माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 10 August 2024

बुध्दिमत्ता सामान्यज्ञान ( प्रश्न आमचे, उत्तर तुमचे )

(१) सुमितला चार काका आहेत, तर नाशिकला राहणाऱ्या त्याच्या काकांना भाऊ किती ?

उत्तर ---- ४
------------------
(२) एक दोर सात ठिकाणी कापला तर त्याचे किती तुकडे होतील ?

उत्तर --- ८ (आठ )
----------------------------------
(३) एका रांगेत सुमितच्या पुढे सहा व मागे आठ मुले आहेत तर रांगेत एकूण मुले किती ?

उत्तर ---- १५
----------------------------------
(४) २ मीटर अंतर या प्रमाणे एक झाड लावल्यास २० मीटर अंतरात किती झाडे लावावी लागतील ‌?

उत्तर ---- ११
----------------------------------
(५) सुप्रियाच्या घराचा क्रमांक सुरूवातीपासून मोजल्यास ५ वा, शेवटून मोजल्यास ९ वा आहे तर त्या रांगेत एकूण घरे किती ?

उत्तर ---- १३
----------------------------------
(६) उषाचे वय सुप्रियाच्या वयाच्या दुप्पट आहे. सुप्रियाचे वय ६ वर्षे असल्यास उषाचे वय किती ?

उत्तर ---- १२
----------------------------------
(७) राहुलचे वय विराटच्या वयाच्या निम्मे आहे . विराजचे वय १० वर्षे असल्यास राहुलचे वय किती ?

उत्तर ----  ५ वर्षे
----------------------------------
(८) माझी आई तुझ्या वडीलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण ?

उत्तर ---- मामी 
----------------------------------
(९) मोनिकाला दोन बहिणी व एक भाऊ आहे. भावाचे नाव सुमित आहे तर सुमितला बहिणी किती ?

उत्तर --- तीन ‌
----------------------------------
(१०) सुनिता अनिता पेक्षा उंच आहे. अनिता सोनाली पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण ?

उत्तर ---- सुनिता 
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा 
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment