(१) विधानार्थी वाक्य :-
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते,
त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.अशा वाक्याची
सुरूवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो.
कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी
असते.
उदा. (१) बाबा नाशिकला गेले.
(२) मी इयत्ता दहावीत शिकतो.
(२) प्रश्नार्थक वाक्य :-
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो
त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
(शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच वाक्य प्रश्नार्थक
समजावे.)
उदा. (१) तू केव्हा परत येणार आहेस ?
(२) तुमचे उपकार मी कसे विसरेन ?
(३) उद्गागारार्थी वाक्य :-
ज्या वाक्यात भावनेचा उद्गागार काढलेला
असतो, त्यास उद्गागारार्थी वाक्य म्हणतात.
अशा वाक्याच्या शेवटी उद्गागारवाचक चिन्ह
असतो.
उदा. (१)अबब ! केवढा मोठा साप हा !
(२) शी ! काय हे अक्षर तुझे !
(४) होकारदर्शक वाक्य :-
ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो,
त्यास होकारदर्शक वाक्य म्हणतात.
उदा. (१) माझ्याजवळ पैसे आहेत.
(२) मी आज गावाला जात आहे.
(५) नकारार्थी वाक्य :-
ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो,
त्यास नकारदर्शक वाक्य म्हणतात.
उदा.(१) कधीही खोटे बोलू नये.
(२) दुसर्याची निंदा करू नये.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. प.प्रा.शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment