माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 17 August 2024

संख्यांचे प्रकार (Types Of Natural Numbers)

(1) सम संख्या (Even Number)

---- ज्या नैसर्गिक संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना सम संख्या म्हणतात.

---- सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो.

---- दोन क्रमागत सम संख्यामध्ये दोनचा फरक असतो.

---- उदा. 428,  532,  670 या सम संख्या आहेत.
=============================

(2) विषम संख्या (Odd Number)

---- ज्या नैसर्गिक संख्येच्या एककस्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात.

----  विषम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही. भागल्यास बाकी 1 उरते.

---- दोन क्रमागत विषम संख्यांमध्ये 2 चा फरक असतो.

---- उदा. 985, 369, 431 या विषम संख्या आहे.
==============================

(3) मूळ संख्या (Prime Number)

---- ज्या नैसर्गिक संख्यांना 1 व तीच संख्या या व्यतीरिक्त अन्य कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात.

---- 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत.
2,  3,  5,  7, 11, 13, 17, 19,  23,  29,  31, 37, 41,
43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97

---- सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.

---- 2 ही एकच सम असलेली मूळ संख्या आहे.

---- सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
9422736775 / 7721941496

No comments:

Post a Comment