माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 25 April 2017

अनेक पदार्थ कच्चे खा

                पर्यावरण उपक्रम

               अनेक पदार्थ कच्चे खा

   संकलन :- शंकर चौरे (पिंपळनेर)धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

  अनेक पदार्थ शिजवून खाणारा माणूस
हा पृथ्वीवरचा एकमेव प्राणी आहे. उकळणे,
भाजणे,तळणे,रटा-रटा शिजवणे अशा अनेक
प्रकारांनी  तो पदार्थ शिजवतो. पदार्थ
पचनाला हलके होण्यासाठी किंवा ते रसपूर्ण
होण्यासाठी हे बऱ्याचदा आवश्यक असते.
   पण कधी-कधी यांचा अतिरेक ही होतो.
ज्या गोष्टी कच्च्या खाल्ल्यातरी पचतात. किंवा
शिजवल्यामुळे ज्यातला सत्वांश कमी होतो.
अशाही गोष्टी आपण शिजवतो. टोमॅटोच सूप,
कोबीची भाजी, कोथिंबींरच्या वड्या, ओल्या
नारळाच्या करंज्या, हे असे काही पदार्थ
शिजवल्यावर ते वाईट लागतात असे नाहीत.
पण ही फळे किंवा भाज्या न शिजवताचं
खाणं अधिक चांगलं.आरोग्यासाठीही आणि
पर्यावरणासाठी ही, कारण त्यामुळे इंधन
वाचतं.
  टोमॅटो, कोबी, काकडी, कैरी, गाजर यांच्या
कोथिबींरी -चटण्या करा. कोथिबींरी कढीपत्ता,
ओला नारळ हे पदार्थ मुळ अन्नपदार्थ
शिजवल्यानंतर वर घाला. मोड आलेली
कडधान्यं कच्चीच चावून खा. शिजवल्यामुळे
नाश पावणारे अनेक अन्नघटक अशा कच्च्या
आहारामुळे आपल्याला मिळतील.

   संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

ऐकण्याची कला

                ऐकण्याची कला

   संकलन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
                 ¤ ९४२२७३६७७५ ¤

  निसर्गाने आपणाला दोन कान व एक
तोंड दिले आहे. याचा अर्थ आपण जास्त
ऐकावे व कमी बोलावे खूपशा वेळी आपण
व्यवस्थित न ऐकल्यामुळे समजत नाही.
गैरसमज निर्माण होतात.

कृती  :-
(१)दुसर्‍याचे म्हणने ऐकताना आपण रस
    घेऊन ऐकतोय असे दाखवा.

(२)थोडे पुढे झुकून ऐकावे.

(३)ऐकताना पूर्वग्रह मनात ठेवू नये.

(४)ऐकताना तुलना करू नये.

(५) ऐकताना निसर्ग आपणाला काही
     निरोप देतोय ही भावना ठेवावी.

(६)बोलणाऱ्याला मध्येच थांबवू नये.

(७)वक्त्याचा काही भाग आपणाला समजला
   नसेल तर पुन्हा सांगण्याची विनंती करावी.

(८)पटकन अनुमान लावू नये.

(९)बोलणाऱ्याच्या डोळ्यात पाहून ऐकावे.

(१०) ऐकताना शरीर संतुलित ठेवावे.

फायदे :-
(१)ज्ञानात भर पडते.

(२)आत्मसंयमन प्राप्त होते.

(३)संबंध सुधारतात.

(४) दृष्टिकोन विशाल होतो.

   संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  पिंपळनेर  ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

माहिती तंत्रज्ञानाची उद्दिष्टे

        माहिती तंत्रज्ञानाची उद्दिष्टे

  संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर ) धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

  कोणत्याही कार्याचे, घटकाचे उद्दिष्टे निश्चित
केलेली असतील तर त्या उद्दिष्टे प्राप्तीसाठी
काय -काय उपाययोजना करावी लागेल
याचा विचार होतो. म्हणून माहिती तंत्रज्ञानाची
उद्दिष्टे आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे.
माहिती तंत्रज्ञानाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे
आहेत.

(१)प्रत्येक क्षेत्रातील माहिती अद्ययावत ज्ञानाची
   शिक्षकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
   जाणिव करुन देणे.

(२)प्रत्येक क्षेत्रातील माहिती कमीत कमी वेळात
   व अचूक मिळवणे.

(३)जगात उपलब्ध असलेल्या कोणत्याही
    क्षेत्रातील माहितीचा शोध घेणे.

(४)माहिती तंत्रज्ञानाचा शालेय शिक्षणात उपयोग
    करणे.

(५)शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
   अचूक व अद्ययावत अध्यापन करणे.

(६) विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने
    अचूक व अद्ययावत स्वयं अध्ययन करणे.

(७)उपलब्ध ज्ञान मिळविण्यासाठी निरनिराळ्या
    तांत्रिक साधनांचा अभ्यास करणे.

(८)माहिती तंत्रज्ञानाचे एक प्रभावी साधन म्हणून
    संगणकाचा अभ्यास करणे.

(९)संगणकातील यांत्रिक साहित्य व प्रेरक
    साहित्य यांचा अभ्यास करणे.

(१०)प्रेरक साहित्याची प्रणाली व उपयोग
    अभ्यासणे.

(११)सांख्यिकी माहितीसाठी संगणकाचा
      उपयोग करणे.

(१२)बहुमाध्यम संगणकाचा अध्ययन -
       अध्यापनासाठी उपयोग करणे.

(१३)संगणक -इंटरनेट परिचय करून देणे,
      व वापर करणे.

(१४)शिक्षणात व्हिडिओ कॉन्फरन्स व
     टेलिकाॅन्फरन्सचा उपयोग करणे.

(१५)इंटरनेटद्वारे परस्पर संपर्क वाढविणे
      व संदेश देणे आणि स्वीकारणे.

   संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                   📞 ९४२२७३६७७५