माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 28 May 2023

फडकीचं‌ रूप


फडकी म्हणजे जणू
प्रेमाचं नाजूक पदर 
फडकीचे ठिपके म्हणजे 
आदिम संस्कृतीची पाखरं

फडकी म्हणजे जणू 
ममतेची सुंदर साखळी
जणू काही फुलातील 
लाल मधुर पाकळी 

फडकी म्हणजे जणू
प्रेमाचा अथांग सागर 
फडकी माय म्हणजे 
आदिम स्त्रीचा संसार 

 फडकी म्हणजे जणू 
आदिम कणसरी माऊली 
फडकीचं रुप म्हणजे 
लेकरांची शितल सावली 

फडकीच्य रूपाने 
उजळतात दस दिशा 
फडकीतून जन्म घेते 
एक नवी आशा
========================
लेखक / कवी:- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  /  ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment