माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 5 September 2026

गुरू गुरूजी ( समानार्थी शब्द)

गुरुजी शिक्षक मास्तर 
परमेश देव ईश्वर 
भाऊ बंधू सहोदर 
स्नेही मित्र साथीदार

चाणाक्ष चतुर हुशार 
चाकर दास नोकर 
मनसुबा बेत विचार 
खेळ मनोरंजन विहार

काळोख तिमिर अंधार 
आस्था जिव्हाळा आदर 
सुरेख रम्य सुंदर 
नजराणा भेट उपहार

तरबेज पारंगत निपुण 
बुद्धिमान पंडित विद्वान 
आनंद संतोष समाधान 
महा मोठा महान

माय माऊली ममता 
बाप वडील पिता 
आस्था काळजी चिंता 
रयत प्रजा जनता

अभ्यास व्यासंग परिपाठ 
मार्ग रस्ता वाट 
प्रातःकाळ उषा पहाट 
कठीण अवघड बिकट

छंद नाद आवड 
सतत अविरत अखंड 
प्रकाश तेज उजेड 
मेहनत प्रयत्न धडपड
========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरताड गावठाण 
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment