माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 26 November 2023

ऐकूया, सांगूया. ( भाषिक उपक्रम )


(१)सूर्य सकाळी उगवतो.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
-----------------------
(२) मी सकाळी अभ्यास करते.
संध्याकाळी आजीबरोबर फिरायला जाते.
-----------------------
(३) बदक पाण्यात पोहते. 
घार आकाशात उंच उडते.
----------------------
(४) उन्हाळ्यात कडक ऊन असते. 
हिवाळ्यात थंडी वाजते.
-----------------------------
(५) ऊस गोड असतो. 
मिरची तिखट असते.
---------------------------
(६) चिंचेचे पान छोटे असते. 
वडाचे पान मोठे असते.
----------------------------
(७) कापसापासून कापड बनते. 
ऊसापासून साखर बनते.
-----------------------------
(८) मेथी, शेपू, पालक या पालेभाज्या आहेत. 
पालेभाज्या नेहमी खाव्यात.
-----------------------------
(९) गावाबाहेर आमचे शेत आहे. 
शेतात बाजरी पेरली आहे.
-----------------------------
(१०) सकाळी लवकर उठावे.
 दात घासावेत. स्वच्छ अंघोळ करावी.
-----------------------------------
(११)सायकलला दोन चाके असतात. 
सायकल रस्त्यावरून पळते.
------------------------------
(१२) आकाशात ढग येतात. 
मुसळधार पाऊस पडतो. 
सगळीकडे पाणीच पाणी होते.
---------------------------
(१३)मला दोन हात आहेत. 
मी हाताने जेवतो. 
मी हाताने लिहितो.
---------------------------
(१४) गावात घरे आहेत.
गावाबाहेर शेते आहेत.
शेतात विहिरी आहेत.
-----------------------------------
(१५) आम्ही पाणी पिण्यासांठी वापरतो. 
पाण्याने अंघोळ करतो. 
पाण्याने कपडे धुतो, भांडी धुतो.
----------------------------
(१६) ससा गवत खातो. 
ससा भित्रा असतो. 
पण तो चपळ असतो.
----------------------------
(१७)कुत्रा पाळीव प्राणी आहे. 
तो घराची राखण करतो. 
तो शेताचीही राखण करतो.
-----------------------------
(१८) गाय पाळीव प्राणी आहे. 
गाय गवत खाते. 
गाय दूध देते.
-----------------------------
(१९) मांजर पाळीव प्राणी आहे. 
तिचे अंग मऊ असते. 
मांजर दूध पिते.
-----------------------------
(२०) पोपट हा पक्षी आहे. 
पोपटाचा रंग हिरवा असतो. 
त्याची चोच लाल असते.
-----------------------------
(२१) ज्वारीची भाकरी करतात. 
गव्हाची चपाती करतात. 
तांदळाचा भात करतात. 
डाळीची आमटी करतात.
----------------------------
(२२) मला दोन पाय आहेत. 
पायांनी मी चालतो. 
पायांनी मी पळतो, 
मी उड्या मारतो.
-----------------------------
(२३) गावातील रस्ता मोठा आहे. 
रस्त्यावर वाहने धावतात. 
रस्त्याने लोक जातात. 
सगळीकडे गर्दी असते.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
पो. रोहोड , ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment