माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 4 February 2017

केव्हा ते सांगा.

                   🔹   उपक्रम 🔹
         लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर ) धुळे

                 🤔  केव्हा ते सांगा. 🤔

(१) घरासमोर गुढी उभारतात. - गुढीपाडवा

(२) समुद्राची पूजा करतात.  - नारळी पौर्णिमा

(३)बैलांची पूजा करतात . -- पोळा

(४) नागांची पूजा करतात. -- नागपंचमी

(५)एकमेकांवर रंग उधळतात. -होळी/रंगपंचमी

(६)घरोघरी गणपती आणतात. -- गणेशचतुर्थी

(७)सोने म्हणून आपट्याची पाने देतात. -दसरा

(८) बहीण भावाला राखी बांधते. - रक्षाबंधन

(९)वडाच्या झाडाची पूजा करतात. - वटपौर्णिमा

(१०) बहीण भावाला ओवाळते -- भाऊबीज

(११)घरोघरी आकाशकंदील लावतात.- दिवाळी

(१२) दहीहंडी फोडतात  -- गोपाळकाला .

(१३)येशू ख्रिश्चतांचा निधन दिवस. - गुडफ्रायडे .

(१४) आषाढ शुध्द पौर्णिमा - गुरुपौर्णिमा.

(१५) येशू ख्रिस्तांचा जन्म दिवस -- नाताळ

               लेखन :- शंकर चौरे
                            ता.साक्री जि.धुळे
                            ९४२२७३६७७५ 

एका शब्दात उत्तर


                  ✔    उपक्रम ✔

             🔹एका शब्दात उत्तर🔹

      लेखन :- शंकर चौरे  (पिंपळनेर)धुळे

(१) लांब पिसे असलेला पक्षी-- मोर

(२) पक्ष्याचे तोंड  -- चोच

(३) पिसारा फुलवून नाचणारा पक्षी- मोर

(४) पक्षी यांच्यामुळे उडतात  -- पंख

(५) फणा असलेला प्राणी  -- नाग

(६) पोळी याची करतात  -- गहू

(७) हरभ-याचे  पीठ  -- बेसन

(८) भात याचे तयार करतात  -- तांदूळ

(९) दोन्ही हातांना बोटे  -- दहा.

(१०) गुरांचा अन्न -- चारा.

(११) तांदूळ शिजल्यावर तयार होतो -- भात.

(१२) कच्च्या कैर्‍यांचे बनवितात -- लोणचे.

(१३) शेंगदाण्यापासून मिळते -- तेल.

(१४ रवा -साखरेपासून तयार होतो - शिरा .

(१५) ऊसापासून तयार करतात -- गूळ.

(१६) फुगा याच्यामुळे फुगतो -- हवा.

(१७) शेतात औत /नांगर ओढतात - बैल.

(१८) हत्तीचे  नाक -- सोंड.

(१९) बैल पूजेचा सण -- पोळा.

(२०तीळगूळ या सणाला वाटतात - मकरसंक्रांत.

(२१) सूर्य केव्हा उगवतो ?-- सकाळी.

(२२) सूर्य केव्हा मावळतो. -- संध्याकाळी.

(२३) लोकर मिळणारा प्राणी -- मेंढी.

(२४)फुलपाखरांच्या अळीला म्हणतात -सुरवंट.

(२५)फुलपाखराला किती पाय ? -- सहा.

                लेखन :- शंकर चौरे
                            ता.साक्री जि.धुळे
                              ९४२२७३६७७५

कशापासून काय ते सांगा ?

                🔸  उपक्रम 🔸
     ➖ कशापासून काय ते सांगा ?➖

                🔹  कशापासून काय 🔹

           लेखन :- शंकर चौरे  (पिंपळनेर )धुळे

(१) चपाती बनवतात   -- गहू

(२) गूळ बनवतात    --  ऊस

(३) कापड तयार करतात -- कापूस

(४) टेबलखुर्ची बनवतात  -- लाकूड /लोखंड.

(५) साखर बनवतात  -- ऊस

(६) मडके बनवतात  -- माती.

(७) भाकर बनवतात  -- बाजरी /ज्वारी.

(८) दही बनवतात   -- दूध.

(९) ताक बनवतात -- दही.

(१०) पापड बनवतात -- उडीद /नाचणी

(११) तेल काढतात -- शेंगदाणे /सोयाबीन

(१२) पोहे बनवतात -- तांदूळ.

(१३) हार बनवतात  -- फूले.

(१४) बासरी बनवतात -- बांबू.

(१५) दागिने बनवतात  -- सोने /चांदी.

(१६) रस बनवतात -- आंबा.

(१७)लोंच बनवतात -- कैरी /लिंबू

(१८) लोणी बनवतात -- दही.

(१९) तूप बनवतात  -- लोणी.

(२०) बिस्किट बनवतात -- गहू /नाचणी.

(२१) लाह्या बनवतात --  मका/ ज्वारी

(२२) आरसा बनवतात -- काच.

(२३) उसळ बनवतात -- मटकी /वाटाणा.

(२४) केस तेल काढतात  -- नारळ.

(२५) चुरमुरे बनवतात   -- तांदूळ.

(२६) वेफर बनवतात  -- बटाटे.

(२७) वरण बनवतात -- तूर.

(२८) भाजी बनवतात  -- वांगे / मेथी.

(२९) चटणी बनवतात -- मिरची.

(३०) विटा बनवतात -- माती.

        लेखन :- शंकर चौरे
                    ता. साक्री जि.धुळे
                  📞९४२२७३६७७५