माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 10 September 2020

शाब्दिक उदाहरणे -- बेरीज (इ. ३ री, ४ थी )

(१) सुमितच्या शेतात आंब्याची १३२ झाडे व चिकूची
२२४ झाडे आहेत, तर त्यांच्या शेतात एकूण फळझाडे
किती ?

----- १३२ झाडे
    + २२४ झाडे
-----------------
    = ३५६ एकूण झाडे
-----------------
================================
(२) एका शाळेत ३५० मुलगे व २४० मुली आहेत,
तर शाळेतील एकूण मुले किती ?

------ ३५० मुलगे
     + २४० मुली
----------------------
     = ५९० एकूण मुले
--‐--------------------
================================
(३) सुप्रियाने ४७५ रूपयांचे दप्तर व ५१० रूपयांचा
गणवेश खरेदी केला, तर तिने एकूण किती रूपये खर्च
केले ?

----- ४७५ रूपये
    + ५१० रूपये
------------------------
    = ९८५ रूपये खर्च झाले.
------------------------
================================
(४) सुनिलने दोन खुर्च्या ६५० रूपयांस व एक घड्याळ ३२० रूपयांस घेतले, तर एकूण खरेदी किती रूपये ?

----- ६५० रूपये
    + ३२० रूपये
--------------------------
    = ९७० एकूण रूपये
-------------------------
====================÷===========
(५) टेकडीवर २४० कडूलिंबाची व १०५ सागाची
झाडे लावली, तर एकूण किती झाडे लावाली ?

----- २४० झाडे
   
+ १०५ झाडे 
-------------------------
    = ३४५ झाडे
-------------------------
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


Wednesday, 9 September 2020

भाषिक खेळ -- जिभेची वळकटी


● उद्देश :-- स्वच्छ व स्पष्ट उच्चार करता येणे.



● सूचना :- खालील शब्दसमूह न अडखळता व न थांबता म्हणावा.
( एक वाक्य घेऊन पुन्हा पुन्हा बोला.)


(१) कच्चा पापड , पक्का पापड.

(२) कच्ची पपई , पक्की पपई.

(३) मोठं नाणं, लहान नाणं.

(४) काळे कावळे, गोरे बगळे.

(५) चटईला टाचणी टोचली.

(६) काळे राळे, गोरे राळे , राळ्यात राळे मिसळले.

===============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday, 6 September 2020

जोड्या जुळवून वाचूया.


● जोड्या वाचा व लिहा.

(१) सुतार =     लाकूडकाम

(२) कुंभार =     मातीकाम

(३) शिंपी =       शिवणकाम

(४) गवंडी =       बांधकाम

(५) लोहार =      लोखंडकाम

(६) विणकर =     विणकाम

(७) शेतकरी =     शेतीकाम
========================
(८) शिक्षक =       शाळा

(९) ग्रामसेवक =    ग्रामपंचायत

(१०) डाॅक्टर =     दवाखाना

(११) पोस्टमन =    पोस्ट

(१२) पोलीस =     पोलिसचौकी
==========================
(१३) मुलांचा =   घोळका

(१४) पक्ष्यांचा =   थवा

(१५) फुलांचा =    गुच्छ

(१६) द्राक्षांचा =    घड
=====================÷÷÷÷÷
(१७) बसगाडी =     बसस्थानक

(१८) आगगाडी =    रेल्वेस्टेशन

(१९) विमान =        विमानतळ

(२०) जहाज =        बंदर
============================
(२१) आईचा भाऊ =     मामा
.
(२२) आईची बहीण =     मावशी

(२३) वडीलांचा भाऊ =     काका

(२४) वडीलांची बहिण =     आत्या
============================
(२५) ज्वारी =      भाकरी

(२६) गहू =        चपाती

(२७) तांदूळ =      भात

(२८) डाळ =       वरण

(२९) मटकी =      उसळ
============================
(३०) साखर =     गोड

(३१) मीठ =      खारट

(३२) चिंच =      आंबट

(३३) तुरटी =     तुरट

(३४) कारले =     कडू
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५