विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो,
काय गंमत आहे पाहा. एका काना - मात्रेच्या,
एखाद्या अनुस्वाराच्या किंवा -हस्व - दीर्घाच्या
फरकाने भाषेतील शब्द अगदी वेगळीच अर्थ
सांगतात. निराळ्याच गोष्टीचा निर्देश करतात.
उदा. शव -- म्हणजे प्रेत
शेव -- खाण्याचा पदार्थ
एक मात्रेच्या चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ
शकतो ना ? किंवा ' शेव ' शब्दाचा दोनपैकी
नेमका कोणता अर्थ घ्यायचा, हे संदर्भावरून
ठरते. अशा काही शब्दांच्या जोड्या पुढे
अर्थासह दिल्या आहेत.
१. कबर -- थडगे
कंबर -- शरीराचा भाग
२. गृह -- घर
ग्रह -- आकाशातील तेजोगोल
३. ढग -- मेघ
ढंग -- चाळे
४. दिन -- दिवस
दीन -- गरीब
५. निज -- आपले, जवळचे
नीज -- झोप
६. पत्र -- लिहावयाचे पत्र
पात्र -- योग्य, भांडे, नाटकातील पात्र
७. परिमाण -- मापदंड, निकष
परिणाम -- शेवट
८. पाणि -- हात
पाणी -- जल
९. पिक -- कोकीळ
पीक -- शेतातील पीक
१०. फंड -- वर्गणी
फड -- जमाव
११. भराभर -- लवकर
भाराभर -- पुष्कळ
१२. भाडे -- कर
भांडे -- पात्र
१३. भाग -- हिस्सा
भांग -- गांज्याची हिरवी पाने
१४. मत्सर -- द्वेष
मच्छर -- डास
१५. मास -- महिना
मांस -- शरीराचे मांस
१६. माडी -- मजला
मांडी -- शरीराचा पायाचा भाग
१७. रग -- जोर / उबदार पांघरूण
रंग -- वर्ण
१८. राग -- संताप
रांग -- ओळ, पंक्ती
१९. लक्ष -- नजर
लक्ष्य -- ध्येय
२०. वदन -- तोंड
वंदन -- नमस्कार
२१. शिला -- खडक
शीला -- एक नाव, शीलवती
२२. शित -- भाताचे शित
शीत -- थंड
२३. शिर -- डोके
शीर -- रक्तवाहिनी
२४. सुत -- मुलगा
सूत -- दोरा
२५. सुर -- देव
सूर -- स्वर, आवाज
२६.अभिनव -- नावीन्यपूर्ण
अभिनय -- हावभाव
२७. आबा - एक नाव/आजोबांचे संबोधन
आंबा - एक फळ
२८. काकू -- चुलती
कांकू -- धरसोड
२९. कुडी -- देह, शरीर
कुंडी -- मातीचे पात्र
३०. खोड -- सवय
खोंड -- वासरू (नर )
३१. तगडी -- सशक्त
तंगडी -- पाय
३२.आव्हान -- लढाईस बोलावणे, हटकणे.
आवाहन -- हाक मारणे, बोलावणे.
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment