माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 9 January 2021

म्हणजे काय ?


अंजली म्हणजे ओंजळ
निर्मला म्हणजे निर्मळ
निरज म्हणजे कमळ
आकाश म्हणजे आभाळ
मोहिनी म्हणजे भुरळ
उषा म्हणजे सकाळ

अस्मिता म्हणजे अभिमान
विद्या म्हणजे ज्ञान
नुतन म्हणजे नवीन
अनिल म्हणजे पवन
आकाश म्हणजे गगन
भूमी म्हणजे जमीन

नयन म्हणजे लोचन
जागृती म्हणजे भान
संतोष म्हणजे समाधान
चंचल म्हणजे बुद्धिमान
नमन म्हणजे वंदन
विपिन म्हणजे वन

गौरव म्हणजे सन्मान
सपना म्हणजे स्वप्न
रंजना म्हणजे प्रसन्न
छोटी म्हणजे लहान
संकेत म्हणजे खूण
सारंग म्हणजे हरिण

संग्राम म्हणजे समर
पवन म्हणजे समीर
शीतल म्हणजे गार
रूपेश म्हणजे सुंदर
मयूर म्हणजे मोर
मिलिंद म्हणजे भ्रमर

लता म्हणजे वेल
कुसुम म्हणजे फूल
विपिन म्हणजे जंगल
जनक म्हणजे वडील
कल्याण म्हणजे कुशल
लतिका म्हणजे वेल
================================
लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment