माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 19 February 2023

सांगा सांगा उत्तर सांगा.( सामान्य प्रश्नावली)


(१) तुझे नाव काय ?
(२) तुझ्या आईचे नाव काय ?
(३) तुझ्या वडिलांचे नाव काय ? 
(४) तुझ्या वडिलांना तू काय म्हणतोस ?
(५)तुझ्या घरी कोण कोण आहेत ?
(६) तुझे वडील काय काम करतात ?
(७) तुझ्या आजोबांचे नाव काय ?
(८) तुझ्या आजीचे नाव काय ?
(९) तुला भाऊ किती आहेत ?
(१०) तुझ्या भावांची नावे सांग ?
(११) तुला बहिणी किती आहेत ?
(१२) तुझ्या बहिणींची नावे सांग ?
(१३) वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात ?
(१४) वडिलांच्या आईला काय म्हणतात ?
(१५) आईच्या वडिलांना काय म्हणतात ?
(१६) आईच्या आईला काय म्हणतात ?
(१७) तुला मामा आहेत काय ?
(१८) मामांच्या गावाचं नाव काय ?
(१९) "तुला मावशी आहे काय ? 
(२०) तुझ्या मावशीच्या गावाचं नाव काय ? 
(२१) तुला काका आहेत काय ?
(२२) तुझे काका कुठे राहतात ? 
(२३) तुझे काका काय काम करतात ?
(२४) तुझ्या मित्रांची नावं काय आहेत? 
(२५)तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहेत ? 
(२६) तू मित्रांबरोबर कोणकोणते खेळ खेळतोस ? 
(२७) तू मैत्रिणींबरोबर कोणकोणते खेळ खेळतेस ?
(२८)आपल्या गावात कोणकोणती देवळे आहेत ?
(२९)आपल्या गावात कोणकोणती दुकाने आहेत ? 
(३०) तू कधी दुकानात जातेस का ?
(३१) दुकानात काय काय असतं ?
(३२) आपण पाणी कुठून आणतो ?
(३३) पाणी कशाने आणतो?
(३४) आपल्या गावाशेजारी कोणकोणती गावे आहेत ?
(३५)त्यांपैकी तू कोणते गाव पाहिलेस ?
(३६) पोपटाचा रंग कोणता असतो ?
(३७) पोपट काय खातो ?
(३८) पोपटाला किती पाय असतात ?
(३९) गवत खाणारे प्राणी कोणते ?
(४०) दूध देणारे प्राणी कोणते ?
(४१)!शिंगे असणारे प्राणी कोणते ?
(४२) शिंगे नसणारे प्राणी कोणते ?
(४३) आकाशाचा रंग कोणता असतो ? 
(४४)आकाशात चांदण्या केव्हा दिसतात ? 
(४५) सूर्य केव्हा उगवतो ?
(४६) सूर्य केव्हा मावळतो ?
(४७)!आठवडयाचे वार किती ?
(४८) शाळेला सुटी कोणत्या वारी असते ?
(४९) रविवार नंतरचा वार कोणता ?
(५०) तुझ्या एका हाताची बोटे किती? 
(५१) दोन्ही हातांची बोटे किती ?
(५२) तुला डोळे किती आहेत?
(५३)चपाती कशाची करतात ?
(५४) गुळाची चव कशी असते ? 
(५५) चिंचेची चव कशी असते ?
(५६)  मिठाची चव कशी असते ?
(५७) साखरेची चव कशी असते ? 
(५८) कारल्याची चव कशी असते ?
(५९) भाकरी कशाची करतात ? 
(६०) भात कशाचा करतात ? 
(६१) वरण कशाचे करतात ?
(६२)  तू कितवीत शिकतेस ? 
(६३) वर्गात तुला कोण शिकविते ? 
(६४) तुझ्या बाईचे नाव काय ? 
(६५) त्या तुला काय काय शिकवितात ?
(६६) बाई तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगतात? 
(६७) तुला कोणत्या गोष्टी आवडतात ?
(६८) बाई तुम्हाला कोणती गाणी शिकवितात ? 
(६९)तुला कोणती गाणी म्हणता येतात ?
(७०) वर्गातील फळ्याचा रंग कोणता आहे ? 
(७१) भिंतीचा रंग कोणता आहे ? 
(७२)वर्गाला खिडक्या किती आहेत ? 
(७३) तुझ्या दप्तरात कोणकोणत्या वस्तू आहेत ? 
(७४) तुझ्या दप्तरात किती पुस्तके आहेत ? 
(७५) तुला कोणते पुस्तक आवडते ?
(७६) तिळगूळ कोणत्या सणाला वाटतात ? 
(७७) गुढी कोणत्या सणाला उभारतात ? 
(७८) बहीण कोणत्या सणाला भावाच्या हातात राखी बांधते ? (७९)कोणत्या सणाच्या दिवशी रंग खेळतात ?
(८०) नागपूजा कोणत्या सणाच्या दिवशी करतात ? 
(८१) बैलांचा सण कोणता ?
(८२)आकाशदिवा कोणत्या सणाच्या वेळी लावतात ?
(८३) कावळा कसा ओरडतो ? 
(८४)चिमणी कशी ओरडते ? 
(८५) पोपट कसा बोलतो ?
(८६) कोंबडा कसा आरवतो ?
(८७) बेडूक कसा ओरडतो ? 
(८८) कुत्रा कसा भुंकतो ? 
(८९) मांजर कशी ओरडते ? 
(९०) बकरी कशी ओरडते ?
(९१) भोपळ्याचा आकार कसा असतो ?
(९२) पडवळ कसे असते ? 
(९३) मेथीचा रंग कोणता असतो ?
(९४) जांभळाचा रंग कोणता ? 
(९५) कोणत्या फळावर काटे असतात ?
(९६)आपल्या देशाचे नाव काय आहे ?
(९७)!आपल्या गावाचे नाव काय आहे ?
(९८) आपले गाव कोणत्या तालुक्यात आहे ?
(९१)आपल्या गावातील लोक कोण-कोणत्या वाहनाने तालुक्याच्या गावी जातात ?
(९२) पाण्याचे उपयोग कशा - कशासाठी होतो ?
(९३) गावातील लोक कोठून पाणी भरतात ? 
(९४) तुमच्या घरी पाणी कशात साठवतात ? 
(९५)उन्हाळ्यात पाणी थंड करण्यासाठी तुम्ही कशाचा उपयोग करता ? 
(९६) पिण्याचे पाणी झाकून का ठेवावे ?
(९७) तू सकाळी किती वाजता उठतोस/ उठतेस ? 
(९८) शाळेतून घरी गेल्यावर तू काय काय करतोस / करतेस ?
(९९) तू रात्री किती वाजता झोपतोस/ झोपतेस ?
(१००) घरात स्वयंपाक कोण करते ?
(१०१) तू आईला स्वयंपाकात कशी मदत करतोस/ करतेस ?
(१०२) जेवण्यापूर्वी हात का धुवावेत ?
(१०३)तुला कोणता गोड पदार्थ आवडतो?
(१०४)तुला कोणता तिखट पदार्थ आवडतो ? 
(१०५) तुला कोणते फळ आवडते ? 
(१०६) तुला कोणती भाजी आवडते ?
(१०७) कोणकोणते पदार्थ कच्चे खातात ?
(१०८)  कोणकोणते पदार्थ शिजवून खातात ? 
(१०९)कोणकोणते पदार्थ भाजून खातात ? 
(११०) कोणकोणते पदार्थ उकडून खातात ?
(१११)  कोणकोणते पदार्थ तळून खातात ?
(११२) तोंडाचा उपयोग कशासाठी होतो ? 
(११३) डोळ्यांचा उपयोग कशासाठी होतो ? 
(११४) कानांचा उपयोग कशासाठी होतो ? 
(११५)!हातांचा उपयोग कशासाठी होतो ? 
(११६) पायांचा उपयोग कशासाठी होतो ?
(११७) तुझ्या शाळेचे नाव काय आहे ? 
(११८) शाळेचे मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका कोण आहेत ? 
(११९) शाळा किती वाजता भरते ? 
(१२०)शाळा किती वाजता सुटते ? 
(१२१) तुम्हांला शाळेत खेळ कोण शिकविते ?
(१२२) तुम्ही शाळेत कोणकोणते खेळ शिकलात ? 
(१२३) तुला कोणता खेळ आवडतो ?
(१२४) तुम्ही खेळ कुठे खेळता ?
(१२५)काल कोणता वार होता ? 
(१२६) उद्या कोणता वार आहे ?
(१२७)!शनिवारनंतर कोणता वार येतो ?
(१२८) शनिवारपूर्वी कोणता वार येतो ?
(१२९) चिमणी कोठे राहते ?
(१३०) गाय, बैल कोठे बांधतात ?
(१३१) उंदीर कोठे राहतो ?
(१३२)!सिंह कोठे राहतो ?
(१३३) मातीच्या वस्तू कोण बनवितो ? 
(१३४) लाकडी वस्तू कोण तयार करतो ? 
(१३५)घर कोण बांधतो ? 
(१३६) दागिने कोण तयार करतो ? 
(१३७)!कपडे कोण शिवतो ?
(१३८) आज कोणता वार आहे ? 
(१३९) आज किती तारीख आहे ? 
(१४०)आता, कोणता इंग्रजी महिना सुरू आहे ? 
(१४१) आता, कोणता मराठी महिना सुरू आहे ?
(१४२) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ? 
(१४३)सूर्य कोणत्या दिशेस मावळतो ?
(१४४) सूर्यापासून काय मिळते ?
(१४५) बैलगाडीला किती चाके असतात ?
(१४६) तुमच्या घरी कोणकोणते प्राणी आहेत ?
(१४७) शेतकरी कोणती जनावरे पाळतात ?
(१४८) धान्यांची नावे सांगा ?
(१४९) डाळींची नावे सांगा ?
(१५०) उसळी कशाच्या करतात ?
(१५१) आंबट पदार्थ कोणते ?
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
ता.साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment