माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 9 August 2018

Let's Speak English

     (आपण इंग्रजी बोलूया. )
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
(1) Open the book. (ओपन द बुक)
    -- पुस्तक उघडा.
(2) Read loudly.( रिड लाऊडली )
    -- मोठ्याने वाचा.
(3) Sing a Song. ( सिंग अ साॅग )
   -- गाणे गा.
(4) Help me. ( हेल्प मी  )
  -- मला मदत करा.
(5) Look at me. ( लुक अॅट मी  )
    -- माझ्याकडे बघा.
(6) Look there. ( लुक देअर )
  -- तिकडे बघा.
(7) Listen to me. ( लिसन टू मी. )
  -- माझे ऐका.
(8) Look over there.(लुक ओव्हर देअर)
   -- त्या तिकडे पहा.
(9) Take rest. ( टेक रेस्ट )
   -- विश्राम करा.
(10) Come with me.( कम विथ मी  )
    -- माझ्या सोबत या.
(11) Go left ahead. ( गो लेफ्ट अहेड )
   -- डावीकडून सरळ जा.
(12) Go back to your seat.
    ( गो बॅक टू युवर सीट )
 -- आपल्या जागी परत जा.
(13)Wait till I come.(वेट टिल आय कम)
 -- मी येईपर्यंत थांब.
(14) Come back soon.(कम बॅक सून)
  -- लवकर परत या.
(15) Take me there. (टेक मी देअर )
   -- मला तेथे घेऊन चल.
(16) Give up bad habits.
      (गीव्ह अप बॅड हॅबीटस )
   -- वाईट सवयी सोडून द्या.
(17) Use the dustbin.( युज द डस्टबिन)
  -- कचरा पेटीचा वापर करा.
(18) Try  to do better. (ट्राय टू डू बेटर)
   -- चांगलं करण्याचा प्रयत्न करा.
(19)Go back two steps(गो बॅक टू स्टेप्स)
  -- दोन पावले मागे जा.
(20) Go away. (गो अवे ) - दुर जा.
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
           केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

Monday, 6 August 2018

मापन -- धारकता

● धारकता  :-
      धारकता(पातळ पदार्थ) मोजण्याचे लीटर
      प्रमाणित एकक आहे.

    १ लीटर = १००० मिलीलीटर म्हणजेच
    १००० मिलीलीटर  = १ लीटर.

●  १ लीटर  (१००० मिली ),  ५०० मिली,
    २०० मिली इत्यादी मापांच्या साहाय्याने
    धारकता मोजतात.
  
     १ लीटर  =  १००० मिलीलीटर
     २ लीटर  =  २००० मिलीलीटर
     ३ लीटर   = ३००० मिलीलीटर
     ४ लीटर   =  ४००० मिलीलीटर
     ५ लीटर   = ५०००   मिलीलीटर
     ६ लीटर   = ६०००  मिलीलीटर
     ७ लीटर   =  ७००० मिलीलीटर
     ८ लीटर   =  ८००० मिलीलीटर
     ९ लीटर   = ९००० मिलीलीटर
     १० लीटर  = १०००० मिलीलीटर
     १२लीटर   = १२००० मिलीलीटर
     १५ लीटर  = १५००० मिलीलीटर
   --------------------------------------
     अर्धा लीटर  =  ५०० मिलीलीटर
     पाव लीटर  =  २५० मिलीलीटर
     पाऊण लीटर = ७५० मिलीलीटर
     सव्वा लीटर  = १२५० मिलीलीटर
     दीड लीटर  = १५०० मिलीलीटर
     अडीच लीटर = २५०० मिलीलीटर
     पावणे तीन लीटर = २७५० मिलीलीटर
     साडे पाच लीटर  = ५५०० मिलीलीटर
=========================     
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
            जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
             केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

Saturday, 4 August 2018

चिठ्ठी उचलूया,पाच वाक्य सांगूया/लिहूया.

              भाषिक उपक्रम

● खालीपैकी कोणत्याही एका विषयावर ४/५
   वाक्यात माहिती सांगा /लिहा.
 ¤ साहित्य :-  विषय चिठ्ठया.
 ¤ कृती :-  विद्यार्थ्याने एक चिठ्ठी उचलून,
    त्याच्यावरील विषय वाचून माहिती सांगावी/
    लिहावी.
  (१) आरसा,         (२)समई ,      (३) कंदील,
  (४) विजेचा दिवा, (५) विहीर ,    (६) पणती,
  (७)कावळा,         (८) मांजर,     (९) कुत्रा,
  (१०) गुलाबाचे फूल.
   जसे ----   विषय चिठ्ठया.

(१) आरसा
      आरसा काचेचा तयार करतात. काचेला
एका बाजूला पारा लावतात. मग आरसा तयार
होतो. आरशात आपला चेहरा पाहता येतो.
म्हणून प्रत्येक घरात आरसा असतोच. आरसा
खूप उपयुक्त वस्तू आहे.
--------------------------------------------------
(२) समई
     समई देवापुढे लावतात. तिच्यात कापसाची
वात पेटवतात. समई पाच किंवा सात वाती
लावता येतात. समईचा प्रकाश मंद असतो.
-------------------------------------------------
(३) कंदील
     
     कंदिलात घासलेट (रॉकेल) भरतात. त्यात
कापडाची वात पेटवतात. वातीभोवती काच
लावतात. कंदील हातातून कुठेही नेता येतो.
--------------------------------------------------
(४) विजेचा दिवा
        विजेचा दिवा म्हणजे काचेचा पोकळ
गोळा. त्यात एक तार असते. विजेमुळे ती
तार पेटते आणि प्रखर प्रकाश देते. अलीकडे
विजेचा दिवा विविध आकारांत मिळतो.
-------------------------------------------------
(५) विहीर
    जमिनीत खूप खोल खड्डा खणतात. त्यात
झ-याचे पाणी साठते. त्याला विहीर म्हणतात.
खेडेगावांत विहिरी असतात. विहिरीतून
आपल्याला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी
मिळते.
--------------------------------------------------
(६)  पणती
    
       पणती मातीच्या बनवतात. तिच्यात तेल
घालतात. त्यात कापसाची वात पेटवतात.
पणतीचा प्रकाश मिणमिणत असतो. दिवाळीत
पणत्यांची आरास करतात.
--------------------------------------------------
(७) कावळा
    कावळा हा सर्वांच्या परिचयाचा आहे.
त्याचा रंग काळा असतो. त्याची चोच खूप
मोठी असते. तो काव काव असे ओरडतो.
तो उंच झाडावर आपले घरटे बांधतो. तो
अळ्या, किडे आणि जे मिळेल ते खातो.
-------------------------------------------------
(८) मांजर
     मांजर हा पाळीव प्राणी आहे. त्याच्या
अंगावर मऊ केस असतात. त्याचे डोळे घारे
असतात. मांजराला मिशाही असतात.
मांजर पांढऱ्या, काळ्या, सोनेरी किंवा करड्या
रंगाचे असते. ते ' म्याव म्याव ' करून ओरडते.
--------------------------------------------------
(९) कुत्रा
   कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. तो मांसाहारी
आहे. तो दिलेल्या आज्ञा पाळतो. कुत्रा घराची
राखण करतो. चोर आला की जोरजोरात
भुंकतो.
--------------------------------------------------
(१०) गुलाबाचे फूल
    गुलाब हे अत्यंत सुंदर फूल आहे. त्याचा
रंग लाल, गुलाबी, पिवळा किंवा पांढराही 
असतो. त्याचा सुगंध मनाला आनंद देतो.
गुलाबाच्या झाडाला काटे असतात.
त्याच्यापासून अत्तर बनवतात. गुलाब हा
फुलांचा राजा आहे.     
========================

लेखन:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
            पिंपळनेर ता. साक्री जि.  धुळे
            ९४२२७३६७७५