ब्लॉग भेटी.
Wednesday, 6 January 2021
समूहदर्शक, पिल्लूदर्शक, घरदर्शक , ध्वनीदर्शक शब्द प्रश्नावली.
(१) ' गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?उत्तर -- शिंगरू
(२) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई
(३) पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे
(४) ' पाडस ' कोणाच्या पिल्लाला म्हणतात ?
उत्तर -- हरणाच्या
(५) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- थवा
(६) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे
(७) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा
(८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ
(९) मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- वारूळ
(१०) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- गुच्छ
(११) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- पोळे
(१२) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू
(१३) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- ताटवा
(१४) कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- कुईकुई ( कोल्हेकुई )
(१५) हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चित्कार
(१६) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- रेडकू
(१७) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला / पागा
(१८) पायी चाललेल्या वारक-यांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- दिंडी
(१९) माणसाच्या पिलास काय म्हणतात ?
उत्तर -- लेकरू / बाळ
(२०) पोपट पिंज-याशिवाय आणखी कुठे राहतो ?
उत्तर -- ढोलीत
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
✓ सामान्यज्ञान ( मापन / परिमाणे ) १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ६० मिनिटे १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ दिवस = १४४० मिनि...
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
(१) आपण कोणत्या राज्यात राहतो ? उत्तर -- महाराष्ट्र ---------------- (२) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ? उत्तर -- मुंबई ----...

No comments:
Post a Comment