ब्लॉग भेटी.
Saturday, 27 March 2021
म्हणजे काय ? (एका शब्दाबद्दल शब्दसमूह प्रश्नावली )
(१) तबेला / पागा म्हणजे काय ?उत्तर -- घोडे बांधण्याची जागा.
(२) जादूगर म्हणजे काय ?
उत्तर -- जादूचे खेळ करून दाखविणारा.
(३) शिलालेख म्हणजे काय ?
उत्तर -- दगडावर कोरलेले लेख.
(४) देशसेवक म्हणजे काय ?
उत्तर -- देशाची सेवा करणारा.
(५) नावाडी म्हणजे काय ?
उत्तर -- होडी चालवणारा.
(६) पाणबुडी म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यातून जाणारी बोट.
(७) जलचर म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यात राहणारे प्राणी.
(८) मदारी म्हणजे काय ?
उत्तर -- माकडाचा खेळ करून दाखवणारा.
(९) व-हाडी म्हणजे काय ?
उत्तर -- लग्नासाठी जमलेले लोक.
(१०) वैमानिक म्हणजे काय ?
उत्तर -- विमान चालविणारा.
(११) संशोधक म्हणजे काय ?
उत्तर -- शोध लावणारा.
(१२) समाजसेवक म्हणजे काय ?
उत्तर -- समाजाची सेवा करणारा.
(१३) वाटाघाटी म्हणजे काय ?
उत्तर -- मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी.
(१४) भाकडकथा म्हणजे काय ?
उत्तर -- निरर्थक गोष्टी किंवा गप्पा.
(१५) पाणवठा म्हणजे काय ?
उत्तर -- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.
(१६) पारदर्शक म्हणजे काय ?
उत्तर -- ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू.
(१७) परोपजीवी म्हणजे काय ?
उत्तर -- दुस-याच्या जिवावर जगणारा.
(१८) जन्मभूमी म्हणजे काय ?
उत्तर -- जेथे जन्म झाला ती भूमी.
(१९) आकाशगंगा म्हणजे काय ?
उत्तर -- आकाशातील ता-यांचा पट्टा.
(२०) बेट म्हणजे काय ?
उत्तर -- चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment