकी
(२७) झोपडी -- सुंदर
(२८) डोंगर -- उंच
(२९) आंबा -- गोड
(३०) कैरी -- आंबट
(३१) मुलगी -- सुंदर
(३२) हत्ती -- बलाढ्य
(३३) जमीन -- भुसभूशीत
(३४) दरी -- खोल
(३५) रोपे -- हिरवी
(३६) पीक -- चांगले
(३७) ढग -- काळे
(३८) शिपाई -- शूर
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि. प.प्रा. शाळा- जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment