माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 6 February 2018

वाक्यांचे प्रकार ( मराठी -व्याकरण )


(१) विधानार्थी वाक्य :-
     ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते,
त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.अशा वाक्याची
सुरूवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो.
कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी
असते.
   उदा. (१) बाबा नाशिकला गेले.
          (२) मी इयत्ता दहावीत शिकतो.
     

(२) प्रश्नार्थक वाक्य :-
      ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो
  त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
 (शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच वाक्य प्रश्नार्थक
   समजावे.)
     उदा. (१) तू केव्हा परत येणार आहेस ?
            (२) तुमचे उपकार मी कसे विसरेन ?

(३) उद्गागारार्थी वाक्य :-
     ज्या वाक्यात भावनेचा उद्गागार काढलेला
असतो, त्यास उद्गागारार्थी वाक्य म्हणतात.
अशा वाक्याच्या शेवटी उद्गागारवाचक चिन्ह
असतो.
       उदा. (१)अबब  ! केवढा मोठा साप हा  !
              (२) शी ! काय हे अक्षर तुझे  !

(४) होकारदर्शक वाक्य :-
       ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो,
त्यास होकारदर्शक वाक्य म्हणतात.
        उदा. (१) माझ्याजवळ पैसे आहेत.
               (२) मी आज गावाला जात आहे.

(५) नकारार्थी वाक्य :-
      ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो,
त्यास नकारदर्शक वाक्य म्हणतात.
           उदा.(१) कधीही खोटे बोलू नये.
                 (२) दुसर्‍याची निंदा करू नये.

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५

Monday, 5 February 2018

वाक्ये ( पहा, वाचा व लिहा.)


(१)  अजय करवत धर.
(२)  रमण बदक धर.
(३)  शबनम घर बघ.
(४)  अक्षय सरळ चल.
(५)  अमर धरण बघ.
(६)  अभय भजन कर.
(७)  गणपत झटपट चल.
(८)  अकबर दगड जमव.
(९)  अमर भरभर चल.
(१०) कमल सरबत कर.
(११) भरत दगड ढकल.
(१२) रतन करवत पकड.
(१३) नयन वरण कर.
(१४) अजय वजन कर.
(१५) अजय जलद पळ.
(१६) मदन झरझर उतर.
(१७) अहमद लवकर परत चल.
(१८) कमल गवत पटपट उचल.
(१९) गणपत झटपट वजन कर.
(२०) करण पटकन वर चढ.
(२१) अक्षय चटकन बस पकड.
(२२) रतन बटण बदल.
(२३) वरद खडक बघ.
(२४) जगन जग उचल.
(२५) रजत ढग बघ.
(२६) शरद नळ उचल.
(२७) भवन मजजवळ बस.
(२८) धवल जलद पळ.
(२९) शरण हळद बघ.
(३०) छगन हरण बघ.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता. साक्री जि. धुळे
                ९४२२७३६७७५

Thursday, 1 February 2018

उतारा वाचा / ऐका प्रश्नांचे  उत्तर सांगा.(आकलन)

  वृक्ष सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असतात.
फळे, पाने, फुले, खोड हे वृक्षांचे सारेच
अवयव कामास येतात. अन्न, इमारतींसाठी
लाकूड, औषधे इत्यादी आपणास झाडे
प्रत्यक्षपणे देतात. तर अप्रत्यक्षपणे अनेक
प्रकारचे लाभही आपणास झाडांमुळे होतात 
आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा
प्राणवायू म्हणजे आॅक्सिजन ! तो वृक्षांमुळे
सहजतेने मिळतो. वृक्षांची मुळे जमिनीची धूप
थांबवितात. झाडे थंड हवा देतात. पाऊस
देतात.
        झाडे जितकी जास्त तितका पाऊस
चांगला पडतो. सध्या माणसे लाभापायी अन्
लोभापायी खूप झाडे तोडत आहेत. म्हणून
पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. यातून मग
दुष्काळ तीव्र पाणीटंचाई या सारख्या गंभीर
समस्या निर्माण होत आहे आहेत. त्यामुळे
वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त वृक्ष लावले.
पाहिजेत.  लक्षात ठेवा.
    ' झाडे वाढवा, भविष्य घडवा. '
-----------------------------------------------------
प्रश्न :--
(१) वृक्ष कोणासाठी उपयुक्त असतात ?
उत्तर :- वृक्ष सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असतात.

(२) वृक्षांचे कोणते अवयव कामास येतात.
उत्तर :- फळे, पाने, फुले, खोड.

(३) प्राणवायू म्हणजे काय  ?
उत्तर :- आॅक्सिजन

(४) या उता-यात कोणता संदेश दिला आहे.
    ते सांगा.
उत्तर :- ' झाडे वाढवा, भविष्य घडवा. '
============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
              जि. प.प्रा. शाळा- बांडीकुहेर 
              ता. साक्री जि.धुळे 
              ९४२२७३६७७५