माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 19 January 2019

चला आपण उपयुक्त झाडांची माहिती घेऊया.


(१) कडुलिंब --

   कडुलिंब हा मोठ्या प्रमाणात आढळणा-या
वृक्षांपैकी एक आहे. कडुलिंब हा आकाराने
मोठे व सावली देणारा वृक्ष आहे. त्याच्या सर्व
अवयवांची चव ही कडूच असते. हा एक औषधी
वृक्ष आहे. तो भरपूर आजारावर एक रामबाण
उपाय म्हणून वापरला जातो. त्याचे लाकूड
इमारतीसाठी उपयुक्त आहे. या झाडाला कल्पवृक्ष
सुध्दा म्हणतात.
--------------------------------------------------

(२) नारळ  --

  नारळ हे फारच उपयुक्त झाड आहे. नारळाच्या
झाडाला फांद्या नसतात तरी ते उंच वाढते. ही
झाडे सर्वांत जास्त समुद्रकिनारपट्टीच्या भागात
वाढतात. नारळाचे बाहेरील कवच कठीण असते
व आत मधूरपाणी असते. आतील खोब-यापासून
तेल काढतात,ते केसांकरीता व त्वचेसाठी उपयुक्त
आहे. नारळाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग होतो.
नारळाला कल्पवृक्ष म्हणून ओळखतात.
--------------------------------------------------

(३) बेल  --

  बेल हे असे झाड आहे, ज्याचा प्रत्येक अवयव
स्वास्थ्य व सौंदर्य वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
याच्या फळावर कठीण कवच असते व आतमध्ये
मधूर गर असतो. बेलाचे फळ फार काळापर्यंत
वापरण्यायोग्य राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर
प्रमाणात असते. बेलाच्या पिकलेल्या फळापेक्षा
कच्चे फळ जास्त बहूगुणी आहे. या फळाचा
मुरंबा करतात.
--------------------------------------------------

(४) फणस --

    फणस हे फळ आकाराने फार मोठे असते.
फणसाला बाहेरून काट्यासारखी अनेक टोके असतात. फणसाच्या आत गरे असतात. एका
ग-यामध्ये एक बी असते. फणसाची भाजीसुध्दा
करतात. फणस पिकल्यावर त्याचे गरे मधूर व
गोड लागतात.
--------------------------------------------------

(५) आंबा --

     आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आंबा
कच्चा असतांना आंबट तर पिकल्यानंतर तो
गोड लागतो. आंब्याच्या बी ला कोय म्हणतात.
त्यावर कठीण आवरण असून त्याची बी ही
द्विबिजपत्री असते. हापूस आंबा ही आंब्याची
एक जात प्रसिद्ध आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment