माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 28 January 2021

भारत -- ऊर्जानिर्मिती ( प्रश्नावली )


(१) ' उकाई ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात

(२) ' दुर्गापूर ' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- पश्चिम बंगाल

(३) ' रंगनदी ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- अरूणाचल प्रदेश

(४) ' कोसी ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- बिहार

(५) ' कोयना ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- महाराष्ट्र

(६) ' एकलहरे ' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- महाराष्ट्र

(७) ' काक्रापारा ' अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात

(८) ' नागार्जूनसागर ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आंध्र प्रदेश

(९) ' बारपानी ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आसाम

(१०) ' रेणुसागर ' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश

(११) ' भगवानपूर ( निमूच) सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- मध्यप्रदेश

(१२) ' हिराकूड ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- ओरिसा
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday, 26 January 2021

मराठी भाषा सौंदर्य


घागर घेतली
घागर आणली
घागर उचलली
घागर ठेवली
घागर बुडाली
घागर भरली
घागर पडली
घागर फुटली

झाड लावणे
झाड वाढणे
झाड ठेंगणे
झाड पसरणे
झाड मोहरणे
झाड सुकणे
झाड वाळणे
झाड पाडणे

जमीन तापणे
जमीन भंगणे
जमीन खणणे
जमीन खोदणे
जमीन वखरणे
जमीन वाफाळणे
जमीन भेगाळणे
जमीन तडकणे
जमीन पाझरणे
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 21 January 2021

काही संख्यांच्या वाचनाची रीत / पध्दत.


व्यवहारात काही संख्यांचे वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उदा. २५० ही संख्या दोनशे पन्नास अशी न
वाचता ती अडीचशे अशी वाचतात.
१२५ = सव्वाशे
२२५ = सव्वा दोनशे
३२५ = सव्वा तीनशे
४२५ = सव्वा चारशे
५२५ = सव्वा पाचशे
६२५ = सव्वा सहाशे
७२५ = सव्वा सातशे
८२५ = सव्वा आठशे
९२५ = सव्वा नऊशे
---------------------------------
१५० = दीडशे
२५० = अडीचशे
३५० = साडे तीनशे
४५० = साडे चारशे
५५० = साडे पाचशे
६५० = साडे सहाशे
७५० = साडे सातशे
८५० = साडे आठशे
९५० = साडे नऊशे
------------------------------------------------------
१७५ = पावणे दोनशे
२७५ = पावणे तीनशे
३७५ = पावणे चारशे
४७५ = पावणे पाचशे
५७५ = पावणे सहाशे
६७५ = पावणे सातशे
७७५ = पावणे आठशे
८७५ = पावणे नऊशे
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday, 18 January 2021

भाषिक उपक्रम :-- विरूध्दार्थी शब्दापासून जोडशब्द बनविणे.


(१) चढ × उतार = चढउतार

(२) काळे × गोरे = काळेगोरे

(३) बरे × वाईट = बरेवाईट

(४) नफा × तोटा = नफातोटा

(५) देव × दानव = देवदानव

(६) खाली × वर = खालीवर

(७) दिवस × रात्र = दिवसरात्र

(८) सकाळ × संध्याकाळी = सकाळसंध्याकाळ

(९) आत × बाहेर = आतबाहेर

(१०) थोडे × फार = थोडेफार
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 17 January 2021

सामान्यज्ञान --- शब्द जोड्या , वाचा व लिहा


(१) डोळे = पाहणे.
(२) कान = ऐकणे.
(३) नाक = वास घेणे.
(४) त्वचा = स्पर्शज्ञान
(५) जीभ = चव घेणे.
===================
(६) कावळा = दोन पाय
(७) मांजर = चार पाय
(८) कोळी = आठ पाय
(९) घोण = पुष्कळ पाय
(१०) गांडूळ = पाय नाही
===================
(११) कासव = सावकाश चालते.
(१२) ससा = टुणटुण उड्या मारतो.
(१३) माकड = उड्या मारतो.
(१४) गांडूळ = सरपटते.
(१५) कबूतर = हवेत उडते
(१६) मासा = पोहतो.
==========================
(१७) आंबा = एक बी असलेले फळ
(१८) टरबूज = अनेक बिया असलेले फळ .
(१९) शेवगा = शेंगा येणारी वनस्पती.
(२०) कवठ = कठीण कवचाची फळे.
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड ता. साक्री , जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday, 13 January 2021

RHYMING WORDS (-हायमिंग वर्डस )यमक जुळणारे शब्द


● यमक जुळणा-या शब्द जोड्या वाचा व लिहा.

Ball = Call
----------------------------------
Fall = Tall
----------------------------------
Wall = Hall
-------------------------------------
Bill = mill
-------------------------------------
Till = Nill
------------------------------------
Hill = Kill
------------------------------------
Rice = Nice
------------------------------------
Line = Nine
-----------------------------------
Dear = Bear
------------------------------------
Sour = Pour
------------------------------------
Hare = Mare
------------------------------------
Fire = Wire
------------------------------------
Hand = Band
------------------------------------
Land = Sand
------------------------------------
Bind = Kind
-------------------------------------
Cold = Gold
--------------------------------------
Bold = Fold
-------------------------------------
Seat = Neat
-------------------------------------
Fast = Last
-------------------------------------
Duck = Luck
--------------------------------------
Lack = Make
-------------------------------------
Wake = Take
--------------------------------------
Sick = kick
--------------------------------------
Pink = Link
--------------------------------------
Task = Mask
--------------------------------------
Tank = Rank
--------------------------------------
Page = Cage
---------------------------------------
Fish = Dish
---------------------------------------
Rain = Pain
--------------------------------------
Rope = Hope
=============================
SHANKAR SITARAM CHAURE
Z. P. SCHOOL JAMNEPADA
TAL SAKRI DIST DHULE
9422736775

Tuesday, 12 January 2021

' ळ ' चे सोबती ( ' ळ ' ची शब्द साखळी )


● शब्दाच्या शेवटी ' ळ ' अक्षर असलेले दोन अक्षरी शब्द सांगा. / लिहा.

१) कळ खळ गळ छळ जळ झळ

२) ढळ तळ दळ नळ पळ फळ

३) बळ मळ वळ सळ आळ ओळ

४) काळ गाळ चाळ जाळ टाळ डाळ

५) ढाळ थाळ नाळ पाळ फाळ बाळ

६) भाळ माळ राळ लाळ वाळ साळ

७) निळ खीळ कुळ गूळ चूळ धूळ

८) मूळ खेळ भेळ वेळ बोळ टोळ

===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday, 11 January 2021

विज्ञान -- सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते ?
उत्तर -- फॅदोमीटर

(२) तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- थर्मामीटर

(३) हृदयाची स्पंदने मोजण्याचे उपकरण कोणते ?
उत्तर -- स्टेथेस्कोप

(४) विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- राईट बंधू

(५) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- मॅकमिलन

(६) रेडिओचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- मार्कोनी

(७) अंधांसाठी लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- लुईस ब्रेल

(८) ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- लुईस ब्रेल

(९) भारतीय क्षेपणशास्त्राचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर -- डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम

(१०) भारतीय उद्योगांचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर -- जमशेदजी टाटा

(११) स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- रेने लैनक

(१२) पोलिओची लसचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- डाॅ. साल्क व सबीन
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 10 January 2021

आदिवासी संस्कृती माझी


काळजात माझ्या कोरलेली आहे
नसानसात भरलेली आहे
आदिवासी संस्कृती माझी

पूर्वजांचा लाभला वसा
जपतो अभिमानाने वारसा
निसर्गावर उमटवून ठसा
आजही जिवंत आहे
आदिवासी संस्कृती माझी

पूर्वजांनी बांधले तोरण
वाडवडिलांनी मांडले धोरण
सारी धरती व्यापूनी
जगात श्रेष्ठ ठरली आहे
आदिवासी संस्कृती माझी

रूढी - परंपरांनी सजली संस्कृती
नृत्य - संगीताची महान कीर्ती
सा-या जगात लाभला मान
देशोदेशी पसरली आहे
आदिवासी संस्कृती माझी 

आदिवासी माणसाचा न्याराच हो थाट
रूढी - परंपरा अमृताचे घाट
आदिम ज्ञानाचे वाहती पाट
डोंगरद-यात वसली आहे
आदिवासी संस्कृती माझी

आदिम संस्कृतीचा मोठा ठेवा
निसर्ग रक्षणाचा मेवा
गरीब - श्रीमंत आणि जातीचा
भेदाभेद विसरली आहे
आदिवासी संस्कृती माझी

ही धरती अमुची आई 
लहान थोरांचे गुण गाई
तिच्या रक्षणात अमुचा जीव जाई 
निसर्ग सौंदर्याने रसरसली आहे
आदिवासी संस्कृती माझी

लेखक /कवी :- शंकर सिताराम चौरे(प्रा शिक्षक)
   पिंपळनेर  ता. साक्री जि. धुळे
 📞९४२२७३६७७५
www.shankarchaure.blogspot.com
===============================
 ● मार्गदर्शक  :-
श्री. महारू सिताराम चौरे ( मा. शिक्षक ) कासारे
सौ. भटीबाई महारू चौरे(प्रा. शिक्षिका ) पिंपळनेर

Saturday, 9 January 2021

म्हणजे काय ?


अंजली म्हणजे ओंजळ
निर्मला म्हणजे निर्मळ
निरज म्हणजे कमळ
आकाश म्हणजे आभाळ
मोहिनी म्हणजे भुरळ
उषा म्हणजे सकाळ

अस्मिता म्हणजे अभिमान
विद्या म्हणजे ज्ञान
नुतन म्हणजे नवीन
अनिल म्हणजे पवन
आकाश म्हणजे गगन
भूमी म्हणजे जमीन

नयन म्हणजे लोचन
जागृती म्हणजे भान
संतोष म्हणजे समाधान
चंचल म्हणजे बुद्धिमान
नमन म्हणजे वंदन
विपिन म्हणजे वन

गौरव म्हणजे सन्मान
सपना म्हणजे स्वप्न
रंजना म्हणजे प्रसन्न
छोटी म्हणजे लहान
संकेत म्हणजे खूण
सारंग म्हणजे हरिण

संग्राम म्हणजे समर
पवन म्हणजे समीर
शीतल म्हणजे गार
रूपेश म्हणजे सुंदर
मयूर म्हणजे मोर
मिलिंद म्हणजे भ्रमर

लता म्हणजे वेल
कुसुम म्हणजे फूल
विपिन म्हणजे जंगल
जनक म्हणजे वडील
कल्याण म्हणजे कुशल
लतिका म्हणजे वेल
================================
लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday, 6 January 2021

समूहदर्शक, पिल्लूदर्शक, घरदर्शक , ध्वनीदर्शक शब्द प्रश्नावली.


(१) ' गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- शिंगरू

(२) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई

(३) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे

(४) ' पाडस ' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरणाच्या

(५) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा

(६) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे

(७) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा

(८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ

(९) मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- वारूळ

(१०) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ

(११) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे

(१२) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू

(१३) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा

(१४) कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- कुईकुई ( कोल्हेकुई )

(१५) हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चित्कार

(१६) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू

(१७) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला / पागा

(१८) पायी चाललेल्या वारक-यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिंडी

(१९) माणसाच्या पिलास काय म्हणतात ?
उत्तर -- लेकरू / बाळ

(२०) पोपट पिंज-याशिवाय आणखी कुठे राहतो ?
उत्तर -- ढोलीत
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

सामान्यज्ञान प्रश्नावली

   
(१) ' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
---------------------------------------------------
(२) ' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
---------------------------------------------------
(३) ' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
---------------------------------------------------
(४) ' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठें आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
---------------------------------------------------
(५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
---------------------------------------------------
(६) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
---------------------------------------------------
(७) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
---------------------------------------------------
(८) ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
---------------------------------------------------
(९) पालघर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र
कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
---------------------------------------------------
(१०) ' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
---------------------------------------------------
(११) अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
(१२) महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर
===================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.. शिक्षक)
जि. प..प्रा..शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday, 4 January 2021

१ ते १०० या संख्यांवर आधारित प्रश्नावली


(१) १ ते १०० या संख्यांमध्ये एककस्थानी ० असलेल्या एकूण
संख्या किती आहेत ?

उत्तर -- १०
---------------------------------
(२) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहेत ?

उत्तर -- ९
----------------------------------
(३) १ ते १०० या संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?

उत्तर -- ९०
------------------------------------------------------------
(४) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?

उत्तर -- १
------------------------------------------------------------
(५) १ ते १०० या संख्यांमध्ये दशक स्थानी ९ असलेल्या एकूण संख्या कोणती आहेत ?

उत्तर -- १०
------------------------------------------------------------
(६) ११ ते १०० पर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी ० हा अंक असतो ?

उत्तर -- १
------------------------------------------------------------
(७) १ ते १०० या संख्यांमध्ये ५ हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो ?

उत्तर -- २०
------------------------------------------------------------
(८) १० ते ९९ पर्यंतच्या संख्यांमध्ये ९ अंक किती वेळा येतो ?

उत्तर -- १९
------------------------------------------------------------
(९) १ ते १०० या संख्यांमध्ये ० हा अंक किती वेळा येतो ?

उत्तर -- ११
------------------------------------------------------------
(१०) १ ते १०० पर्य॓तच्या संख्यांमध्ये सम संख्या एकूण किती आहेत ?

उत्तर -- ५०
------------------------------------------------------------
(११) १० ते ९९ पर्यंतच्या संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?

उत्तर -- ९०
------------------------------------------------------------
(१२) एक अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती ?

उत्तर -- ८
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 3 January 2021

महिला विशेष सामान्यज्ञान


(१) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत

(२) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा

(३) ' अंजली भागवत ' ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी

(४) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन

(५) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस

(६) भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

(७) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग

(८) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील

(९) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी

(१०) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण

(११) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ

(१२) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग

(१३) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

(१४) 'कळ्यांचे दिवस व फुलांच्या राती ' हा काव्यसंग्रह
कोणाचा आहे ?
उत्तर -- शांता शेळके

(१५) भारतातील पहिली महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथुर

(१६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन

(१७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला

(१८) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल

(१९) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले

(२०) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर

(२१) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday, 1 January 2021

Rhyming Words ( अक्षरांचा मेळ, शब्दांचा खेळ )


पुस्तक म्हणजे बुक ( book )
आचारी म्हणजे कुक ( cook )

पाहणे म्हणजे लूक ( look)
घेतले म्हणजे टूक ( took )

दरवाजा म्हणजे डोअर ( door )
गरीब म्हणजे पुअर ( poor )

अन्न म्हणजे फूड ( food )
चांगले म्हणजे गूड ( good )

तळे म्हणजे पूल ( pool )
थंड म्हणजे कूल ( cool )

लोकर म्हणजे वुल ( wool )
साधन म्हणजे टुल ( tool )

दुपार म्हणजे नून ( noon )
चंद्र म्हणजे मून ( moon )

खूर म्हणजे हूप ( hoof )
छत म्हणजे रूफ ( roof )

टाच म्हणजे हील ( heel )
वाटणे म्हणजे फिल ( feel )

बी म्हणजे सीड ( seed )
गरज म्हणजे नीड ( need )

पाहिले म्हणजे सीन ( seen )
धारदार म्हणजे किन ( keen )

रडणे म्हणजे विप ( weep )
ठेवणे म्हणजे कीप ( keep )

आठवडा म्हणजे विक ( week )
शोधणे म्हणजे सीक ( seek )
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५