माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 9 January 2018

कागदाचे उपयोग सांगा.


       कागदाचे उपयोग सांगा.
=========================

  माणसाच्या दैनंदिन जीवनात कागद किती
उपयोगाचा आहे. हे पुढीलप्रमाणे सांगता
येईल.

● कागदाचे शाळेत होणारे उपयोग --

  -- पुस्तक छापण्यासाठी कागद लागतो.
वही आणि वहीचे वेष्टन कागदाचे असते.
वर्गातील तक्ते,नकाशे, प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका
कागदाच्याच असतात.वर्षाच्या शेवटी मिळणारे
प्रगतिपुस्तक/ स्पर्धेत मिळणारे प्रमाणपत्रही
कागदापासून बनते. शाळांतून थोर महात्म्यांची
लावलेली छायाचित्रे कागदाची असतात. असे
कागदाचे शाळेत होणारे उपयोग आहेत.
----------------------------------------------------
● आपल्या रोजच्या जीवनात कागदाचा
  उपयोग --

-- पोस्टाची पाकिटे, पाकिटावरचे तिकिट ,
तिकिट विकत घ्यायला लागणारी रूपयांची
नोट कागदाची असते. पतंग,पाण्यात सोडायला
तयार केलेली होडी, हवेत फेकायचे विमान
कागदापासून बनवले जाते. वर्तमानपत्रे,मासिके
व दिनदर्शिका कागदाच्या असतात. प्रदर्शनाची
तिकिटे, आगगाडी व बसगाडीची तिकिटे
कागदाचीच असतात. कागदापासून शोभेची
फुले, छान छान खेळणी तयार केली जातात.
आपला आवडता खाऊही कागदाच्या पुडीत
बांधलेला असतो. अशा प्रकारे आपल्या
रोजच्या जीवनात कागदाचा उपयोग केला
जातो.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

Monday, 8 January 2018

Let's Speak English (आपण इंग्रजी बोलूया. )

(1) Open the book. (ओपन द बुक)
    -- पुस्तक उघडा.

(2) Read loudly.( रिड लाऊडली )
    -- मोठ्याने वाचा.

(3) Sing a Song. ( सिंग अ साॅग )
   -- गाणे गा.

(4) Help me. ( हेल्प मी  )
  -- मला मदत करा.

(5) Look at me. ( लुक अॅट मी  )
    -- माझ्याकडे बघा.

(6) Look there. ( लुक देअर )
  -- तिकडे बघा.

(7) Listen to me. ( लिसन टू मी. )
  -- माझे ऐका.

(8) Look over there.(लुक ओव्हर देअर)
   -- त्या तिकडे पहा.

(9) Take rest. ( टेक रेस्ट )
   -- विश्राम करा.

(10) Come with me.( कम विथ मी  )
    -- माझ्या सोबत या.

(11) Go left ahead. ( गो लेफ्ट अहेड )
   -- डावीकडून सरळ जा.

(12) Go back to your seat.
    ( गो बॅक टू युवर सीट )
 -- आपल्या जागी परत जा.

(13)Wait till I come.(वेट टिल आय  कम)
 -- मी येईपर्यंत थांब.

(14) Come back soon.(कम बॅक सून)
  -- लवकर परत या.

(15) Take me there. (टेक मी देअर )
   -- मला तेथे घेऊन चल.

(16) Give up bad habits.
      (गीव्ह अप बॅड हॅबीटस )
   -- वाईट सवयी सोडून द्या.

(17) Use the dustbin.( युज द डस्टबिन)
  -- कचरा पेटीचा वापर करा.

(18) Try  to do better. (ट्राय टू डू बेटर)
   -- चांगलं करण्याचा प्रयत्न करा.

(19)Go back two steps(गो बॅक टू स्टेप्स)
  -- दोन पावले मागे जा.

(20) Go away. (गो अवे ) - दुर जा

--------------------------------------------------
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि.प.प्रा. शाळा - बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                 9422736775

Sunday, 7 January 2018

आपल्या शाळेत बाल आनंद मेळावा घेऊया.

🔹प्रात्यक्षिक --
   बाल आनंद मेळाव्यात एकूण दहा दालने
   तयार केली.

🔯{ चित्रकला दालन -- १ }

 (१) चित्र काढणे व रंगवणे :- को-या कागदावर
      चित्र काढणे व रंगवणे.
  (२) कोलाज करणे - रंगीत घोटीव पेपरचे
      आकार कापून पांढऱ्या कागदावर
      डिंकाने चिकटवणे. बिया, सालकटं,फुल
      याद्वारे कोलाज तयार करणे.
---------------------------------------------------
🔯 { चित्रकला दालन -- २ }

 (१) ठसे काम :- वेगवेगळ्या ठशांद्वारे चित्र
     साकारणे व रंगवणे. रंगात बुडवून भेंडी
     व भाजीचे ठसे काढणे. हाताच्या बोटांचे
     अंगठ्याचे ठसे काढून प्राणी व पक्ष्यांचे
     चित्र तयार करणे.
--------------------------------------------------
🔯 { कागदकाम दालन --३ }

   (१) कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करणे.
   (२) कागदाच्या तुकड्यांना जोडून वेगवेगळे
        आकार तयार करणे.
--------------------------------------------------
🔯 { कागदकाम दालन -- ४ }
 
  (१) टोप्या तयार करणे :- वर्तमान पत्राच्या
       कागदाचा उपयोग करून वेगवेगळ्या
       आकाराचे टोप्या तयार करणे व डोक्यात
       घालणे.
  (२) रद्दी पेपरचे आकार तयार करून त्याचा
       वापर करणे. उदा. शंकू आकार बोटात
      कव्हर घालणे. कागदाचा झगा.
  (३) कागदाच्या ओरिगामी कला वस्तू तयार
       करणे.
-------------------s. s. chaure --------------
🔯 { रांगोळी दालन -- ५ }

  (१)रंगीत व पांढऱ्या रांगोळीचा वापर करून
       रांगोळी काढणे :- नक्षी, फ्री हॅण्ड, मुक्त
      चित्र, संस्कार भारती रांगोळी काढणे.
  (२) वेगवेगळ्या वस्तू वापरून रांगोळी काढणे.
        उदा. रंगीत खडे, शिंपले, बिया, शंख इ.
        रांगोळी काढणे.
---------------------------------------------------
🔯 { मनोरंजन खेळ-- ६ }

  डोळे बांधून :-
  (१) गाढवाला शेपूट लावणे.
  (२) काठीने मडके फोडणे.
  (३) जाळीत बाॅल टाकणे.
---------------------------------------------------
🔯 { संगीत दालन -- ७ }

  (१) विविध वाद्ये वाजवणे व आनंद घेणे.
  (२) गायन करणे.
  (३) संगीत खुर्ची.
  (४) गाण्यांच्या चालीवर कृतीयुक्त गाणे
       म्हणणे.
  (५) मुक्त नृत्य करणे.
------------------------------------------------
🔯 { खाद्यपदार्थ दालन -- ८ }

  (१) विद्यार्थ्यांनी घरून करून आणलेले
       पदार्थ विक्री करणे. उदा. पापड.
-------------------------------------------------
🔯 { मनोरंजक खेळ  -- ९ }

  (१) बादलीत चेंडू टाकणे.
  (२) वस्तुत रिंग टाकणे.
  (३) फुग्याला बाण मारणे.
---------------------------------------------------
🔯 { बाजार मंडई दालन -- १० }

(१) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खेळणी, वस्तू
     या बाजारात मंडई मध्ये विक्री करणे.
(२) विविध शैक्षणिक वस्तू , पुस्तके, आकर्षक
     पिशव्या, फोटो फ्रेम इ.
-------------------------------------------------
✔ फायदे :--
  (१) बाल आनंद मेळाव्यातून निखळ आनंद
        मिळतो.
  (२) आनंदातून उत्साह व कृती करण्यासाठी
       प्रेरणा मिळते.
  (३) विविध छंदाची जोपासना होते.

टिप :-हा उपक्रम प्रत्येकाने आपल्या शाळेत
       राबविण्याचा प्रयत्न करावा.

                  संकल्पना :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                                ता.साक्री जि.धुळे
                              📞 ९४२२७३६७७५