माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 4 February 2017

भगवान बिरसा -माझ्या मनात


       भगवान बिरसा -माझ्या मनात 

आपल्या देशात होतो भगवान बिरसाचा मान
बिरसाचे कार्य सांगतो ऐका देऊन कान

स्वातंत्र्याच्या युद्धात बिरसाने घेतली उडी
बिरसाने काढली इंग्रजांच्या सत्तेची खोडी

बिरसाच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले
इंग्रजांशी दोन हात करून स्वराज्य मिळविले

आदिवासींचे वैभव, बिरसाची मूर्ती
बिरसाचे नाव घेऊन होते क्रांतिकारकांची स्मृती

भगवान बिरसा मुंडा भारताचा हिरा
 त्यांचे नाव घेऊन स्वराज्य आठवतो खरा

सातपुडयाच्या नंदनवनात नाचतो मोर
बिरसा सारखे जननायक मिळाले भाग्य थोर

आईवडिलांनी वाढवलं, मामांनी पढवलं
बिरसा मुंडाचं नाव आदिवासींनी ह्रदयात मढवलं

बिरसाचे विचार आहेत किती छान
आदिवासींच्या जीवनात सदा त्यांना मान

बिरसा सारखा राजा गादीवर बसावा
आदिवासींना त्यांचा आशीर्वाद असावा

गुलाबाचे फूल दिसायला ताजे
बिरसा हेच आदिवासींचे राजे

बिरसा हाच खरा आदिवासीचा अलंकार
आदिवासीत जन्म घेऊन ध्येय केले साकार

या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी 
बिरसाच्या महान कार्याला चंद्र, सुर्य साक्षी

या वीराने आदिवासींच्या हक्कासाठी लढा दिला

लोकांनी त्यांना जननायक किताब बहाल केला

         लेखक/कवि--
                 शंकर चौरे 
                पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
                ९४२२७३६७७५
                

No comments:

Post a Comment