माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 4 February 2017

थोर माझा  महाराष्ट्र

   कवि/लेखक :- शंकर चौरे धुळे  (पिंपळनेर)
         थोर माझा  महाराष्ट्र
सा-या महाराष्ट्राची माझ्या हाती किल्ली
१मे १९६०ला राज्याची निर्मिती झाली
महाराष्ट्राची राजधानी झाली मुंबई
याच दिवशी आनंदाने लोकांनी वाटली मिठाई ||१||
उन्हाळ्यात खावेसे वाटते फळ संत्री
नागपूरचे सुपुत्र आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
संत्र्याचा जिल्हा म्हणून देशात आहे मशहूर
महाराष्ट्राची उपराजधानी मी आहे नागपूर ||२||
रंगीबेरंगी चांदरींसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर
कुस्ती खेळाचे माहेरघर आहे कोल्हापूर
शिक्षणाचे नंदनवन मी आहे पुणे
येथे ज्ञानसाठी काहीच नाही उणे ||३||
साखरेच्या कोठाराचा जिल्हा अहमदनगर
येथेच महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर
आदिवासींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध नंदुरबार
येथेच झाले बालक्रांतीकारक शिरीषकुमार ||४||
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान विठ्ठलाचे पंढरपूर
भवानी मातेचे प्रसिद्ध स्थान तुळजापूर
केळ्याच्या बागांचा जिल्हा जळगाव
द्राक्षांच्या बागांचा जिल्हा नाशिक नाव ||५||
अजिंठा -वेरूळ लेण्यांचा जिल्हा औरंगाबाद
बिबी का मकबरा व येथे किल्ला दौलताबाद
पांझरा नदीच्या काठावर धुळे जिल्हा
एकवीरा देवीचे मंदिर व लळींग किल्ला ||६||
      लेखक-
           शंकर चौरे
           पिंपळनेर ता.साक्री जिल्हा. धुळे
           ९४२२७३६७७५
          

No comments:

Post a Comment