माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 8 May 2018

आपल्या मनातील कुतूहल

( मनातील प्रश्न व त्यांची उत्तरे )
-------------------------------------------------

(१)एक मोजपट्टी आणि दोरी यांच्या साहाय्याने
     चेंडूचा परीघ कसा मोजाल ?

उत्तर - चेंडूच्या मध्यभागाभोवती दोरी गुंडाळावी
        लागेल. जेवढी दोरीची लांबी होईल, तेवढा
         चेंडूचा परीघ असेल.
--------------------------------------------------
(२) प्राचीन काळी हत्तीचे वजन कसे करत
      असतील  ?

उत्तर - एखाद्या मोठ्या होडीत हत्तीला उभे करून,
       होडी कुठपर्यंत पाण्यात बुडते याची नोंद
       नावेवर करत. त्यानंतर होडीवरील त्याच
       नोंदीपर्यंत बुडायला किती वस्तूमानाचे दगड
      लागतात ते ठरवून हत्तीचे वजन करत.
--------------------------------------------------
(३) मालमोटारींमध्ये भरून आणलेले ऊसाचे
     वस्तुमान कोणत्या एककात नोंदवतात  ?

उत्तर - वस्तुमान टनामध्ये किंवा क्विंटलमध्ये
         मोजतात.
--------------------------------------------------
 संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
                📞९४२२७३६७७५

Thursday, 3 May 2018

पाण्याला जीवन म्हणतात...


 पाणी म्हणजे जीवन !  ' जीवन ' या नावातच
पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही
आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे.
त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत
कळत नाही आणि मग आपल्याकडूनच
पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे,
 ते जपून वापरले पाहिजे.
    पाणी नसेल तर काय होईल,याची कल्पना
दुष्काळातच येते. तहान लागली असताना
पाणी मिळाले नाही की, डोळ्यात पाणी उभे
राहते ! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर
हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते.
पाण्याविना शेती फुलत नाही.
   आता जगात सगळीकडे पाण्याचा प्रश्न उभा
आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक
आहे,  एवढा पाण्याचा साठा उरला नाही.
पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत
आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी
जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच
भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते
जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा
टिकाव लागणार आहे.

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर
               ता. साक्री, जि. धुळे
                📞  ९४२२७३६७७५

Tuesday, 1 May 2018

माझा महाराष्ट्र



  माझा महाराष्ट्र नावाप्रमाणेच महान आहे.
म्हणून मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान
वाटतो.
  १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मराठी
ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.
  महाराष्ट्र हा बहुतांश डोंगराळ प्रदेश ; पण
मराठी माणसाने कष्ट करून त्याला सुपीक
बनवले. ऊस पिकवून साखर कारखाने उभारले.
फळाफुलांच्या बागा फुलवल्या. महाराष्ट्रातल्या
हापूस आंब्याने आज सारे जग जिंकले.
  माझ्या महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहास आहे.
श्रीशिवरायांनी पहिले जनतेचे राज्य उभारले.
त्या काळाची आठवण देणारे अनेक गड, दुर्ग
महाराष्ट्रात आहेत. शिल्पकारांच्या बोटातील
जादू दाखवणारी अजिंठा - वेरूळची लेणी
महाराष्ट्रात आहेत.  गोदावरी, भीमा, चंद्रभागा
या नद्यांकाठची तीर्थक्षेत्रे आणि अनेक मंदिरे
यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. मुंबई ही भारताची
आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. शिक्षण
व साहित्य या क्षेत्रांत महाराष्ट्र सदैव अग्रभागी
आहे. महाराष्ट्रात अनेक नररत्ने जन्माला आली.
सचिन तेंडुलकर सारखे भारतरत्न महाराष्ट्राची
छान आहे. महाराष्ट्राचा मराठी बाणा जगात
विख्यात आहे.

संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
              जि. प. प्रा.शाळा बांडीकुहेर
              ता. साक्री जि. धुळे
               📞९४२२७३६७७५