माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 November 2023

सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा

(२) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर -- हेग

(३) ' तिहार ' जेल कोणत्या शहरात आहे ?
उत्तर --  दिल्ली 

(४) भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?
उत्तर -- राष्ट्रपती

(५) गोदावरी नदी कशी वाहते ?
उत्तर -- पश्चिमेकडून पूर्वेकडे 

(६) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -- नाईल

(७) महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- कोल्हापूर

(८) ' सरदार सरोवर प्रकल्प ' कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर -- नर्मदा

(९) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद

(१०) हळद उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर -- सांगली 

(११) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?
उत्तर -- नील आर्म स्ट्राॅग

(१२) भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत ?
उत्तर -- ७ ( सात )
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Sunday, 26 November 2023

ऐकूया, सांगूया. ( भाषिक उपक्रम )


(१)सूर्य सकाळी उगवतो.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
-----------------------
(२) मी सकाळी अभ्यास करते.
संध्याकाळी आजीबरोबर फिरायला जाते.
-----------------------
(३) बदक पाण्यात पोहते. 
घार आकाशात उंच उडते.
----------------------
(४) उन्हाळ्यात कडक ऊन असते. 
हिवाळ्यात थंडी वाजते.
-----------------------------
(५) ऊस गोड असतो. 
मिरची तिखट असते.
---------------------------
(६) चिंचेचे पान छोटे असते. 
वडाचे पान मोठे असते.
----------------------------
(७) कापसापासून कापड बनते. 
ऊसापासून साखर बनते.
-----------------------------
(८) मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या आहेत. 
पालेभाज्या नेहमी खाव्यात.
-----------------------------
(९) गावाबाहेर आमचे शेत आहे. 
शेतात बाजरी पेरली आहे.
-----------------------------
(१०) सकाळी लवकर उठावे.
 दात घासावेत. स्वच्छ अंघोळ करावी.
-----------------------------------
(११)सायकलला दोन चाके असतात. 
सायकल रस्त्यावरून पळते.
------------------------------
(१२) आकाशात ढग येतात. 
मुसळधार पाऊस पडतो. 
सगळीकडे पाणीच पाणी होते.
---------------------------
(१३)मला दोन हात आहेत. 
मी हाताने जेवतो. 
मी हाताने लिहितो.
---------------------------
(१४) गावात घरे आहेत.
गावाबाहेर शेते आहेत.
शेतात विहिरी आहेत.
-----------------------------------
(१५) आम्ही पाणी पिण्यासांठी वापरतो. 
पाण्याने अंघोळ करतो. 
पाण्याने कपडे धुतो, भांडी धुतो.
----------------------------
(१६) ससा गवत खातो. 
ससा भित्रा असतो. 
पण तो चपळ असतो.
----------------------------
(१७)कुत्रा पाळीव प्राणी आहे. 
तो घराची राखण करतो. 
तो शेताचीही राखण करतो.
-----------------------------
(१८) गाय पाळीव प्राणी आहे. 
गाय गवत खाते. 
गाय दूध देते.
-----------------------------
(१९) मांजर पाळीव प्राणी आहे. 
तिचे अंग मऊ असते. 
मांजर दूध पिते.
-----------------------------
(२०) पोपट हा पक्षी आहे. 
पोपटाचा रंग हिरवा असतो. 
त्याची चोच लाल असते.
-----------------------------
(२१) ज्वारीची भाकरी करतात. 
गव्हाची चपाती करतात. 
तांदळाचा भात करतात. 
डाळीची आमटी करतात.
----------------------------
(२२) मला दोन पाय आहेत. 
पायांनी मी चालतो. 
पायांनी मी पळतो, 
मी उड्या मारतो.
-----------------------------
(२३) गावातील रस्ता मोठा आहे. 
रस्त्यावर वाहने धावतात. 
रस्त्याने लोक जातात. 
सगळीकडे गर्दी असते.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
पो. रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

Saturday, 25 November 2023

COMMON PAIRS (काही जोडीने येणारे शब्द)


body and soul -- शरीर व आत्मा.
boys and girls --  मुलगे व मुली.
bread and butter -- पाव-लोणी (मीठ-भाकर).
come and go --  ये-जा.
cup and saucer -- कपबशी.
east and west -- पूर्व आणि पश्चिम. 
far and away -- अतिशय, खूप.
fast and loose -- धरसोड.
give and take -- देवाणघेवाण.
good and evil --  बरेवाईट.
great and small --  लहानमोठे.
hale and hearty -- धट्टाकट्टा व आनंदी (पूर्णपणे निरोगी)
hand and foot -- हातपाय.
hard and fast -- कठोर, ताठर, कडक (नियम, इत्यादी). heart and soul -- सर्वशक्ती (लावून, तनमनेकरून).
heaven and earth -- आकाशपाताळ.
here and there -- सर्वत्र (इतस्ततः).
high and low --  समाजातील उच्चनीच सर्व थर
hue and cry -- आरडाओरड.
husband and wife -- पतिपत्नी.
hustle and bustle -- घाईगर्दी, लोटालोटी
ins and outs -- बित्तंबातमी (संपूर्ण माहिती)
land and sea --  जमीन आणि सागर
law and order -- कायदा आणि सुव्यवस्था
lock and key -- कुलूपकिल्ली.
now and then -- मधूनमधून.
null and void -- व्यर्थ, रद्दबातल
one and all -- एकूणएक (सर्वजण).
over and above -- शिवाय, अधिक.
part and parcel -- अत्यंत महत्त्वाचा भाग.
pots and pans -- भांडीकुंडी.
pros and cons -- साधकबाधक प्रमाणे.
rich and poor -- श्रीमंत व गरीब.
rise and fall -- चढउतार.
safe and sound -- सुखरूप, सुस्थितीत.
short and sweet --  मोजके व मधुर.
thick and thin -- बरीवाईट परिस्थिती.
touch and go -- थोडक्यात झालेली सुटका.
young and old --  लहानथोर (आबालवृद्ध).
===========================
Shankar Sitaram chaure
z. p. school - Jamnepada ( Rohod)
Tal. saki , Dist - Dhule
9422736775 / 7721941496