माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 23 February 2023

शब्दसमूहाबद्दल एक शब्द.(भाषिक ज्ञान)


(१) दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण.
--- संगम 

(२) तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण.
--- तिठा 

(३) चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
---  चौक 

(४) जमिनीखालील गुप्त मार्ग.
--- भुयार 

(५) नदीची सुरूवात होते ती जागा.
--- उगम 

(६) पाण्यात राहणारे प्राणी.
--- जलचर 

(७) ऐकायला व बोलायला न येणारा.
---  मूकबधिर 

(८) कविता रचणारा.
--- कवी 

(९) कविता रचणारी.
--- कवयित्री 

(१०) खूप पाऊस पडणे.
---- अतिवृष्टी 

(११) कैदी ठेवण्याची जागा.
---- कारागृह , ‌तुरंग

(१२) चित्र काढणारा.
---- चित्रकार 

(१३) दगडावर कोरलेले लेख.
---- शिलालेख 

(१४) चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
---- बेट 

(१५) डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता.
---- बोगदा 

(१६) ज्यांस कोणी जिंकू शकत नाही असा.
---- अजिंक्य 

(१७) हळूहळू घडून येणारा बदल.
---- उत्क्रांती 

(१८) कोणाचाही आधार नाही असा.
---- अनाथ 

(१९) चंद्रापासून येणारा प्रकाश.
---- चांदणे 

(२०) एखाद्या संस्थेची स्थापना करणारा.
---- संस्थापक 
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.‌शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment