माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 9 January 2018

कागदाचे उपयोग सांगा.


       कागदाचे उपयोग सांगा.
=========================

  माणसाच्या दैनंदिन जीवनात कागद किती
उपयोगाचा आहे. हे पुढीलप्रमाणे सांगता
येईल.

● कागदाचे शाळेत होणारे उपयोग --

  -- पुस्तक छापण्यासाठी कागद लागतो.
वही आणि वहीचे वेष्टन कागदाचे असते.
वर्गातील तक्ते,नकाशे, प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका
कागदाच्याच असतात.वर्षाच्या शेवटी मिळणारे
प्रगतिपुस्तक/ स्पर्धेत मिळणारे प्रमाणपत्रही
कागदापासून बनते. शाळांतून थोर महात्म्यांची
लावलेली छायाचित्रे कागदाची असतात. असे
कागदाचे शाळेत होणारे उपयोग आहेत.
----------------------------------------------------
● आपल्या रोजच्या जीवनात कागदाचा
  उपयोग --

-- पोस्टाची पाकिटे, पाकिटावरचे तिकिट ,
तिकिट विकत घ्यायला लागणारी रूपयांची
नोट कागदाची असते. पतंग,पाण्यात सोडायला
तयार केलेली होडी, हवेत फेकायचे विमान
कागदापासून बनवले जाते. वर्तमानपत्रे,मासिके
व दिनदर्शिका कागदाच्या असतात. प्रदर्शनाची
तिकिटे, आगगाडी व बसगाडीची तिकिटे
कागदाचीच असतात. कागदापासून शोभेची
फुले, छान छान खेळणी तयार केली जातात.
आपला आवडता खाऊही कागदाच्या पुडीत
बांधलेला असतो. अशा प्रकारे आपल्या
रोजच्या जीवनात कागदाचा उपयोग केला
जातो.
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि. धुळे
               ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment