माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 23 January 2019

आपला देश -- सामान्यज्ञान प्रश्नावली

 
(१)आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे का करतो ?

-- आपल्यातील एकोपा टिकून राहावा व जोपासला
   जावा, म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने
   साजरे करतो.

(२) कोणते राष्ट्रीय सण आपण साजरे करतो  ?

--  'स्वातंत्र्यदिन ' आणि  'प्रजासत्ताक दिन ' हे
     राष्ट्रीय सण आपण साजरे करतो.

(३) १५ आॅगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून
      आपण का साजरा करतो  ?

--  १५ आॅगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र
     झाला; म्हणून १५ आॅगस्ट हा दिवस दरवर्षी
     आपण  'स्वातंत्र्यदिन' म्हणून साजरा करतो.

(४)  २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक
       दिन म्हणून आपण का साजरा करतो.

--  आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही
     पद्धतीने करण्यास २६ जानेवारी १९५०
     पासून सुरूवात झाली. म्हणून २६ जानेवारी
     हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून
     साजरा करतो.

(५) आपल्या देशाची कोणती तीन संरक्षक दले
      दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात
      सहभागी होतात  ?

--  प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भूदल, नौदल
     आणि हवाईदल ही देशाची तीन संरक्षक दले
      सहभागी होतात.

(६) आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत  ?

--  राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली
     राष्ट्रीय प्रतीके आहेत.

(७) आपला राष्ट्रध्वज कोणता  ?

--  आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे.

(८) आपले राष्ट्रगीत कोणते  ?

--  'जनगणमन ' हे आपले राष्ट्रगीत आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment