जवळदूरची प्रेमळ नाती
फडकीतली माय आदिम संस्कृती,
फक्त तूच एक फडकी आई ॥
फडकीत आकाशाची विशालता,
निसर्गाची सुंदरता
लाल रंगाची कोमलता,
फक्त तूच एक फडकी आई ।।
उन्हातला गारवा,
सृष्टीतला ऋतू हिरवा
मनातला गोडवा,
फक्त तूच एक फडकी आई ॥
वात्सल्याची मूर्ती,
प्रेमाची स्फूर्ती
आशा आकांक्षाची पूर्ती,
फक्त तूच एक फडकी आई ॥
दयेचा सागर,
सुखाचे आगर
मायेचा पाझर,
फक्त तूच एक फडकी आई ॥
समईतील वात,
अंधारातील साथ
पौर्णिमेची चांदणीरात,
फक्त तूच एक फडकी आई ॥
चैतन्याचा झरा,
प्रीतीचा मंजूळ वारा
आदिम देवांचा देव्हारा,
फक्त तूच एक फडकी आई ।।
आदिवासींची माऊली,
उन्हातील सावली
माझ्या आर्त हाकेला धावली,
फक्त तूच एक फडकी आई ॥
=========================
लेखक / कवी :- शंकर सिताराम चौरे
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
-------------------------------------
मार्गदर्शक :- श्री. महारु सिताराम चौरे(मा. शिक्षक, पिंपळनेर)
No comments:
Post a Comment