माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 19 December 2018

उपसर्गघटित व उपसर्ग लागून आलेले शब्द


(१) अति -- अतिशय,  अतिरेक, अतिक्रम.

(२) अनु  -- अनुकरण,  अनुभव,  अनुवाद.

(३) प्रति  -- प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिकूल.

(४) आड -- आडनाव,  आडवाट, आडकाठी.

(५) पड   -- पडजीभ, पडसाद, पडताळा.

(६) भर  -- भरजरी, भरधाव, भरदिवसा.

(७) कम  -- कमनशीब,  कमजोर,  कमकुवत.

(८) दर  -- दररोज, दरसाल, दरमहा

(९) ना  -- नाउमेद, नाराज, नापसंत.

(१०) बिन -- बिनचूक, बिनतक्रार, बिनधोक.

(११) बे  -- बेइमान, बेकार, बेअब्रू

(१२) सर  -- सरकार, सरदार, सरहद्द.

(१३) हर  -- हररोज,  हरघडी,  हरसाल

(१४) उप  -- उपवास,  उपपद,  उपकार.

(१५) अप  -- अपकार,  अपघात, अपमान.

(१६) अव  -- अवकाश, अवगत, अवमान.

(१७) परि  -- परिचित, परिणाम,  परिपाठ.

(१८) गैर  -- गैरप्रकार, गैरसोय, गैरहजर.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
               📞९४२२७३६७७५
      

Monday, 17 December 2018

वाक्य वाचन/लेखन*(हा,ही, हे,तो,ती,ते)

   मराठी भाषा समृद्धी  उपक्रम      

● वाक्य वाचा व लिहा.

(१) हा घोडा आहे.
(२) हा मोर आहे.
(३) हा चांदोबा आहे.
(४) हा आंबा आहे.
(५) हा वाघ आहे.
(६) हा कांदा आहे.
(७) हा नळ आहे.
(८) हा पेढा आहे.
---------------------------
(१) ही गाय आहे.
(२) ही मोटार आहे.
(३) ही चिमणी आहे.
(४) ही बाग आहे.
(५) ही आगगाडी आहे.
(६) ही बस आहे.
(७) ही जिलेबी आहे.
(८) ही साखर आहे.
----------------------------
(१) हे माकड आहे.
(२) हे केळे आहे.
(३) हे आकाश आहे.
(४) हे मांजर आहे.
(५) हे विमान आहे.
(६) हे वांगे आहे.
(७) हे गाजर आहे.
(८) हे कमळ आहे.
(९) हे कारले आहे.
--------------------------
(१) तो ढग आहे.
(२) तो पाऊस आहे.
(३) तो तलाव आहे.
(४) तो डोंगर आहे.
(५) तो सागर आहे.
(६) तो पक्षी आहे.
(७) तो कावळा आहे.
(८) तो मासा आहे.
----------------------------
(१) ती इमारत आहे.
(२) ती आगगाडी आहे.
(३) ती नदी आहे.
(४) ती बाग आहे.
(५) ती मगर आहे.
----------------------------
(१) ते विमान आहे.
(२) ते माकड आहे.
(३) ते रान आहे.
(४) ते गवत आहे.
(५) ते बाळ आहे.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
               📞९४२२७३६७७५
      

Saturday, 15 December 2018

मराठी - शब्दांच्या जोड्यातील फरक


 विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो,
   काय गंमत आहे पाहा. एका काना - मात्रेच्या,
एखाद्या अनुस्वाराच्या किंवा -हस्व - दीर्घाच्या
फरकाने भाषेतील शब्द अगदी वेगळीच अर्थ
सांगतात. निराळ्याच गोष्टीचा निर्देश करतात.

   उदा.   शव   -- म्हणजे  प्रेत
            शेव  -- खाण्याचा पदार्थ
   एक मात्रेच्या चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ
शकतो ना  ? किंवा  ' शेव ' शब्दाचा दोनपैकी
नेमका कोणता अर्थ घ्यायचा, हे संदर्भावरून
ठरते. अशा काही शब्दांच्या जोड्या पुढे
अर्थासह दिल्या आहेत.

   १. कबर -- थडगे
       कंबर -- शरीराचा भाग

   २. गृह   -- घर
       ग्रह   -- आकाशातील तेजोगोल

   ३. ढग  -- मेघ
       ढंग  -- चाळे

   ४. दिन  -- दिवस
       दीन  -- गरीब

   ५. निज  -- आपले, जवळचे
        नीज  -- झोप

   ६. पत्र   -- लिहावयाचे पत्र
        पात्र  -- योग्य, भांडे,  नाटकातील पात्र

   ७. परिमाण -- मापदंड, निकष
        परिणाम -- शेवट

   ८. पाणि  -- हात
       पाणी  -- जल

   ९. पिक  -- कोकीळ
       पीक  -- शेतातील पीक

   १०. फंड  -- वर्गणी
         फड  -- जमाव

   ११. भराभर -- लवकर
          भाराभर -- पुष्कळ

   १२. भाडे  -- कर
         भांडे  -- पात्र

   १३. भाग  -- हिस्सा
         भांग  -- गांज्याची हिरवी पाने

   १४. मत्सर -- द्वेष
         मच्छर -- डास

   १५. मास  -- महिना
         मांस   -- शरीराचे मांस

   १६. माडी  -- मजला
         मांडी  -- शरीराचा पायाचा भाग

   १७. रग  -- जोर / उबदार पांघरूण
         रंग  -- वर्ण

   १८. राग  -- संताप
          रांग  -- ओळ,  पंक्ती

   १९. लक्ष  -- नजर
          लक्ष्य  -- ध्येय

   २०. वदन  -- तोंड
          वंदन  -- नमस्कार

   २१. शिला  -- खडक
          शीला  -- एक नाव,  शीलवती

   २२. शित  -- भाताचे शित
         शीत  --  थंड

   २३. शिर  -- डोके
          शीर  -- रक्तवाहिनी

   २४. सुत  -- मुलगा
         सूत  -- दोरा

   २५. सुर  -- देव
         सूर  -- स्वर,  आवाज

   २६.अभिनव  -- नावीन्यपूर्ण
         अभिनय -- हावभाव

   २७. आबा - एक नाव/आजोबांचे संबोधन
         आंबा - एक फळ

   २८. काकू  -- चुलती
         कांकू  -- धरसोड

   २९. कुडी -- देह,   शरीर
         कुंडी -- मातीचे पात्र

   ३०. खोड -- सवय
         खोंड -- वासरू (नर )

   ३१. तगडी -- सशक्त
         तंगडी -- पाय

   ३२.आव्हान -- लढाईस बोलावणे, हटकणे.
         आवाहन -- हाक मारणे, बोलावणे.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
                 पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
               📞९४२२७३६७७५