माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 30 January 2024

प्राणीशास्त्र प्रश्नावली


(१) पेंग्विन हा ..... वर्गातील सजीव आहे.
उत्तर -- पक्षी
----------
(२) विंचू हा ..... प्राणी आहे.
उत्तर -- पिल्लांना जन्म देणारा
----------
(३) हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे ?
उत्तर -- शाकाहारी
-----------------------------
(४) समुद्रातील ...... या प्राण्यापासून मोती मिळवतात.
उत्तर -- ऑयस्टर
-----------------------------
(५) बेडूक हा .... या वर्गातील प्राणी आहे.
उत्तर -- उभयचर
-----------------------------
(६) प्राण्यांमध्ये सर्वात मोठे हृदय ..... या प्राण्याचे असते.
उत्तर -- जिराफ 
-----------------------------
(७) ...... हा शीतरक्ताचा उभयचर प्राणी आहे.
उत्तर -- बेडूक
-----------------------------
(८) ..... हा जलचर सस्तनी प्राणी आहे.
उत्तर -- देवमासा
-----------------------------
(९) कोणत्या प्राण्यास शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात ?
उत्तर -- गांडूळ
-----------------------------
(१०) ..... हा हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे.
उत्तर -- वटवाघूळ
-----------------------------
(११) ऑक्टोपसचे रक्त ..... रंगाचे असते.
उत्तर -- निळ्या 
-----------------------------
(१२) कोळी या किडयाला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
-----------------------------
(१३) मगर या प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते ?
उत्तर -- चार 
-----------------------------
(१४) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग 
-----------------------------
(१५) सरड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- चार
-----------------------------
(१६) ' फुलपाखरू ' या कीटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
-----------------------------
(१७) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वटवाघूळ 
-----------------------------
(१८) दोन पाने शिवून घरटे तयार करणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शिंपी
-----------------------------
(१९) सुगरण पक्षी घरट्यासाठी कोणती झाडे पसंत करतात ?
उत्तर -- पाण्याजवळची काटेरी झाडे.
-----------------------------
(२०) जमिनीवर राहणारा सर्वांत मोठा प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती
-----------------------------
(२१) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?
उत्तर -- सिंह
-----------------------------
(२२) महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू
-----------------------------
(२३) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?
उत्तर -- हरियाल
-----------------------------
(२४)  डास या कीटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
-----------------------------
(२५) पाल या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर -- चार 
-----------------------------
(२६) माशी या कीटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
-----------------------------
(२७) आकाशात उंच भरा-या घेऊ शकणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- घार , गरूड, ससाणा 
-----------------------------
(२८) पायच नसणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- साप 
-----------------------------
(२९) शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- बैल 
-----------------------------
(३०) सोंड असणारा मोठा प्राणी कोणता ?
उत्तर -- हत्ती
-----------------------------
(३१) अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ / झेब्रा
-----------------------------
(३२) भुंगा या कीटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
-----------------------------
(३३) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?
उत्तर -- उंट 
-----------------------------
(३४) जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- चित्ता 
-----------------------------
(३५) संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ‌ ?
उत्तर -- कासव, गोगलगाय.
-----------------------------
(३६) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- कोळी 
-----------------------------
(३७) पक्ष्यांना किती पाय असतात ?
उत्तर -- दोन पाय 
-----------------------------
(३८) पोळे हा निवारा कोणाचा ?
उत्तर -- मधमाशीचा 
-----------------------------
(३९) बेडकाला किती पाय असतात ?
उत्तर -- चार 
-----------------------------
(४०) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
-----------------------------
(४१) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ
-----------------------------
(४२) ' मुंगी ' या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा 
-----------------------------
(४३) पक्ष्याचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड 
-----------------------------
(४४) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर 
----------------------------
(४५) मासा हा ...... रक्ताचा प्राणी आहे ?
उत्तर -- थंड
----------------------------
(४६) कोणता प्राणी स्वतः चा रंग बदलू शकतो ?
उत्तर -- ऑक्टोपस
----------------------------
(४७) कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर -- रेबीज
----------------------------
(४८) मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ?
उत्तर -- दोंदनृत्याद्वारे
-----------------------------
(४९) आकाराने सर्वात लहान पक्षी कोणता ?
उत्तर -- हर्मिंगबर्ड 
----------------------------
(५०) कोकिळ, मोर हे पक्षी माद्यांना कसे संकेत पोहचवितात ?
उत्तर -- कुजनाद्वारे ( ओरडणे)
---------------------------
(५१) सस्तन प्राणी हे ...... रक्ताचे असतात.
उत्तर -- उष्ण 
---------------------------
(५२) पक्षी हे .....‌ रक्ताचे प्राणी आहेत.
उत्तर -- उष्ण 
--------------------------
(५३) उभयचर प्राणी ..‌.... असतात.
उत्तर -- शीतरक्ताचे 
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Friday, 26 January 2024

भौगोलिक माहिती -- पृथ्वीचे फिरणे


(१) पौर्णिमा : 
--- आकाशात पूर्ण चंद्र दिसतो, म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो. त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात.
-----------------
(२) अमावास्या : 
---  आकाशात चंद्र दिसत नाही, म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही. त्या रात्रीला अमावास्या म्हणतात.
--------------------------------------
 (३) चांद्रमास :
---  एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या २८ ते ३० दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात.
--------------------------------------
 (४) तिथी : 
----  अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.
--------------------------------------
(५) लीप वर्ष : 
---  ज्या वर्षात ३६६ दिवस असतात, म्हणजेच ज्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात.
--------------------------------------
(६) परिवलन : 
---  ग्रह आपल्या आसाभोवती गोल फिरतात, या फिरण्याला परिवलन म्हणतात. उदा., पृथ्वी २४ तासांत परिवलन करते.
--------------------------------------
(७) परिभ्रमण : 
---  ग्रहाच्या ताऱ्याभोवतीच्या फिरण्याला परिभ्रमण म्हणतात. उदा., पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती परिभ्रमण करते.
--------------------------------------
(८) कृष्णपक्ष : 
---  पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होण्याच्या पंधरा दिवसांच्या कालावधीला कृष्णपक्ष म्हणतात.
--------------------------------------
(९) शुक्लपक्ष : 
--- शुक्लपक्षात चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग मोठा मोठा होत जातो.
--- अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा पृथ्वीकडील भाग अधिकाधिक प्रकाशित होत जाण्याच्या पंधरा दिवसांच्या कालावधीला पौर्णिमा म्हणतात.
--------------------------------------
(१०) चंद्राच्या कला :
--- ‌अमावास्या ते पौर्णिमा तसेच पौर्णिमा ते अमावास्या या कालावधीत चंद्राच्या पृथ्वीवरून दिसणाऱ्या प्रकाशित भागाच्या विविध स्थितींना चंद्राच्या कला म्हणतात.
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -  जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Sunday, 21 January 2024

सामान्यज्ञान प्रश्नावली (स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त)


(१) भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर -- २६ जानेवारी 

(२) भारतातील कोणत्या शहराला  'गुलाबी शहर ' म्हटले जाते  ?
उत्तर -- जयपूर 

(३)'कांगारूंचा देश ' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?
उत्तर -- ऑस्ट्रेलिया

(४) जगातील पहिला अवकाशवीर कोण ?
उत्तर -- नील आर्मस्ट्राँग 

(५) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद

(६) भारत - चीन या दोन देशांमध्ये कोणती सीमारेषा आहे ?
उत्तर -- मॅकमोहन

(७) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?
उत्तर -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(८) ' माझे सत्याचे प्रयोग ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर -- महात्मा गांधी

(९) भारतातील सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तर -- गंगा

(१०) ' वाळवंटातील जहाज ' असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते ?
उत्तर -- उंट 

(११) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते ?
उत्तर -- गोवा 

(१२) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर -- यकृत

(१३) डेसिबल हे ..... मापनाचे एकक आहे ?
उत्तर -- आवाज 

(१४) भूकंपमापक यंत्राला काय म्हणतात ?
उत्तर -- सिस्मोग्राफ 

(१५) भारताचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर -- राष्ट्रपती

(१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली ?
उत्तर -- नागपूर

(१७) मानवी शरीरातील हाडांची संख्या किती ?
उत्तर -- २०६

(१८) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नागपूर 

(१९) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर -- भारतरत्न 

(२०) शिक्षक दिन कोणत्या दिवशी असतो ?
उत्तर -- ५ सप्टेंबर

(२१) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण  ?
उत्तर -- इंदिरा गांधी 

(२२) ' ययाती ' कांदबरी कोणी लिहिली ?
उत्तर -- वि. स. खांडेकर

(२३) गंगा - यमुना नदीचा संगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- इलाहाबाद

(२४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?
उत्तर -- राजगड

(२५) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा

(२६) सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- अमृतसर 

(२७) गोदावरी नदी महाराष्ट्रात .... येथून उगम पावते ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक )

(२८) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?
उत्तर -- ५० मिनिटे

(२९) ' डिस्कवरी ऑफ इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू

(३०) एकमेव खेळाडू ज्याला ' भारतरत्न ' भेटले ते कोण ?
उत्तर -- सचिन तेंडुलकर

(३१) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर -- पोरबंदर ( गुजरात )

(३२) भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात ?
उत्तर -- महात्मा गांधी

(३३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?
उत्तर -- चाचा

(३४) ' भारत छोडो चळवळ ' कोणत्या वर्षी सुरू झाली ?
उत्तर -- १९४२

(३५) भारताचा स्वातंत्र्यदिन कोणता ?
उत्तर -- १५ ऑगस्ट १९४७

(३६) वा-यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ?
उत्तर -- गतिजन्य ऊर्जा 

(३७) भारतात आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात ?
उत्तर -- वासुदेव बळवंत फडके

(३८) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर -- ७२० किलोमीटर 

(३९) भारतीय राज्यघटना अमलात केव्हा आली ?
उत्तर -- २६ जानेवारी १९५०

(४०) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- राकेश शर्मा

(४१) एकशिंगी गेंड्यांकरिता प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोठे आहे ?
उत्तर -- काझीरंगा

(४२) ' मेरी कोम ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग

(४३) ' दुधाची शुध्दता ' मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
उत्तर -- लॅक्टोमीटर

(४४) समुद्राची खोली ..... एककात मोजतात.
उत्तर -- फॅदोमीटर

(४५) सूर्यग्रहातील तांबडा ग्रह कोणता  ?
उत्तर -- मंगळ

(४६) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला ?
उत्तर -- महाड 

(४८) वनस्पतींनाही भावना असतात हा शोध कोणी लावला ?
उत्तर -- जगदीशचंद्र बोस 

(४९) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- दिल्ली

(५०) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर -- १९१९

(५१) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर -- रासबिहारी बोस

(५२) गुरूत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला ?
उत्तर -- न्यूटन

(५३) निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
उत्तर -- ३७ अंश सेल्सिअस

(५४) बेशुद्ध माणसाला शुध्दीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात ?
उत्तर -- अमोनिया

(५५) जगात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता ?
उत्तर -- रशिया

(५६) मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो ?
उत्तर -- देवनागरी

(५७) मानवी शरीरातील सर्वात लांब असे कोणते हाड आहे ?
उत्तर -- मांडीचे हाड

(५८) शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?
उत्तर -- भारत 

(५९) ' आंबोली ' हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग 

(६०) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर -- गुरू

(६१) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड 

(६२) दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला ?
उत्तर -- महात्मा गांधी 

(६३) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर -- दादासाहेब फाळके

(६४) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई

(६५) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
उत्तर -- सरदार वल्लभभाई पटेल

(६६) पंचशील करार कोणत्या देशांमध्ये झाला ?
उत्तर -- भारत - चीन

(६७) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी

(६८) ताजमहाल कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश

(६९) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते ?
उत्तर -- लुंबिनी 

(७०) महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते ?
उत्तर -- सदरक्षणाय खलनिग्रहणाय 

(७१)  जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
उत्तर -- रविंद्रनाथ टागोर

(७२) महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते ?
उत्तर -- छ. संभाजी नगर

(७३) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 

(७४) छ. शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- बुलढाणा 

(७५) माऊंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- थंड हवेचे ठिकाण

(७६) महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय ?
उत्तर -- राजघाट

(७७) कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ?
उत्तर -- मुंबई

(७८) ' श्यामची आई ' कादंबरीचे लेखक कोण ?
उत्तर -- सानेगुरुजी

(७९) अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- छ. संभाजी नगर

(८०) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे

(८१) महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे ?
उत्तर -- लावणी

(८२) ' जय जवान जय किसान ' हे घोषवाक्य कोणी दिले ?
उत्तर -- लालबहादूर शास्त्री

(८३) महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र 

(८४) इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर -- कमला नेहरू

(८५) जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- गोदावरी

(८६) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- सांगली

(८७) भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते ?
उत्तर -- नागपूर

(८८) कोणार्क येथे ..... हे प्रसिद्ध मंदिर आहे ?
उत्तर -- सूर्य मंदिर

(८९) ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- प्रवरा

(९०) महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी

(९१) लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- पुणे

(९२) चंदन वृक्षाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?
उत्तर -- कर्नाटक

(९३) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर -- दिल्ली

(९४) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
उत्तर -- नील आर्मस्ट्राँग

(९५) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची नदी कोणती आहे ?
उत्तर -- गोदावरी

(९६) कोणत्या झाडास स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात ?
उत्तर -- लाजाळू


(९७)बार्डोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
उत्तर -- सरदार पटेल

(९८) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपूर 

(९९) भिल्लांचा उठाव ...... येथे झाला होता.
उत्तर -- खानदेश

(१००) ' सावरपाडा एक्स्प्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू )
==============================
संकलक / लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Wednesday, 17 January 2024

सामान्यज्ञान प्रश्नावली ( प्रश्नमंजुषा )


(१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- कोय
-----------------------------
(२) फणसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- आठळी
-----------------------------
(३) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- चिंचोका
-----------------------------
(४) कापसाच्या बीला काय म्हणतात ?
उत्तर -- सरकी 
-----------------------------
(५) आपल्या देशाचे नाव काय आहे ?
उत्तर -- भारत
-----------------------------
(६) आपल्या राज्याचे नाव काय आहे ?
उत्तर -- महाराष्ट्र
-----------------------------
(७) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर -- पूर्व
-----------------------------
(८) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर -- पश्चिम
-----------------------------
(९) मोराचा तुरा कोठे असतो ?
उत्तर -- डोक्यावर
-----------------------------
(१०) कोणता पक्षी झाडाचे लाकूड कोरून घर बांधतो ?
उत्तर -- सुतारपक्षी
-----------------------------
(११) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?
उत्तर -- सिंह 
-----------------------------
(१२) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?
उत्तर -- उंट 
-----------------------------
(१३) मोटारसायकला किती चाके असतात ?
उत्तर -- दोन
-----------------------------
(१४) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर -- सात
------------------------------------
(१५) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड
-----------------------------------
(१६) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह
---------------------------
(१६) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
----------------------------
(१७) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?
उत्तर -- सोंड
--------------------------------
(१८) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
-------------------------------
(१९) कोळी या किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
-------------------------------
(२०) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- कोळी
-------------------------------
(२१) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- कुत्रा
-------------------------------
(२२) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वटवाघूळ
-------------------------------
(२३) झुरळाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
-------------------------------
(२४) मुख्य ऋतू किती ?
उत्तर -- तीन 
------------------------------
(२५) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?
उत्तर -- चार
-------------------------------
(२६) बेडकाला किती पाय असतात ?
उत्तर -- चार
------------------------------
(२७) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
-------------------------------
(२८) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
---------------------------------
(२९ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?
उत्तर -- सहा
-------------------------------
(३०) सापाला किती पाय असतात ?
उत्तर -- पाय नसतात.
-------------------------------
(३१) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग
-------------------------------
(३२) माशाला किती पाय अस्तात ?
उत्तर -- पाय नसतात.
--------------------------------
(३३) आंबा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी
--------------------------------
(३४) पेरू या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- अनेक बिया
--------------------------------
(३५)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी
-------------------------------
(३६) सिताफळात किती बिया असतात ?
उत्तर -- अनेक बिया
------------------------------
(३७) आवळा या फळात किती बिया असतात ?
उत्तर -- एक बी
---------------------------------
(३८) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड
-----------------------------------
(३९) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गुलाब
------------------------------
(४०) एका दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- २४ तास
---------------------------------
(४१) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू
-------------------------------
(४२) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता ?
उत्तर -- पिवळा
=======================
संकलक / लेखक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Wednesday, 10 January 2024

इतिहास प्रश्नावली ( छत्रपती शिवाजी )


(१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर -- शहाजीराजे भोसले
-----------------------------
(२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ?
उत्तर -- जिजाबाई
-----------------------------
(३) छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कधी झाला ?
उत्तर -- १९ फेब्रुवारी १६३०
-----------------------------
(४) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
उत्तर -- शिवनेरी 
-----------------------------
(५) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे 
-----------------------------
(६) छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ ..….. होता.
उत्तर -- मध्य युगाचा
-----------------------------
(७) छत्रपती शिवाजी महाराजांनी ..... स्वराज्य निर्माण केले.
उत्तर -- महाराष्ट्रात
-----------------------------
(८) स्वराज्य म्हणजे काय ?
उत्तर -- स्वतःचे राज्य
-----------------------------
(९) छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?
उत्तर -- रयतेवर अन्याय करणा-या सत्तांशी.
-----------------------------
(१०)  शहाजीराजे हे ...... गाढे पंडित होते.
उत्तर -- संस्कृतचे
-----------------------------
(११) मावळात राहणा-या लोकांना ..... म्हणत.
उत्तर -- मावळे 
-----------------------------
(१२) शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला ?
उत्तर -- फलटणचे नाईक - निंबाळकर
-----------------------------
(१३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर -- सईबाई
-----------------------------
(१४) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
उत्तर -- स्वराज्य स्थापण्याचे 
-----------------------------
(१५) शहाजीराजांच्या पत्नीचे नाव काय ?
उत्तर -- जिजाबाई 
-----------------------------
(१६) जिजाबाईचं माहेर कोणत्या घराण्यातील होते ?
उत्तर -- सिंदखेडचे जाधव 
-----------------------------
(१७) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
उत्तर -- मालोजीराजे भोसले 
-----------------------------
(१८) शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर -- मालोजीराजे भोसले 
-----------------------------
(१९) शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर -- जुन्नर 
-----------------------------
(२०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
उत्तर -- राजगड 
-----------------------------
(२१)  दादाजी कोंडदेव हे शहाजीराजांचे कोण होते ?
उत्तर -- इमानी सेवक 
-----------------------------
(२१) छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची ......
माचीवर भेटण्याची जागा निश्चित झाली.
उत्तर -- प्रतापगडाच्या
-----------------------------
(२२) छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले ?
उत्तर -- रायगड
-----------------------------
(२३) भोरप्या डोंगरावर शिवरायांनी ..... हा किल्ला बांधला.
उत्तर -- प्रतापगड 
-----------------------------
(२४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ‌?
उत्तर -- पंताजी गोपीनाथ 
-----------------------------
(२५) ' घोडखिंड ' ......... या नावानेच इतिहासात अमर झाली ?
उत्तर -- पावनखिंड 
-----------------------------
(२६) तानाजी मालुसरे हा कोकणातील कोणत्या गावाचा राहणार होता ?
उत्तर -- उमरठे
-----------------------------
(२७) तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय ?
उत्तर -- सूर्याजी 
-----------------------------
(२८) छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली ?
उत्तर -- रायगड
-----------------------------
(२९) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर -- १६७४
-----------------------------
(३०) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?
उत्तर -- राज्याभिषेक शक 
-----------------------------
(३१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय ?
उत्तर -- व्यंकोजीराजे 
-----------------------------
(३२) ...... ही शिवरायांची कुलदेवता होती.
उत्तर -- तुळजाभवानी
-----------------------------
(३३) ...... यांस लोक ' प्रतिशिवाजी ' म्हणत.
उत्तर -- नेताजी पालकर
-----------------------------
(३४) शिवरायांनी तोरणा गडाचे कोणते नामकरण केले ?
उत्तर -- प्रचंडगड 
-----------------------------
(३५) शिवरायांची राजमुद्रा ...... भाषेत होती.
उत्तर -- संस्कृत 

(३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर -- १६८०
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Saturday, 6 January 2024

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची नदी कोणती आहे ?
उत्तर -- गोदावरी

(२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?
उत्तर -- ३६

(३) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई

(४) जळगावचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी

(५) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला कोणता सागर आहे ?
उत्तर -- अरबी समुद्र

(६) गोदावरी नदी कोठून उगम पावते ?
त्र्यंबकेश्वर ( नाशिक )

(७)  माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड

(८)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा

(९) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार

(१०) महाराष्ट्रात नोटा कोठे छापली जातात ?
उत्तर -- नाशिक 

(११) नाशिकजवळ मिग विमानांचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर -- ओझर

(१२) गुळाची सर्वांत मोठी बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर

(१३) उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे ?
उत्तर -- ईशान्य

(१४) वंदे मातरम् हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी 

(१५) भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अमलात आली ?
उत्तर -- २६ जानेवारी १९५०

(१६) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- चंद्रपूर

(१७) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर -- राजस्थान

(१८)' सावरपाडा एक्स्प्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?
उत्तर -- कविता राऊत

(१९) छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांत प्रथम कोणता किल्ला बांधला ?
उत्तर -- तोरणा

(२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?
उत्तर -- महू ( मध्यप्रदेश )

(२१) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई

(२२) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर -- सातपूडा

(२३) चंद्र दररोज किती महिने उशिरा उगवतो ?
उत्तर -- ५० मिनिटे 

(२४) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात ?
उत्तर -- चाचा

(२५) महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला ?
उत्तर -- पोरबंदर ( गुजरात )

(२६) भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गंगा

(२७) सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहचण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर -- सात मिनिटे चाळीस सेकंद 

(२८) नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(२९) कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
उत्तर -- अलिबाग

(३०) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अमरावती

(३१) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
उत्तर -- ७२० किलोमीटर

(३२) एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक.

(३३) गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय आहे ?
उत्तर -- डेबूजी झिंगराजी जानोरकर

(३४) सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर -- खंडोजी

(३५) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे उद्गार कोणाचे आहे ?
उत्तर -- लोकमान्य टिळक 

(३६) भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण होत्या ?
उत्तर -- इंदिरा गांधी

(३७) " जय जवान,जय किसान‌ " ही घोषणा कोणी दिली ?
उत्तर -- लाल बहादूर शास्त्री

(३८) लाल किल्ला कोणत्या शहरात आहे ?
उत्तर - दिल्ली

(३९) " गुलाबी शहर " म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे ?
उत्तर -- जयपूर

(४०) भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
उत्तर -- २६ जानेवारी

(४१) भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण  होते ?
उत्तर -- जवाहरलाल नेहरू 

(४२) भारतीय राष्ट्रीय ध्वजात किती रंगाचे पट्टे आहे ?
उत्तर -- तीन

(४३) चादरीकरीता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
उत्तर  - सोलापूर

(४४) विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते ?
उत्तर - भगूर‌ (नाशिक) 

(४५) भंडारदरा प्रकल्प (धरण ) कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- अहमदनगर

(४६) येवला हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- पैठणी

(४७)महाराष्ट्रात पांडवलेणी कोणत्या शहरात आहेत ? 
उत्तर --  नाशिक

(४८) नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
उत्तर -- गोदावरी

(४९) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे

(५०) महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कोणते ?
उत्तर -- लावणी

(५१) महाराष्ट्रात पैठणी कुठे तयार केली जाते ?
उत्तर --  येवला

(५२) महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता ?
उत्तर -- कबड्डी

(५३) महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते ?
उत्तर --  पुणे

(५४) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी टपाल कचेरी कोठे आहे ?
उत्तर -- मुंबई

(५५) महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर -- १ मे

(५६) 'कोकणचा राजा' असे कोणत्या फळाला म्हणतात ?
उत्तर -- हापूस आंबा
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड ता. साक्री, जि. धुळे 
9422736775  /  7721941496