माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 4 June 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) भारताचे कोणते राज्य सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचे आहे ?
उत्तर -- राजस्थान 

(२) ' अग्निपंख ' हे कोणाच्या आत्मचरित्राचे नाव आहे ?
उत्तर -- ए. पी. जे.अब्दुल कलाम 

(३) 'हिराकुंड ' धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
उत्तर ‌-- महानदी

(४)  क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणते ?
उत्तर -- गोवा 

(५) महाराष्ट्रात कोणता दिवस  'वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर -- १५ ऑक्टोबर 

(६) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचे नाव काय आहे ?
उत्तर -- शिवनेरी 

(७) ' पानिपत ' हे स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- हरियाणा 

(८) ' दक्षिणेची गंगा ' म्हणून कोणत्या नदीस ओळखतात ?
उत्तर -- गोदावरी 

(९) ' अजिंठा आणि वेरुळ लेण्या ' कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद 

(१०)  येरवडा कारागृह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पुणे 

(११) मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
उत्तर -- २७ फेब्रुवारी 

(१२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोयना धरण आहे ?
उत्तर -- सातारा 

(१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दिक्षा कोठे घेतली ?
उत्तर -- नागपूर 

(१४) एलिफंटा लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर -- महाराष्ट्र 
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

Friday, 2 June 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) बालक्रांतीकारक शिरीषकुमारचे स्मारक कोठे आहे ?
उत्तर -- नंदुरबार 
----------------------------
(२) महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तर -- आंबोली ( सिंधुदुर्ग जिल्हा)
----------------------------
(३) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे ?
उत्तर --  रायगडावर 
-----------------------------
(४) नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे ‌?
उत्तर -- गोदावरी
---------------------------
(५) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?
उत्तर -- जायकवाडी 
---------------------------
(६) अजिंठा, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद
--------------------------
(७) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
---------------------------
(८) साल्हेर व मुल्हेर ही शिखरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- नाशिक
---------------------------
(९) सप्तश्रृंगी गड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक
---------------------------
(१०) नाशिक जिल्ह्यात विमान तयार करण्याचा कारखाना कोठे आहे ?
उत्तर -- ओझर
---------------------------
(११) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार 
---------------------------
(१२) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- पांझरा 
---------------------------
(१३)  ' खासबाग ' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान कोठे आहे ?
उत्तर -- कोल्हापूर 
-----------------------------
(१४) ' सावरपाडा एक्स्प्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत
-----------------------------------
(१५) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर 
--------------------------------
(१६) भारत देशाचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
उत्तर -- जनगणमन
---------------------------------
(१७) भारताचे राष्ट्रगीत गायनासाठी किती वेळ लागतो ?
उत्तर -- ५२ सेकंद
---------------------------------
(१८) भारत देशाचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर -- वंदे मातरम्
---------------------------------
(१९) भारत देशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर --- रविंद्रनाथ टागोर
---------------------------------
(२०) भारत देशाचा स्वातंत्र्यदिन कोणता आहे ?
उत्तर -- १५ ऑगस्ट
---------------------------------
(२१) भारत देशाचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे ?
उत्तर -- २६ जानेवारी
---------------------------------
(२२) भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर --  मोर
---------------------------------
(२३) भारतीय राष्ट्रध्वजाचे नाव काय ?
उत्तर -- तिरंगा
---------------------------------
(२४) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर -- आंबा
---------------------------------
(२५)' वंदे मातरम् ' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर -- बंकिमचंद्र चटर्जी
-----------------------------
(२६) कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?
उत्तर -- कबूतर
-----------------------------
(२७) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?
उत्तर -- देवमासा (व्हेल)
-----------------------------
(२८) सूर्यापासून आपणास आपणास कोणत्या दोन गोष्टी मिळतात ?
उत्तर -- प्रकाश व उष्णता
-----------------------------
(२९) बी फळाच्या बाहेर असणारे कोणते फळ आहे ?
उत्तर -- काजू
-----------------------------
(३०) कल्पवृक्ष असे कोणत्या झाडाला म्हणतात ?
उत्तर -- नारळ ( माड )
-----------------------------
(३१) आपल्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी कोणते चक्र आहे ?
उत्तर -- अशोकचक्र
-----------------------------
(३२) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  /  ७७२१९४१४९६

Thursday, 1 June 2023

आदर्शाचा झरा - भटीबाई चौरे ( अहिरे )


भटीबाई चौरे म्हणजे दयेचा सागर,
भटीबाई चौरे म्हणजे मायेने भरलेली घागर.

भटीबाई  म्हणजे चौरे परिवाराची माता,
भटीबाई म्हणजे संस्काराची गाथा.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचे भूषण,
भटीबाई  म्हणजे चौरे परिवाराची शान.

भटीबाई चौरे  म्हणजे दया - क्षमा, 
भटीबाई  म्हणजे विश्वासाची तमा.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा आदर्शाचा झरा,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा तारा.

भटीबाई  म्हणजे चौरे परिवाराचा आधार, 
भटीबाई  म्हणजे चौरे परिवाराचा साथीदार .

भटीबाई चौरे  म्हणजे आदर्शाचे स्वरुप, 
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा हुरुप.

 भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची करूणा,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा दागिना.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची सावली,
भटीबाई  म्हणजे चौरे परिवाराची माऊली.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा शिल्पकार,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा हुंकार.

भटीबाई चौरे म्हणजे सहिष्णुतेच उदाहरण,
भटीबाई चौरे  म्हणजे न्यायाचं अनुकरण.

भटीबाई  म्हणजे चौरे परिवाराची माय,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा हृदय.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची एकता,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची ममता.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा अभिमान,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा सन्मान.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची शक्ती,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची भक्ती.

भटीबाई म्हणजे चौरे परिवाराची धडपड,
भटीबाई म्हणजे चौरे परिवाराचा आधारवड.
==========================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६