माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 23 May 2018

पाणी वाचवण्याचे सोपे उपाय

--------------------------------------------------

(१)नळ वाहते ठेवू नका. उपयोग करून
    झाल्यावर नळ बंद करा.

(२)नळात काही दोष असेल तर तपासून
  घ्या आणि गळणा-या नळांची ताबडतोब                                     दुरूस्ती करून घ्या.

(३)पिण्याचे स्वच्छ पाणी भांडी घासण्यासाठी
    किंवा कपडे धुण्यासाठी वापरू नका.

(४)रात्रभर साठलेले पाणी दुसर्‍या दिवशी
    वापरण्यासाठी सुरक्षित असते. ते फेकून
    देऊ नका. जास्त वेळ साठवलेले पाणी
   भांडी घासण्यासाठी, स्वच्छतेसाठी,
   बागकामासाठी वापरता येईल.

(५)दात घासताना नळ वाहता ठेवू नका.
    भांड्याचा उपयोग करा.

(६)अंघोळ करताना बादलीत पाणी घ्या.
     शाॅवरमधून पाणी घेऊ नका किंवा
    बाथटबचा वापर करू नका.

(७)फळे -भाजीपाला धुण्यासाठी वापरलेला
    पाण्याचा उपयोग झाडांना घालण्यासाठी
    करा.

(८)हिरवळीला पहाटे लवकर पाणी घाला.
  ज्यामुळे बाष्पीभवनामुळे उडून जाणाऱ्या
  पाण्याचे प्रमाण कमी होईल.
   
(९)तुमच्या घरासमोरील रस्ता, गॅरेज किंवा
   फुटपाथ पाण्याने धुवून काढण्याऐवजी
  झाडून घ्या.

(१०)शेताला एकदम पाणी देण्यापेक्षा
    ठिबक सिंचन पध्दतीचा उपयोग करा.
--------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
             पं. स. साक्री, जि. धुळे
             📞 ९४२२७३६७७५

Tuesday, 22 May 2018

पर्यावरण उपक्रम:-" पालापाचोळा कचरा नव्हे "

  घराभोवती बाग असेल, तर त्या झाडांचा
पालापाचोळा जमिनीवर गळणारच.
वाळक्या फांद्या कधी वा-या वादळानं तुटून
खाली पडणारच. बरेचसे बागवान हा सगळा
'कचरा कुंपणाबाहेर फेकून देतात. मुळात
ह्याची काही आवश्यकता नाही. पालापाचोळा
हा कचरा नाहीच. ते झाडांचं अन्न आहे !
झाडांना ते परत द्या. स्वच्छतेची फारच हौस
असेल, तर झाडून गोळा केलेला पालापाचोळा
एका कुजखड्डयात साठवा. पावसाळ्यात
त्याचं छान खत होईल. किंवा झाडांच्या
बुंध्यापाशी पाचळण(मलचिंग)करा. तिथेच
त्याचं छान खत होईल. जमीन झाकलेली
राहिल्याने पाण्याची वाफ कमी होईल- ते
वाचेल. ह्यातून सार्वजनिक स्वच्छता -
व्यवस्थेवरचा भार कमी होईल. हाही आणखी
एक लाभ.
    
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                पं.स.साक्री जि.धुळे
               📞 ९४२२७३६७७५

Thursday, 17 May 2018

चला माहिती मिळवूया - वटवाघूळाची


   वटवाघूळ हा एक निशाचर प्राणी आहे.
त्याचे शरीर मऊ केसांनी आच्छादलेले असते.
त्याचा रंग पांढरा, लाल, तपकिरी, करडा किंवा
काळा असतो. वटवाघूळाचे पंख खूप मोठे
असतात. पाठीच्या व पोटाच्या कातडीचा
विस्तार होऊन त्याचे पंख तयार झालेले
असतात.
    वटवाघळे संधिप्रकाशात व रात्रीच्या वेळी
क्रियाशील असतात व दिवसा झोपतात. खाली
डोके वर पाय अशा अवस्थेत ती फांद्यांना
टांगून घेतात. फांद्यांना चिकटून राहण्यासाठी
त्यांच्या मागच्या पायांची रचना वेगळी असते.
त्यांच्या पायांची  बोटे आतल्या बाजूला वाकलेली
असतात व नखे इतकी वाकडी असतात, की
झोपेतही ती झाडावरून खाली पडत नाहीत.
वटवाघळे कीटकभक्षक असतात. शेतातील
पिकांवरील कीड खाऊन पिकांचे होणारे नुकसान
टाळतात.

 संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
               पं.स.साक्री, जि. धुळे
               ९४२२७३६७७५