✔ उपक्रम ✔
🔹एका शब्दात उत्तर🔹
लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर)धुळे
(१) लांब पिसे असलेला पक्षी-- मोर
(२) पक्ष्याचे तोंड -- चोच
(३) पिसारा फुलवून नाचणारा पक्षी- मोर
(४) पक्षी यांच्यामुळे उडतात -- पंख
(५) फणा असलेला प्राणी -- नाग
(६) पोळी याची करतात -- गहू
(७) हरभ-याचे पीठ -- बेसन
(८) भात याचे तयार करतात -- तांदूळ
(९) दोन्ही हातांना बोटे -- दहा.
(१०) गुरांचा अन्न -- चारा.
(११) तांदूळ शिजल्यावर तयार होतो -- भात.
(१२) कच्च्या कैर्यांचे बनवितात -- लोणचे.
(१३) शेंगदाण्यापासून मिळते -- तेल.
(१४ रवा -साखरेपासून तयार होतो - शिरा .
(१५) ऊसापासून तयार करतात -- गूळ.
(१६) फुगा याच्यामुळे फुगतो -- हवा.
(१७) शेतात औत /नांगर ओढतात - बैल.
(१८) हत्तीचे नाक -- सोंड.
(१९) बैल पूजेचा सण -- पोळा.
(२०तीळगूळ या सणाला वाटतात - मकरसंक्रांत.
(२१) सूर्य केव्हा उगवतो ?-- सकाळी.
(२२) सूर्य केव्हा मावळतो. -- संध्याकाळी.
(२३) लोकर मिळणारा प्राणी -- मेंढी.
(२४)फुलपाखरांच्या अळीला म्हणतात -सुरवंट.
(२५)फुलपाखराला किती पाय ? -- सहा.
लेखन :- शंकर चौरे
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment