🔸 एक होता महात्मा 🔸
कवी :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
एक होता महात्मा
भारतीयांचा आत्मा ||धृ ||
करमचंद वडिलांचं नाव
पोरबंदर जन्म गाव
जगाला शांततेचा संदेश दिला
अहिंसेचा आदर्श घालून दिला
वकिलीचे शिक्षण पूर्ण केलं
देश सेवेसाठी वाहून दिलं
जुलमी सत्तेची चीड आली
अन्यायाला वाचा फोडून दिली
सत्याग्रह, उपोषणाचा मार्ग
यानेच केलं देशाला स्वर्ग
मीठासाठी दांडी यात्रा काढली
लोकांना न्याय मिळवून दिली
मोह नाही, नाही मत्सर हेवा
गांधीजीचे कार्य अनमोल ठेवा
बापूजी दक्षिण आफ्रिकेत गेले
समाजसुधारणा करून आले
मागे कधी हटले नाही
जिद्द त्यांनी सोडली नाही
ध्येयाने ते प्रेरित होत -होत
कधीच ते थकले नाहीत
विचार स्वातंत्र्याचा मनात होता
विविधतेतही इथे रुजवली समता
भारत मातेसाठी रक्तही सांडले
अखेरपर्यंत इंग्रजाशी भांडले
संघर्षाचा धडाही गिरवून दिला
अन्यायी देशाला न्याय मिळवून दिला
इंग्रज हरला, पारतंत्र्य सरला
गांधीजी स्वातंत्र्याचा हिरो ठरला
कवी :- शंकर चौरे
पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment