नसानसात भरलेली आहे
आदिवासी संस्कृती माझी
पूर्वजांचा लाभला वसा
जपतो अभिमानाने वारसा
निसर्गावर उमटवून ठसा
आजही जिवंत आहे
आदिवासी संस्कृती माझी
पूर्वजांनी बांधले तोरण
वाडवडिलांनी मांडले धोरण
सारी धरती व्यापूनी
जगात श्रेष्ठ ठरली आहे
आदिवासी संस्कृती माझी
रूढी - परंपरांनी सजली संस्कृती
नृत्य - संगीताची महान कीर्ती
सा-या जगात लाभला मान
देशोदेशी पसरली आहे
आदिवासी संस्कृती माझी
आदिवासी माणसाचा न्याराच हो थाट
रूढी - परंपरा अमृताचे घाट
आदिम ज्ञानाचे वाहती पाट
डोंगरद-यात वसली आहे
आदिवासी संस्कृती माझी
आदिम संस्कृतीचा मोठा ठेवा
निसर्ग रक्षणाचा मेवा
गरीब - श्रीमंत आणि जातीचा
भेदाभेद विसरली आहे
आदिवासी संस्कृती माझी
ही धरती अमुची आई
लहान थोरांचे गुण गाई
तिच्या रक्षणात अमुचा जीव जाई
निसर्ग सौंदर्याने रसरसली आहे
आदिवासी संस्कृती माझी
लेखक /कवी :- शंकर सिताराम चौरे(प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
📞९४२२७३६७७५
www.shankarchaure.blogspot.com
===============================
● मार्गदर्शक :-
श्री. महारू सिताराम चौरे ( मा. शिक्षक ) कासारे
सौ. भटीबाई महारू चौरे(प्रा. शिक्षिका ) पिंपळनेर
@bhartiyadiwasi खूप सुंदर कविता आहे ,आदिवासी अस्थित्व टिकविण्यासाठी विपुल साहित्यची गरजा आहे .
ReplyDeletehttps://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/10/history-of-kalibai.html