माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 31 March 2021

भारतातील प्रमुख शहरे व त्यांची भौगोलिक नावे.


● भौगोलिक उपनाव --- शहर

(१) सात बेटांचे शहर -- मुंबई

(२) सूर्य नगरी -- जोधपूर

(३) डायमंड हार्बर -- कोलकाता

(४) इलेक्ट्रॉनिक शहर -- बंगळुरू

(५) भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

(६) गोल्डन सिटी -- अमृतसर

(७) गुलाबी शहर -- जयपूर

(८) भारताचे हाॅलिवूड -- मुंबई

(९) झरण्यांचे शहर -- श्रीनगर

(१०) पोलादनगरी -- जमशेदपूर

(११) महलांचे शहर -- कोलकाता

(१२) कोळसा नगरी -- धनबाद

(१३) शुभ्रनगरी -- उदयपूर

(१४) कुलुपांचे शहर -- अलीगढ

(१५) वन नगरी -- डेहराडून
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday, 30 March 2021

OPPOSITES WORDS (आॅपोझीट वर्डस ) --विरूध्दार्थी शब्द.



dry ( ड्राय ) × wet (वेट )
cold ( कोल्ड ) × hot ( हाॅट )

slow ( स्लो ) × fast ( फास्ट )
end ( एंड ) × start ( स्टार्ट )

rise ( राईस) × set ( सेट)
in ( इन ) × out ( आऊट )

wrong ( राँग ) × right ( राईट )
loss (लाॅस ) × profit ( प्राॅफिट)

bitter ( बिटर ) × sweet ( स्वीट )
tall ( टाॅल ) × short ( शाॅर्ट )

work ( वर्क ) × rest ( रेस्ट )
right ( राईट) × left ( लेफ्ट )

hard ( हार्ड ) × soft ( साॅफ्ट )
small ( स्माॅल ) × vast ( व्हास्ट )

dim ( डीम ) × bright ( ब्राईट )
dark ( डार्क) × light ( लाईट)

thin ( थीन ) × fat ( फॅट )
first (फर्स्ट ) × last ( लास्ट )
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे


Saturday, 27 March 2021

म्हणजे काय ? (एका शब्दाबद्दल शब्दसमूह प्रश्नावली )


(१) तबेला / पागा म्हणजे काय ?
उत्तर -- घोडे बांधण्याची जागा.

(२) जादूगर म्हणजे काय ?
उत्तर -- जादूचे खेळ करून दाखविणारा.

(३) शिलालेख म्हणजे काय ?
उत्तर -- दगडावर कोरलेले लेख.

(४) देशसेवक म्हणजे काय ?
उत्तर -- देशाची सेवा करणारा.

(५) नावाडी म्हणजे काय ?
उत्तर -- होडी चालवणारा.

(६) पाणबुडी म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यातून जाणारी बोट.

(७) जलचर म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यात राहणारे प्राणी.

(८) मदारी म्हणजे काय ?
उत्तर -- माकडाचा खेळ करून दाखवणारा.

(९) व-हाडी म्हणजे काय ?
उत्तर -- लग्नासाठी जमलेले लोक.

(१०) वैमानिक म्हणजे काय ?
उत्तर -- विमान चालविणारा.

(११) संशोधक म्हणजे काय ?
उत्तर -- शोध लावणारा.

(१२) समाजसेवक म्हणजे काय ?
उत्तर -- समाजाची सेवा करणारा.

(१३) वाटाघाटी म्हणजे काय ?
उत्तर -- मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी.

(१४) भाकडकथा म्हणजे काय ?
उत्तर -- निरर्थक गोष्टी किंवा गप्पा.

(१५) पाणवठा म्हणजे काय ?
उत्तर -- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.

(१६) पारदर्शक म्हणजे काय ?
उत्तर -- ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू.

(१७) परोपजीवी म्हणजे काय ?
उत्तर -- दुस-याच्या जिवावर जगणारा.

(१८) जन्मभूमी म्हणजे काय ?
उत्तर -- जेथे जन्म झाला ती भूमी.

(१९) आकाशगंगा म्हणजे काय ?
उत्तर -- आकाशातील ता-यांचा पट्टा.

(२०) बेट म्हणजे काय ?
उत्तर -- चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५